Logo1
flag

विभाग व योजना

list-of-department
कृषी विभाग
कृषी विभाग
फोटो
14
योजना
अ ) जिल्हा परिषद सेसफंड योजना - 1) पिकावरील कीड नियंत्रणासाठी 50% अनुदानावर किटकनाशकांचा पूरवठा करणे.

 1) पिकावरील कीड नियंत्रणासाठी 50% अनुदानावर किटकनाशकांचा पूरवठा करणे.
उद्देश :- विविध पिकावरील किडी/रोगांचे वेळीच नियंत्रण करून होणारे नुकसान टाळण्याकरीता शेतक-यांना 50 टक्के अनुदानावर किटकनाशकांचा पूरवठा करणे.
लाभार्थी निकष :- जिल्हयातील सर्व घटकातील व वर्गवारीतील शेतकरी या योजनेकरीता पात्र आहेत. लाभाचे स्वरूप :- मोनोक्रोटोफॉस, फोरेट, एन्डोसल्फान , कार्बेंडाझिम, क्लोरोपायरीफॉस इत्या औषधींचा (फवारणी / बिज प्रक्रियेकरिता ) 50 टक्के अनुदानावर पूरवठा करण्यात येतो. उर्वरित 50 टक्के रक्कम शेतक-यांना स्वतः भरावी लागेल.
अर्ज करण्याची पध्दत :- विहित नमुन्यातील अर्ज शेतक-यांनी आवश्यक त्या कागदपत्रासह संबंधीत संवर्ग विकास अधिकारी, पंचायत समिती कडे सादर करावा. (अर्जाचा विहित नमूना कृषि विभाग, पं. स. यांचेकडे उपलब्ध आहे.)
अर्जासोबत लागणारे कागदपत्रे :- तलाठी/कृषि सहाय्यकांचे विहित नमून्यातील पीक पेरा प्रमाणपत्र, शेतजमिनीचा 7/12 व गाव नमूना 8 (अ)2) ऑईल इंजिन / विद्यूत पंप / पेट्रोडिझेल इंजिनवर 50 टक्के अनुदान देणे .

2) ऑईल इंजिन / विद्यूत पंप / पेट्रोडिझेल इंजिनवर 50 टक्के अनुदान देणे .
उद्देश :- उपलब्ध जलसाठयाचा वापर करुन सिंचन क्षेत्रात वाढ व पिकांची उत्पादन वाढ करण्याकरीता सदर योजनेतून शेतकर्यांचना 50 टक्के अनुदावर डिझेल इंजिन / विद्यूत पंप संच / पेट्रोडिझेल इंजिनचा पूरवठा करण्यात येतो.
लाभार्थी निकष :- जिल्हयातील ओलीताची सोय असलेले सर्व घटकातील व वर्गवारीतील शेतकरी या योजनेकरीता पात्र आहेत.
लाभाचे स्वरूप :- कृषि विभाग महाराष्ट्र शासनमान्यता प्राप्त उत्पादक कंपनीचे डिझेल इंजिन / विद्यूत पंप संच / पेट्रोडिझेल इंजिन 50 टक्के अनुदानावर पूरविण्यात येते. उर्वरित 50 टक्के रक्कम शेतक-यास स्वतः भरावी लागेल.
अर्ज करण्याची पध्दतः- विहित नमुन्यातील अर्ज शेतक-यांनी आवश्यक त्या कागदपत्रासह संबंधीत संवर्ग विकास अधिकारी, पंचायत समिती कडे सादर करावा. (अर्जाचा विहित नमूना कृषि विभाग, पं. स. यांचेकडे उपलब्ध आहे.)
अर्जासोबत लागणारे कागदपत्रे :- शेतजमिनीचा 7 /12 (पाण्याच्या स्त्रोत्राची नोंद असलेला ) व गाव नमूना 8 (अ), विद्यूत पंपा करीता डिमांड भरल्याचे प्रमाणपत्र, पाणी परवाना इत्यादी.3) पिक संरक्षण अंतर्गत 75 टक्के अनुदानावर ताडपत्री पूरविणे.

3) पिक संरक्षण अंतर्गत 75 टक्के अनुदानावर ताडपत्री पूरविणे.
उद्देश :- पावसापासुन पिकांचे संरक्षण करण्याकरीता 75 टक्के अनुदानावर शेतक-यांना ताडपत्री पूरविणे.
लाभार्थी निकष :- जिल्हयातील सर्व घटकातील व वर्गवारीतील शेतकरी या योजनेकरीता पात्र आहेत.
लाभाचे स्वरूप :- 6 मी X 6 मी आकाराची (टारपोलीन ) ताडपत्री 75 टक्के अनुदानावर पूरविण्यात येते. उर्वरित 25 टक्के रक्कम शेतक-यास स्वतः भरावी लागेल.
अर्ज करण्याची पध्दतः- विहित नमुन्यातील अर्ज शेतक-यांनी आवश्यक त्या कागदपत्रासह संबंधीत संवर्ग विकास अधिकारी, पंचायत समिती कडे सादर करावा. (अर्जाचा विहित नमूना कृषि विभाग, पं. स. यांचेकडे उपलब्ध आहे.)
अर्जासोबत लागणारे कागदपत्रे :- शेतजमिनीचा 7 /12 व गाव नमूना 8 (अ)4) सिंचनाकरीता 50 % अनुदानावर पाईप पुरविणे.

