Logo1
flag

जिल्ह्याविषयी

about-icon-big
जिल्ह्याविषयी

चंद्रपूर जिल्ह्यात एकुण 15 तालुके असुन माहे ऑक्टोंबर 2004 मध्ये कोरपना व राजुरा विकास खंडामध्ये विभाजन होऊन जिवती या विकास खंडाची निर्मिती झाली याप्रमाणे जिल्ह्यात एकुण 15 पंचायत समित्या आहेत. जिल्ह्यात एकुण 847 ग्राम पंचायती आहेत. या जिल्ह्याला ऐतिहासिक परंपरा असून पुर्वी येथे गोंडराजे अनेक वर्षे राज्य करीत होते. पांडव वंशियांच्या इतिहासाची सुरुवात ही कोततामिलल नावाच्या गोंडवशीयापासून झाली असून गोंडवंशियांचा प्रथम अधिपती भिम व लालभिंग पासून होवून शेवटी निळकंठशहापर्यंत गोंडवंशिय राजवट होती. याच राजवटीत बल्लारशाह यांनी चंद्रपूर शहर भोवती मजबूत असा दगडी परकोट (भिंत) संरक्षणासाठी बांधली ती चंद्रपूर शहराची वैशिष्टे म्हणून आज अस्तित्वात आहे.   याशिवाय भद्रावती, बल्लारपूर व माणिकगड येथे सुध्दा मोठे किल्ले आहेत. येथे अंचलेश्वर व महाकाली मातेची इतिहास प्रसिध्द मंदिरे गोंड राजांनी बांधली. येथे दरवर्षी चैत्र पोर्णिमेला महाकाली यात्रा भरते. या यात्रेसाठी परभणी, नांदेड, भागातून हजारो भाविक मोठ्या प्रमाणात येतात. 

जिल्ह्यात पूर्व सिमेवर उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी वैनगंगा आणि पश्चिम सिमेवर वाहणा-या वर्धा नदीने जिल्ह्याचे दोन नैसगिक सिमा आखल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व नद्या उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहतात. जिल्ह्यात विविध प्रकारची विपुल खनिज संपत्ती आहे. दगडी कोळसा, कच्चे लोखंड, चुनखडी यांचे फार मोठे साठे आहेत. तसेच उत्कृष्ठ विपुल नैसर्गिक संपत्ती हे ह्या जिल्ह्याचे वैशिष्ठे आहेत. जंगलात मौल्यवान सागवान लाकूड मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. याशिवाय जळावू लाकूड, तेंदूपत्ता, बांबू, डिंक, इत्यादी वनउपजही मोठ्या प्रमाणत मिळतात. जिल्ह्यातील 80 टक्के लोक शेतीवरच आपली उपजिविका करतात. जिल्ह्याच्या पूर्वेकडील भागात भात हे प्रमुख पिक आहे.  इतर भागात सोयाबीन, ज्वारी, कापूस व तूर ही पिके प्रमुख आहेत. वर्धा, इरई, अंधारी, वैनगंगा, पैनगंगा, बारमाही वाहणा-या नद्या आहेत. जिल्ह्यात एकुण चार सिमेंट कारखाने आहेत.  तसेच प्रत्येक एक याप्रमाणे कागद, पोलाद, मॅगनिज, रेफ्रिजरेटर निर्माण करण्याचे कारखाने आहेत.

जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र :- १०,७९३.०९ चौ.कि.मी. चंद्रपूर जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण व पूर्वभागात १८.४ ते २०.५ या उत्तर अंशावर व ७८.५ ते ८०.६ टक्के या पूर्णरेखांष या भौगोलिक पट्टयात बसला आहे.

जिल्हयाची लोकसंख्या :- जिल्हयाची २००१ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या २०,७१,१०१ यापैकी ग्रामीण लोकसंख्या १५,१३,४०२ आहे.

प्राकृतिक रचना :- टेकडयाचा भाग, नद्याचे सखोल मैदान व डोंगराळ भाग.

भूगर्भरचना :- प्रस्तर लाव्हांचा समावेच्च आहे. कार्बन, ऍमाशिस्ट   कुळसाईट, ऍसे, जैस्पर यासारखी खनिजे, खडक साधारण काळा पांढ-या चुनखडी व वाळू. जमिन काळी असून ऍल्युमिनियम, कॉबोर्नेटमॅग्नेशियम व काही प्रमाणात पोटॅशियम नग व स्फुरद यांचा समावे आहे.

नद्या :-  वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, इरई, अंधारी या नद्यामुळे शेतजमीन सुपीक बनली आहे. 

तलाव :- जिल्हयात एकुण १६७८ माजी मालगुजारी तलाव असून मध्यम तलाव ७ आहेत. नलेश्‍वर, चारगांव, आसोलामेंडा, लभानसराड, अमलनाला, चंदईनाला, घोडाझरी या तलावामुळे मत्स्यव्यवसाय मोठयाप्रमाणात होतो.  ० ते१०० हेक्टर चे८० लघुपाटबंधारे तलाव आहेत.