Logo1
flag

विभाग व योजना

list-of-department
शिक्षण विभाग (प्राथमिक)

                चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागा मार्फत इयत्ता 1 ली ते 8 वी च्या मुलांना व मुलींना जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या माध्यमातून शिक्षण देण्यात येते. जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी (प्राथमिक) हे विभाग प्रमुख असून तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी हे तालुक्याचे विभाग प्रमुख असतात. इ. 1 ली ते इ. 8 वी च्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यसाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागा मार्फत केंद्र शासन पुरस्कृत व राज्यशासन पुरस्कृत अशा व जिल्हा निधी मधून माडेल स्कुल, नवरत्न पुरस्कार योजना, इको फ्रेंडली डेक्स बेंच योजना, संगणक पुरवठा, ई लर्निंग, शिष्यवृत्ती पुस्तकाचे वाटप, नोटबुकाचे वाटप, पाठयपुस्तके, मोफत गणवेष  व शाळा ईमारत , वर्गखोली बांधकाम, संराक्षण भिंत बांधकाम, रँम्प बांधकाम  किचनशेड बांधकाम ई. भौतीक सुविधा उपलब्ध करुन देण्यसाठी निधी उपलब्ध करुन दिला जातो. 

फोटो
4
योजना
अ) शासकिय योजना 1) समाजातील दुर्बल घटकातील मुलींना शाळेत नियमित येण्यासाठी उपस्थिती भत्ता

अ)  शासकिय योजना  1)   समाजातील दुर्बल घटकातील मुलींना शाळेत नियमित येण्यासाठी उपस्थिती भत्ता

उद्देश :- दुर्बल घटकातील मुलींना शाळेत नियमित येण्यासाठी उपस्थिती भत्ता 
लाभार्थी निकष :- प्रति विद्यार्थी 1 रु. प्रमाणे 
लाभाचे स्वरुप :- वैयक्तीक 
अर्ज करण्याची पध्दत :-शाळेतील हजेरीपटावरील विद्यार्थ्याची माहिती पंचायत समिती स्तरावरुन प्राप्त होते.2) प्राथमिक शाळातील अनु. जाती / जमातीच्या विद्यार्थ्यांना विशेष सवलती

2)  प्राथमिक शाळातील अनु. जाती / जमातीच्या विद्यार्थ्यांना विशेष सवलती
उद्देश : - प्राथमिक शाळातील अनु. जाती / जमातीच्या विद्यार्थ्यांना गणवेश खरेदी करणे 
लाभार्थी निकष :- गणवेशा करीता प्रति मुले 57.25 रु. प्रमाणे गणवेशा करीता प्रति मुली 69.75 रु. प्रमाणे
लाभाचे स्वरुप :- वैयक्तीक 
अर्ज करण्याची पध्दत :-शाळेतील हजेरीपटावरील विद्यार्थ्याची माहिती पंचायत समिती स्तरावरुन प्राप्त होते.3) दुर्बल घटकातील अनु.जाती/ अनु.जमाती च्या मुलींना शाळेत नियामित येण्यासाठी उपस्थिती भत्ता

3)   दुर्बल घटकातील अनु.जाती/ अनु.जमाती च्या मुलींना शाळेत नियामित येण्यासाठी उपस्थिती भत्ता -
उद्देश :- दुर्बल घटकातील अ.जा./ अ.ज. च्या मुलींना शाळेत नियामित येण्यासाठी उपस्थिती भत्ता लाभार्थी निकष :- प्रति विद्यार्थी 1 रु. प्रमाणे 
लाभाचे स्वरुप :- वैयक्तीक 
अर्ज करण्याची पध्दत :- शाळेतील हजेरीपटावरील विद्यार्थ्याची माहिती पंचायत समिती स्तरावरुन प्राप्त होते.4) शैक्षणिक दृष्टया मागासलेल्या भागातील अनु.जाती / अनु.जमातीच्या विद्यार्थ्यांनाविशेष सवलत

4)   शैक्षणिक दृष्टया मागासलेल्या भागातील अनु.जाती / अनु.जमातीच्या विद्यार्थ्यांनाविशेष सवलत -
उद्देश :- शैक्षणिक दृष्टया मागासलेल्या भागातील अनु. जाती / जमातीच्या विद्यार्थ्यांना गणवेश खरेदी करणे 
 लाभार्थी निकष :- गणवेशा करीता प्रति मुले 57.25 रु. प्रमाणे गणवेशाकरीता प्रति मुली 69.75 रु. प्रमाणे 
लाभाचे स्वरुप :- वैयक्तीक 
अर्ज करण्याची पध्दत :-शाळेतील हजेरीपटावरील विद्यार्थ्यांची माहिती पंचायत समिती स्तरावरुन प्राप्त होते.5) 103 विकास गटातील (प.स.मुल,सावली,गोंडपिपरी, पोभुर्णा, राजुरा) इयत्ता 1 ते 4 च्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व लेखन साहित्य