4) सिंचनाकरीता 50 % अनुदानावर पाईप पुरविणे.
उद्देश :- पाण्याचा स्त्रोतापासुन प्रक्षेत्रावर पाणी नेणे व पाण्याची बचत करुन उत्पादनात वाढ करणे.
लाभार्थी निकष :- ओलीताच्या साधनांची सोय असलेले जिल्हयातील सर्व घटकातील व वर्गवारीतील शेतकरी या करीता पात्र आहेत.
लाभाचे स्वरूप :- शासनाने मंजुर केलेल्या दराने ,50 % अनुदानावर प्रति शेतकरी जास्तीत जास्त 50 नग या प्रमाणे पाईपचा पुरवठा करण्यात येईल.
अर्ज करण्याची पध्दत :- विहित नमुन्यातील अर्ज शेतक-याने आवश्यक त्या कागदपत्रासह संबंधीत संवर्ग विकास अधिकारी, पंचायत समिती कडे सादर करावा. (अर्जाचा विहित नमूना कृषि विभाग,पं. स. यांचेकडे उपलब्ध आहे.)
अर्जासोबत लागणारे कागदपत्रे :- शेतजमिनीचा 7 /12 व गाव नमूना 8 (अ), सिंचन साधन उपलब्धता.5) कृषि मेळावा, प्रदर्शनी, कृषि दिन तथा व्याख्यानमाला आयोजीत करणे.

5) कृषि मेळावा, प्रदर्शनी, कृषि दिन तथा व्याख्यानमाला आयोजीत करणे.
उद्देश :- शेतक-यांना कृषि विषयक आधुनिक तंत्रज्ञान व विविध अनुदान योजनांची माहिती प्राप्त होण्याकरीता पं. स. / जिल्हा स्तरावर शेतकरी मेळावे घेण्यात येतात. तसेच कृषि दिन साजरा करण्यात येतो.
लाभार्थी निकष :- सर्व घटकातील व वर्गवारीतील शेतकरी या योजनेकरीता पात्र आहेत. 
लाभाचे स्वरूप :- कृषि मेळावे, प्रदर्शनी ,कृषि दिन तथा व्याख्यायनमालेच्या माध्यमातून शेतक-यांना शेती विषयक आधुनिक तंत्रज्ञान तथा विविध अनुदानीत योजनांबाबत नि:शुल्क प्रबोधन केल्या जाते.
अर्ज करण्याची पध्दतः- अर्ज करण्याची आवश्कता नाही. सर्व शेतक-यांना प्रवेश दिला जातो.6) शेती उत्पादन वाढीसाठी 75% अनुदानावर शेडनेट पुरविणे.

6) शेती उत्पादन वाढीसाठी  75% अनुदानावर शेडनेट पुरविणे.
उद्देश :- जिल्हयातील शेतक-यांना भाजीपाला ,फुले यांच्या लागवडीकरीता व रोपवाटीका तयार करण्याकरीता प्रोत्साहन देणे. 
लाभार्थी निकष :- ओलीताची सोय असलेले जिल्हयातील सर्व घटकातील व वर्गवारीतील शेतकरी या करीता पात्र राहतील.
लाभाचे स्वरूप :- प्रति शेतकरी 400 वर्ग मी. क्षेत्राचे मर्यादेत 75 % अनुदानावर हिरवी शेडनेट पुरविण्यात येईल उर्वरीत 25 % रक्कम शेतक-याना भरणा करावी लागेल.
अर्ज करण्याची पध्दत :- विहित नमुन्यातील अर्ज शेतक-याने आवश्यक त्या कागदपत्रासह संबंधीत संवर्ग विकास अधिकारी, पंचायत समिती कडे सादर करावा. (अर्जाचा विहित नमूना कृषि विभाग,पं. स. यांचेकडे उपलब्ध आहे.)
अर्जासोबत लागणारे कागदपत्रे :- शेतजमिनीचा 7 /12 व गाव नमूना 8 (अ) व सिंचनाची सोय असल्याचा दाखला.7) शेतक-याना 75 टक्के अनुदानावर कुंपणासाठी तार व खांब पुरविणे.

7) शेतक-याना 75 टक्के अनुदानावर कुंपणासाठी तार व खांब पुरविणे.
उद्देश :- पिकाचे जनावरापासुन संरक्षण करण्याकरीता 75 टक्के अनुदानावर शेतक-यांना काटेरी तारेचे व खांबाचे वाटप करण्यात येते.
लाभार्थी निकष :- जिल्हयातील सर्व घटकातील व वर्गवारीतील शेतकरी या योजनेकरीता पात्र आहेत
लाभाचे स्वरूप :- प्रती लाभार्थी साधरणतः 200 किलो काटेरी तार व 30 नग खांब 75 टक्के अनुदानावर पूरविण्यात येते. उर्वरित 25 टक्के रक्कम शेतक-यास स्वतः भरावी लागते.
अर्ज करण्याची पध्दतः- विहित नमुन्यातील अर्ज शेतक-याने आवश्यक त्या कागदपत्रासह संबंधीत संवर्ग विकास अधिकारी, पंचायत समिती कडे सादर करावा. (अर्जाचा विहित नमूना कृषि विभाग, पं. स. यांचेकडे उपलब्ध आहे.) 
अर्जासोबत लागणारे कागदपत्रे :- शेतजमिनीचा 7 /12 व गाव नमूना 8 (अ)8) शेतक-यांना 75 टक्के अनुदानावर सेंद्रिय खताचे वाटप

8) शेतक-यांना  75 टक्के अनुदानावर सेंद्रिय खताचे वाटप :-
उद्देश :- सेंद्रिय शेतीकडे शेतक-याचा कल वाढविण्याकरता सदर योजनेतून जिल्हयातील शेतक-यांना 75 टक्के अनुदानावर सेंद्रिय खताचे वाटप करण्यात येते.
लाभार्थी निकष :- जिल्हयातील सर्व घटकातील व वर्गवारीतील शेतकरी या योजनेकरीता पात्र आहेत.
लाभाचे स्वरूप :- जैविक खते, सेंद्रिय खते इत्यादिंवर 75 टक्के अनुदानावर पूरविण्यात येते. उर्वरित 25 टक्के रक्कम शेतक-यास स्वतः भरावी लागेल.
अर्ज करण्याची पध्दतः- विहित नमुन्यातील अर्ज शेतक-यांनी आवश्यक त्या कागदपत्रासह संबंधीत संवर्ग विकास अधिकारी, पंचायत समिती कडे सादर करावा. (अर्जाचा विहित नमूना कृषि विभाग, पं. स. यांचेकडे उपलब्ध आहे.)
अर्जासोबत लागणारे कागदपत्रे :- शेतजमिनीचा 7 /12 व गाव नमूना 8 (अ)9) हिरवळीचे खतावर 75 टक्के अनुदान देणे

9)  हिरवळीचे खतावर 75 टक्के अनुदान देणे. :-
उद्देशः- सेंद्रिय शेतीकडे शेतक-यांचा कल वाढविण्याकरीता सदर योजनेतून हिरवळीच्या पिकाच्या बियाण्यांवर 75 टक्के अनुदान देण्यात येते.
लाभार्थी निकष :- जिल्हयातील सर्व घटकातील व वर्गवारीतील शेतकरी या योजनेकरीता पात्र आहेत.
लाभाचे स्वरूप :- हिरवळीच्या खताकरीता लागणारे बियाणे जसे ढेंच्या / बोरू या बियाण्याचा पूरवठा शेतक-यांना 75 टक्के अनुदानावर करण्यात येते. उर्वरित 25 टक्के रक्कम शेतक-यास स्वतः भरावी लागते.
अर्ज करण्याची पध्दतः- विहित नमुन्यातील अर्ज शेतक-याने आवश्यक त्या कागदपत्रासह संबंधीत संवर्ग विकास अधिकारी, पंचायत समिती कडे सादर करावा. (अर्जाचा विहित नमूना कृषि विभाग, पं. स. यांचेकडे उपलब्ध आहे.)
अर्जासोबत लागणारे कागदपत्रे :- शेतजमिनीचा 7/12 व गाव नमूना 8 (अ)10) शेतक-यांना 75 टक्के अनुदानावर सौर कंदील पूरविणे.

10)  शेतक-यांना 75 टक्के अनुदानावर सौर कंदील पूरविणे.-
उद्देशः- अपारंपारीक उर्जा स्त्रोतांचा वापर करुन विजेच्या टंचाईवर मात करणे.
लाभार्थी निकष :- जिल्हयातील सर्व घटकातील व वर्गवारीतील शेतकरी या योजनेकरीता पात्र आहेत. 
लाभाचे स्वरूप :- सौर कंदील 75 टक्के अनुदानावर पूरविण्यात येते. उर्वरित 25 टक्के रक्कम शेतक-यास स्वतः भरावी लागते.
अर्ज करण्याची पध्दतः - विहित नमुन्यातील अर्ज शेतक-याने आवश्यक त्या कागदपत्रासह संबंधीत संवर्ग विकास अधिकारी, पंचायत समिती कडे सादर करावा. (अर्जाचा विहित नमूना कृषि विभाग, पं. स. यांचेकडे उपलब्ध आहे.)
अर्जासोबत लागणारे कागदपत्रे :- शेतजमिनीचा 7 /12 व गाव नमूना 8 (अ)11) सिंचनाकरिता तुषार सिंचनावर 75 % अनुदान देणे.

11) सिंचनाकरिता तुषार सिंचनावर 75 % अनुदान देणे. :-
उद्देशः- सिंचनाच्या आधुनिक पध्दतीचा वापर करुन पाण्याची बचत करणे व सिंचन क्षेत्रात वाढ करुन शेती उत्पादन वाढविणे.
लाभार्थी निकष :- सिंचन स्त्रोत व उपसा साधन (विदयूत पंप/डिझेल इंजिन /पेट्रोकेरोसिन इंजिन) असलेले सर्व वर्गवारीतील शेतक-याना 75% अनुदानावर 1 हे. क्षेत्राचे मर्यादेत तुषार सिंचन संचावर अनुदान देण्यात येईल.
लाभाचे स्वरूप :- कृषि खात्याकडून मान्यता असलेल्या उत्पादक कंपनीचा तुषार सिंचन संच लाभार्थ्यास खरेदी करता येईल. खरेदी नंतर शासन मान्य किमंतीवर 75% अनुदान देण्यात येईल. उर्वरित रक्कम शेतक-यास स्वतः भरुन संच खरेदी करावा लागेल.
अर्ज करण्याची पध्दतः- विहित नमुन्यातील अर्ज संबंधीत सं.वि.अ. पं.स. कडे सादर करावा. जि.प. कडून मंजुरी प्राप्त झाल्यावरच शेतक-यांनी अनुदान वजा जाता उर्वरित रक्कम अथवा पूर्ण रक्कम भरणा करुन तुषार सिंचन संच खरेदी करावा लागेल. तदनंतर तपासणीत पात्र आढळल्यावरच त्यावर अनुदान देय राहील.
अर्जासोबत लागणारे कागदपत्रे :- शेतजमिनीचा 7/12 (सिंचन स्त्रोत व उपसा साधन असल्याच्या नोंदीसह), गांव नमुना 8(अ), नकाशा, विदयुत पंप असल्यास, अलीकडच्या काळातील देयक, खरेदी केलेल्या अधिकृत कंपनीचे /विक्रेत्याचे बिल, कृ.अ. यांचे तपासणी प्रमाणपत्र, तुषार संच कार्यान्वीत असल्याबाबतचे शेतक-याचे पत्र, शेतक-याने उत्पादक कंपनीस तथा विक्रेत्यास अदा केलेल्या रक्कमेचा तपशिल, तुषार सिंचन संचाचा आराखडा, शेतकरी व उत्पादक कंपनी / प्रतिनिधी यांच्या मधील करारनामा.12) भात, सोयाबीन व हरभरा पिकांवर येणा-या किडीच्या नियंत्रणासाठी 90% अनुदानावर कामगंध सापळे पुरवठा करणे.

12) भात, सोयाबीन व हरभरा पिकांवर येणा-या किडीच्या नियंत्रणासाठी 90% अनुदानावर कामगंध सापळे पुरवठा करणे.:-
उद्देशः-  भात, सोयाबीन, हरभरा पिकावर येणा-या किडींच्या सर्वेक्षणाच्या आधारे नियंत्रण करून पिक उत्पादनात वाढ करणे.
लाभाचे स्वरूप :-  सबंधित पिक क्षेत्राकरीता प्रती हेक्टर 5 कामगंध सापळे 90% अनुदानावर पुरविण्यात येतील उर्वरीत 10% रक्कम शेतक-यास स्वतः भरावी लागेल.
अर्ज करण्याची पध्दतः-  विहित नमुन्यातील अर्ज शेतक-याने आवश्यक त्या कागदपत्रासह संबंधीत संवर्ग विकास अधिकारी, पंचायत समिती कडे सादर करावा. (अर्जाचा विहित नमूना कृषि विभाग, पं. स. यांचेकडे उपलब्ध आहे.) 
अर्जासोबत लागणारे कागदपत्रे :- शेतजमिनीचा 7 /12 व गाव नमूना 8 (अ)13) राष्ट्रीय बॉयोगॅस विकास कार्यक्रम अंतर्गत संयंत्र बसविणे करिता ( रु 10000/- मर्यादेत) अतिरिक्त अनुदान देणे :-

13) राष्ट्रीय बॉयोगॅस विकास कार्यक्रम अंतर्गत संयंत्र बसविणे करिता ( रु 10000/- मर्यादेत) अतिरिक्त अनुदान देणे :-
उद्देश :- अपारंपारीक उर्जास्त्रोता अंतर्गत बॉयोगॅस सयंत्राचा जास्तीत जास्त शेतक-यांनी लाभ घ्यावा. याकरिता शासकीय योजने व्यतिरिक्त या योजनेतून प्रोत्साहनपर अनुदान दिल्या जाते. लाभार्थी निकष :-  जनावरे व स्वतःची जागा असणारा सर्वसाधारण घटकातील व वर्गवारीतील लाभधारक अथवा अल्प-भूधारक शेतकरी असावा. 
लाभाचे स्वरूप :-  शासकीय योजनेतून बॉयोगॅस सयंत्र घेणा-या लाभार्थ्यास प्रती सयंत्र रु.10000/- अतिरिक्त अनुदान देण्यात येते.
अर्ज करण्याची पध्दतः-  विहित नमुन्यातील अर्ज शेतक-याने आवश्यक त्या कागदपत्रासह संबंधीत संवर्ग विकास अधिकारी, पंचायत समिती कडे सादर करावा. (अर्जाचा विहित नमूना कृषि विभाग,पं. स.यांचेकडे उपलब्ध आहे.)
अर्जासोबत लागणारे कागदपत्रे :- विहित नमुन्यातील   तलाठी प्रमाणपत्रब) मागासवर्गीयांच्या कल्याणकारी योजना (20% अनुदान) 1) मागासवर्गीयांना बॉयोगॅस प्लॉन्ट साठी पूरक अनुदान रुपये 10000/- चे मर्यादेत अर्थसहाय्य देणे.

ब)  मागासवर्गीयांच्या कल्याणकारी योजना (20% अनुदान)  1) मागासवर्गीयांना बॉयोगॅस प्लॉन्ट साठी पूरक अनुदान रुपये 10000/- चे मर्यादेत अर्थसहाय्य देणे.
उद्देश :- अपारंपारीक उर्जेचा वापर वाढविण्याकरीता बॉयोगॅस संयत्राचा जास्तीत जास्त शेतक-यांनी लाभ घेण्याकरिता प्रोत्साहन देणे.
लाभार्थी निकष :-  जनावरे व स्वतःची जागा असणारा अनुसूचित जाती , जमाती,  अनु भटक्या विमुक्त जाती, अथवा जमातीचा लाभार्थी असावा. 
लाभाचे स्वरूप :- शासकिय योजनेतून बॉयोगॅस सयंत्र घेणा-या लाभार्थ्यास प्रती सयंत्र रु.10000/- अतिरिक्त अनुदान देण्यात येते.
अर्ज करण्याची पध्दतः- विहित नमुन्यातील अर्ज शेतक-याने आवश्यक त्या कागदपत्रासह संबंधीत संवर्ग विकास अधिकारी, पंचायत समिती कडे सादर करावा. (अर्जाचा विहित नमूना कृषि विभाग, पं. स. यांचेकडे उपलब्ध आहे.)
अर्जासोबत लागणारे कागदपत्रे :- विहित नमुन्यातील तलाठी प्रमाणपत्र, जातीचा दाखला 
 टिप :- ( इतर योजनेतून सयंत्र बांधकामाकरिता लाभार्थ्यास अतिरिक्त अनुदान मंजुर झाल्यास सदर योजनेतून अनुदान मिळणार नाही. ).2) शेतीच्या कुंपणाकरीता 90 टक्के अनुदानावर काटेरीतार व खांब पुरविणे.

2) शेतीच्या कुंपणाकरीता 90 टक्के अनुदानावर काटेरीतार व खांब  पुरविणे.
उद्देश :- पिकाचे जनावरापासुन संरक्षण करण्याकरीता काटेरी तार लावण्याकरीता 90 टक्के अनुदानावर शेतक-यांना खांबाचे वाटप करण्यात येते. 
लाभार्थी निकष :- जिल्हयातील अ.जा., अ.ज., वि.जा. अथवा, भ.ज. चे शेतकरी योजनेकरिता पात्र आहेत.
लाभाचे स्वरूप :- साधारणता दोन क्विंटल काटेरी तार सोबत 30 नग खांब 90 टक्के अनुदानावर पूरविण्यात येते. उर्वरित 10 टक्के रक्कम शेतक-यास स्वतः भरावी लागते.
अर्ज करण्याची पध्दतः- विहित नमुन्यातील अर्ज शेतक-याने आवश्यक त्या कागदपत्रासह संबंधीत संवर्ग विकास अधिकारी, पंचायत समिती कडे सादर करावा. (अर्जाचा विहित नमूना कृषि विभाग, पं. स. यांचेकडे उपलब्ध आहे.)
अर्जासोबत लागणारे कागदपत्रे :- शेतजमिनीचा 7/12 व गाव नमूना 8 (अ) व जातीचा दाखला.3) मागासवर्गीय शेतक-यांना 90% अनुदानावर शेतीची सुधारीत अवजारे पुरविणे.

3) मागासवर्गीय शेतक-यांना 90% अनुदानावर शेतीची सुधारीत अवजारे पुरविणे.
उद्देश :- शेतीची मशागत आधुनिक पदधतीने करुन वेळ व श्रमाची बचत करणे व पर्यायाने शेती उत्पादनात वाढ करणे. 
लाभार्थी निकष :- जिल्हयातील अ.जा., अ.ज., वि.जा. अथवा, भ.ज. चे शेतकरी योजनेकरिता पात्र आहेत.
लाभाचे स्वरूप :- शेतीची सुधारीत अवजारे जसे, नांगर, वखर, डवरा, तिफण, स्वंयचलित तिफण इत्यादी सुधारीत अवजारे 90 टक्के अनुदानावर पूरविण्यात येते. उर्वरित 10 टक्के रक्कम शेतक-यास स्वतः भरावी लागते. शेतक-यांना सदर योजनेतून प्रती शेतकरी रू 10000/- चे मर्यादेत अनुदान देण्यात येईल. शेतक-यांच्या मागणी नुसार रुपये 10000/- चे मर्यादेत साहित्यांची उचल करता येईल.
अर्ज करण्याची पध्दतः-विहित नमुन्यातील अर्ज शेतक-याने आवश्यक त्या कागदपत्रासह संबंधीत संवर्ग विकास अधिकारी, पंचायत समिती कडे सादर करावा. (अर्जाचा विहित नमूना कृषि विभाग, पं. स. यांचेकडे उपलब्ध आहे.) 
अर्जासोबत लागणारे कागदपत्रे :-शेतजमिनीचा 7/12 व गाव नमूना 8 (अ) व जातीचा दाखला.4) सिंचनाकरिता तुषार सिंचनावर 90% अनुदान देणे.

4) सिंचनाकरिता तुषार सिंचनावर 90% अनुदान देणे.
उद्देश :- सिंचनाच्या आधुनिक पध्दतीचा वापर करुन पाण्याची बचत करणे व सिंचन क्षेत्रात वाढ करणे.
लाभार्थी निकष :- सिंचन स्त्रोत व उपसा साधन (विदयूत पंप/डिझेल इंजिन /पेट्रोकेरोसिन इंजिन) असलेले अ.जा. अ.ज. भ.वि.जा. अशा जातीचा शेतकरी असावा.
लाभाचे स्वरूप :- कृषि खात्याकडून मान्यता असलेल्या उत्पादक कंपनीचा कंपनीकडून अथवा अधिकृत विक्रेत्याकडून तुषार सिंचन संच लाभार्थ्यास खरेदी करता येईल. खरेदी नंतर शासन मान्य किमंतीवर 90 % अनुदान देण्यात येईल. उर्वरित रक्कम शेतक-यास स्वतः भरुन संच खरेदी करावा लागेल.
अर्ज करण्याची पध्दतः- विहित नमुन्यातील अर्ज संबंधीत सं.वि.अ. यांचे नावे संबंधीत पं.स. कडे सादर करावा. जि.प. कडून मंजुरी प्राप्त झाल्यावरच शेतक-यांनी अनुदान वजा जाता उर्वरित रक्कम अथवा पूर्ण रक्कम भरणा करुन तुषार सिंचन संच खरेदी करावा लागेल. तदनंतर तपासणीत पात्र आढळल्यावरच त्यावर अनुदान देय राहील.
अर्जासोबत लागणारे कागदपत्रे :-शेतजमिनीचा 7 /12 (सिंचन स्त्रोत व उपसा साधन असल्याच्या नोंदीसह), गांव नमुना 8(अ), नकाशा, विदयुत पंप असल्यास, अलीकडच्या काळातील देयक, जातीचा दाखला, खरेदी केलेल्या अधिकृत कंपनीचे /विक्रेत्याचे बिल, कृ.अ. यांचे तपासणी प्रमाणपत्र, तुषार संच कार्यान्वीत असल्याबाबतचे शेतक-यांचे पत्र, शेतक-यांने उत्पादक कंपनीस अदा केलेल्या रक्कमेचा तपशिल, तुषार सिंचन संचाचा आराखडा, शेतकरी व उत्पादक कंपनी / प्रतिनिधी यांच्या मधील करारनामा.(क) 7 टक्के वन महसूल अनुदान योजना 1) राष्ट्रीय बॉयोगॅस विकास कार्यक्रम अंतर्गत सयंत्र बांधकामा करिता पूरक अनुदान रुपये 10000/- चे मर्यादेत देणे.

(क) 7 टक्के वन महसूल अनुदान योजना  1) राष्ट्रीय बॉयोगॅस विकास कार्यक्रम अंतर्गत सयंत्र बांधकामा करिता पूरक अनुदान रुपये 10000/- चे मर्यादेत देणे.
उद्देश :- अपारंपारीक उर्जास्त्रोता अंतर्गत बॉयोगॅस सयंत्राचा जास्तीत जास्त शेतक-यांनी लाभ घ्यावा. याकरिता शासकिय योजने व्यतिरिक्त या योजनेतून प्रोत्साहनपर अनुदान दिल्या जाते. लाभार्थी निकष :- जनावरे व स्वतःची जागा असणारा वन ग्रामातील अनुसूचित जाती जमाती, भटक्या विमुक्त जाती, दारिद्र रेषेखालील लाभधारक अथवा अल्प-भूधारक शेतकरी असावा. लाभाचे स्वरूप :- शासकिय योजनेतून बॉयोगॅस सयंत्र घेणा-या लाभार्थ्यास प्रती सयंत्र रु.10000/- अतिरिक्त अनुदान देण्यात येते.
अर्ज करण्याची पध्दतः- विहित नमुन्यातील अर्ज शेतक-याने आवश्यक त्या कागदपत्रासह संबंधीत संवर्ग विकास अधिकारी, पंचायत समिती कडे सादर करावा. (अर्जाचा विहित नमूना कृषि विभाग, पं. स. यांचेकडे उपलब्ध आहे.)
अर्जासोबत लागणारे कागदपत्रे :- विहित नमुन्यातील   तलाठी प्रमाणपत्रड) जिल्हा निधी योजना -- 1) राष्ट्रीय बॉयोगॅस विकास कार्यक्रम अंतर्गत सयंत्र बांधकामा करिता पुरक अनुदान देणे.

ड) जिल्हा निधी योजना -- 1)  राष्ट्रीय बॉयोगॅस विकास कार्यक्रम अंतर्गत सयंत्र बांधकामा करिता पुरक अनुदान देणे.
उद्देश :- अपारंपारीक उर्जास्त्रोता अंतर्गत बॉयोगॅस सयंत्राचा जास्तीत जास्त शेतक-यांनी लाभ घ्यावा. याकरिता शासकिय योजने व्यतिरिक्त या योजनेतून प्रोत्साहनपर अनुदान दिल्या जाते. लाभार्थी निकष :-  जनावरे व स्वतःची जागा असणारा सर्वसाधारण घटकातील व वर्गवारीतील लाभधारक अथवा अल्प-भूधारक शेतकरी असावा.
लाभाचे स्वरूप :- शासकिय योजनेतून बॉयोगॅस सयंत्र घेणा-या लाभार्थ्यास प्रती सयंत्र रु.10000/- अतिरिक्त अनुदान देण्यात येते.
अर्ज करण्याची पध्दतः- विहित नमुन्यातील अर्ज शेतक-याने आवश्यक त्या कागदपत्रासह संबंधीत संवर्ग विकास अधिकारी, पंचायत समिती कडे सादर करावा.(अर्जाचा विहित नमूना कृषि विभाग, पं. स. यांचेकडे उपलब्ध आहे.)
अर्जासोबत लागणारे कागदपत्रे :- विहित नमुन्यातील तलाठी प्रमाणपत्र(इ) शासकिय योजना -- 1) केन्द्र पुरस्कृत राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रम

(इ) शासकिय योजना --  1) केन्द्र पुरस्कृत राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रम
उद्देश :- अ) शेणखतापासुन निर्माण झालेल्या गॅसचा उपयोग स्वयंपाकासाठी करणे व दुर्गधीत विष्ठेचे रुपांतर उत्कृष्ट सेंद्रिय खतामध्ये करणे. ब) रोगजंतु पसरविणा-या जंतुचा नाश करणे व प्रदुषणास आळा बसुन आरोग्यदायी वातावरण निर्माण करणे. क) बायोगॅस संयंत्र प्रस्थापित करुन ग्रामीण व शहरी भागातील लोकांच्या सामाजिक आरोग्यात सुधारणा घडविणे. ड) ग्रामीण भागातील स्त्रियांची अतित्रासदायक कामापासुन मुक्तता करणे आणि जंगल तोडीस आळा घालुन सामाजिक व आर्थिक विकासात हातभार लावणे
योजनेचे निकष/अटि शर्ती :-लाभार्थ्यीकडे स्वतःचे मालकीची जागा व पुरेसे जनावरे उपलब्ध असणे आवश्यक आहे .योजनेचा पुर्वी लाभ घेतलेला नसावा.
लाभाचे स्वरूप :- केन्द्र शासनाकडुन लाभार्थी बायोगॅस सयंत्राचे बांधकाम करुन संयंत्र कार्यान्वीत केल्यानंतर 2 घ.मी.च्या संयंत्रासाठी रु.8000/- व त्यास जोडुन शौचालयास बांधकाम केल्यास अतिरिक्त अनुदान रु.1000/- मंजुर करुन देण्यात येते.
अर्ज करण्याची पध्दतः- लाभार्थीने विहित नमुन्यातील अर्ज लिहून ग्रामपंचायतीच्या शिफारशीसह संबंधीत पंचायत समिती कडे सादर करावा.
अर्जासोबत लागणारे कागदपत्रे :- विहित नमुन्यातील अर्ज,लाभार्थी अल्प/अत्यल्प/भुमीहीन शेतमजुर असल्यास त्यासाठी तलाठी प्रमाणपत्र जोडावे यावे लाभार्थी अनुसूचित जातीचा/अनुसचित जमाती या संवर्गातील असल्यास प्राधिकृत अधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र जोडावे.2) अनुसूचित जाती उपयोजना-

2) अनुसूचित जाती उपयोजना-
उद्देश :- दारिद्रय रेषेखाली असणा-या अनुसूचित जाती / नवबौध्द शेतक-यांचे उत्पन्न वाढवुन त्यांना दारिद्रय रेषेच्या वर आणने व आर्थिक उन्नती करणे .
लाभार्थी निवडीचे निकष :- 1) लाभार्थी हा अनुसूचित जाती / नवबौध्द शेतकरी असला पाहिजे, 2) दारिद्रय रेषेखाली असलेल्या अनुसूचीत जाती/ नवबौध्द शेतक-यांना प्रथम प्राधान्य आहे, 3) ज्या शेतक-यां जवळ 6 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी शेतजमीन आहे, 4) वार्षिक उत्पन्नाची मर्यादा रु. 50,000/-आहे.
लाभाचे स्वरूप :- या योजने अंतर्गत जमीन सुधारणा, निविष्ठा पुरवठा, पिक संरक्षण /शेतीची सुधारित औजारे, बैलजोडी, बैलगाडी / रेडेजोडी, इनवेल बोरींग, जुनी विहिर दुरूस्ती, पाईप लाईन, पंपसेट, ताडपत्री, तुषारसंच, ठिंबक संच,नविन विहीर इत्यादी बाबीसाठी अनुसूचित जाती/नवबौध्द शेतक-यांना अनुदान देण्यात येते.
लाभाची मर्यादा :- जे लाभार्थी नविन विहिर या घटकाचा लाभ घेणार आहे त्यांचेसाठी प्रति लाभार्थी अनुदान कमाल मर्यादा रु.70,000/- ते रु.1,00,000/- आहे व जे लाभार्थी नविन विहीर या घटकांचा लाभ घेणार नाही त्यांचेसाठी अनुदानाची कमाल मर्यादा रु. 50,000/- आहे.
अर्ज करण्याची पध्दतः- अनुसूचित जाती/नवबौध्द शेतक-यांनी विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रासह संबंधित संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती यांचे मार्फत कृषि विभाग जि. प. चंद्रपूर यांचेकडे अर्ज सादर करावे. (अर्जाचा विहित नमूना कृषि विभाग,पं. स. यांचेकडे उपलब्ध आहे.)
अर्जासोबत लागणारे कागदपत्रे :-1) जातीचा दाखला, 2)शेतजमीन धारणेचा 7 /12 व गाव नमूना 8 (अ) दाखला, 3) शेतकरी दारिद्रय रेषेखाली असल्यास त्याचा दाखला, 4) उत्पन्नाचा दाखला (सर्व मार्गानी मिळणारे वार्षीक उत्पन्न रू. 50000/- पेक्षा जास्त नसावे.)3) योजनेचे नांव :- आदिवासी उपयोजना (क्षेत्रांतर्गत)

3) योजनेचे नांव  :- आदिवासी उपयोजना (क्षेत्रांतर्गत)
योजनेचा उद्देश :- दारिद्र्य रेषेखाली असणा-या आदिवासी शेतक-याचे उत्पन्न वाढवून त्यांना दारिद्र्य रेषेवर आणने व आर्थिक उन्नती करणे .
लाभार्थी निवडीचे निकष :- 1) लाभार्थी हा आदिवासी/ अनुसूचीत जमातीचा शेतकरी असला पाहिजे, 2) दारिद्र्य रेषेखाली असलेल्या आदिवासी/अनुसूचीत जमातीच्या शेतक-यांना प्रथम प्राधान्य आहे, 3) ज्या शेतक-याजवळ 6 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी शेतजमीन आहे, 4) वार्षिक उत्पन्नाची मर्यादा रु.25,000/-आहे.
लाभाचे स्वरूप :-या योजनेअंतर्गत जमीन सुधारणा, निविष्ठा पुरवठा, पिक संरक्षण/शेतीची सुधारित औजारे, बैलजोडी, बैलगाडी/रेडेजोडी, इनवेल बोरींग,जुनी विहीर दुरूस्ती, पाईप लाईन, पंपसेट, तुषारसंच, ठिंबक संच,नवीन विहीर इत्यादी बाबीसाठी आदिवासी/ अनुसूचीत जमातीचा शेतक-यांना अनुदान देण्यात येते.
लाभाची मर्यादा :- जे लाभार्थी नविन विहीर या घटकाचा लाभ घेणार आहे त्यांचेसाठी प्रति लाभार्थी अनुदान कमाल मर्यादा रु.70,000/- ते रु.1,00,000/- आहे व जे लाभार्थी नविन विहीर या घटकांचा लाभ घेणार नाही त्यांचेसाठी अनुदानाची कमाल मर्यादा रु. 50,000/- आहे.
अर्ज करण्याची पध्दतः- आदिवासी/ अनुसूचित जमातीच्या शेतक-यांना विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रासह संबंधित संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती यांचे मार्फत कृषि विभाग जि. प. चंद्रपूर यांचेकडे सादर करावे. (अर्जाचा विहित नमूना कृषि विभाग,पं. स. यांचेकडे उपलब्ध आहे.)
अर्जासोबत लागणारे कागदपत्रे :-1) जातीचा दाखला, 2)शेतजमीन धारणेचा 7/12 व गाव नमूना 8(अ) दाखला, 3) शेतकरी दारिद्रय रेषेखाली असल्यास त्याचा दाखला, 4) उत्पन्नाचा दाखला (सर्व मार्गानी मिळणारे वार्षीक उत्पन्न रू. 25,000/- पेक्षा जास्त नसावे.)4) आदिवासी उपयोजना (क्षेत्राबाहेरील)

4) आदिवासी उपयोजना (क्षेत्राबाहेरील)
उद्देश :- दारिद्रय रेषेखाली असणा-या आदिवासी शेतक-यांचे उत्पन्न वाढवुन त्यांना दारिद्रय रेषेचे वर आणने व आर्थिक उन्नती करणे.
लाभार्थी निवडीचे निकष :- 1) लाभार्थी हा आदिवासी/ अनुसूचीत जमातीचा शेतकरी असला पाहिजे 2) दारिद्रय रेषेखाली असलेल्या आदिवासी/ अनुसूचीत जमातीच्या शेतक-यांना प्रथम प्राधान्य आहे, 3) ज्या शेतक-याजवळ 6 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी शेतजमीन आहे, 4) वार्षिक उत्पन्नाची मर्यादा रु.25,000/-आहे.
लाभाचे स्वरूप :- या योजनेअंतर्गत जमीन सुधारणा, निविष्ठा पुरवठा, पिक संरक्षण/शेतीची सुधारित औजारे,बैलजोडी, बैलगाडी/रेडेजोडी, इनवेल बोरींग,जुनी विहीर दुरूस्ती, पाईप लाईन, पंपसेट,तुषारसंच, ठिबंक संच,नविन विहीर इत्यादी बाबीसाठी आदिवासी अनुसूचीत जमातीचा शेतक-यांना अनुदान देण्यात येते.
लाभाची मर्यादा :- जे लाभार्थी नविन विहीर या घटकाचा लाभ घेणार आहे त्यांचेसाठी प्रति लाभार्थी अनुदान कमाल मर्यादा रु.70,000/- ते रु.1,00,000/- आहे व जे लाभार्थी नविन विहीर या घटकांचा लाभ घेणार नाही त्यांचेसाठी अनुदानाची कमाल मर्यादा रु. 50,000/- आहे.
अर्ज करण्याची पध्दतः- आदिवासी/ अनुसूचित जमातीच्या शेतक-यांना विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रासह संबंधित संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती यांचे मार्फत कृषि विभाग जि. प. चंद्रपूर यांचेकडे सादर करावे. (अर्जाचा विहित नमूना कृषि विभाग,पं. स. यांचेकडे उपलब्ध आहे.)
अर्जासोबत लागणारे कागदपत्रे :-1) जातीचा दाखला, 2)शेतजमीन धारणेचा 7/12 व गाव नमूना 8(अ) दाखला, 3) शेतकरी दारिद्रय रेषेखाली असल्यास त्याचा दाखला, 4) उत्पन्नाचा दाखला (सर्व मार्गानी मिळणारे वार्षीक उत्पन्न रू. 25,000/- पेक्षा जास्त नसावे.)अधिकारी
Thumbuse

श्री.शंकर किरवे

कृषि विकास अधिकारी
07172-253011 , -
adozpchandrapur@gmail.com

कार्यादेश