5)   103 विकास गटातील (प.स.मुल,सावली,गोंडपिपरी, पोभुर्णा, राजुरा) इयत्ता 1 ते 4 च्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व लेखन साहित्य-
उद्देश :- 103 विकास गटातील (पं.स.मुल,सावली,गोंडपिपरी, पोभुर्णा, राजुरा) इयत्ता 1 ते 4 च्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व लेखन साहित्य. 
लाभार्थी निकष :-  गणवेशा करीता प्रति मुले 57.25 रु. प्रमाणे गणवेशा करीता प्रति मुली 69.75 रु. प्रमाणे 
लाभाचे स्वरुप :- वैयक्तीक 
अर्ज करण्याची पध्दत :- शाळेतील हजेरीपटावरील विद्यार्थ्याची माहिती पंचायत समिती स्तरावरुन प्राप्त होते.6) समाजातील दुर्बल घटकातील मुलींना उपस्थीती भत्ता

6)  समाजातील दुर्बल घटकातील मुलींना उपस्थीती भत्ता-

उद्देश : - समाजातील दुर्बल घटकातील मुलींना उपस्थीती भत्ता. 
लाभार्थी निकष :- प्रति विद्यार्थी 1 रु. प्रमाणे 
लाभाचे स्वरुप :- वैयक्तीक 
अर्ज करण्याची पध्दत :- शाळेतील हजेरीपटावरील विद्यार्थ्याची माहिती पंचायत समिती स्तरावरुन प्राप्त होते.7) शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या भागातील अनु. जाती / जमाती च्या विद्यार्थ्याना विशेष सवलत

7)  शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या भागातील अनु. जाती / जमाती च्या विद्यार्थ्याना विशेष सवलत-
उद्देश :- शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या भागातील अनु. जाती / जमाती च्या विद्यार्थ्याना गणवेश खरेदी करणे 
लाभार्थी निकष :- गणवेशा करीता प्रति मुले 57.25 रु. प्रमाणे गणवेशा करीता प्रति मुली 69.75 रु. प्रमाणे 
लाभाचे स्वरुप :- वैयक्तीक 
अर्ज करण्याची पध्दत :-शाळेतील हजेरीपटावरील विद्यार्थ्यांची माहिती पंचायत समिती स्तरावरुन प्राप्त होते.ब) मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी 20 टक्के समाज कल्याण योजना 1) जि.प.प्राथमिक शाळेतील मागास वर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे पुस्तक पुरविणे.

ब)  मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी 20 टक्के समाज कल्याण योजना 1) जि.प.प्राथमिक शाळेतील मागास वर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे पुस्तक पुरविणे.
उद्देश :- जि.प.प्राथमिक शाळेतील मागास वर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे पुस्तक पुरविणे. लाभार्थी निकष :- विद्यार्थ्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे. 
 लाभाचे स्वरुप :- सार्वजनिक 
 अर्ज करण्याची पध्दत :- गटशिक्षणाधिकारी यांच्या कडून शाळेतील हजेरीपटावरील विद्यार्थ्यांची माहिती पंचायत समिती स्तरावरुन प्राप्त होते.2) जि.प.प्राथमिक शाळेतील वर्ग 2 ते 4 मधील अनु.जाती/जमाती/वि.भ.व इतर मागास वर्गीय विद्यार्थाना नोटबुक पुरविणे.

 2) जि.प.प्राथमिक शाळेतील वर्ग 2 ते 4 मधील अनु.जाती/जमाती/वि.भ.व इतर मागास वर्गीय विद्यार्थाना नोटबुक पुरविणे.-
उद्देश :- जि.प.प्राथमिक शाळेतील वर्ग 2 ते 4 मधील अनु.जाती/जमाती/वि.भ.व इतर मागासवर्गीय विद्यार्थाना नोटबुक पुरविणे. 
लाभार्थी निकष :- विद्यार्थ्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे. 
लाभाचे स्वरुप :- सार्वजनिक 
अर्ज करण्याची पध्दत :- गटशिक्षणाधिकारी यांच्या कडून शाळेतील हजेरीपटावरील विद्यार्थ्यांची माहिती पंचायत समिती स्तरावरुन प्राप्त होते.3) जि.प.व खाजगी अनुदानित शाळेतील इयत्ता 9 वी 10 मधील मागासवर्गीय हुशार विद्यार्थ्यांना मोफत पाठयपुस्तके पुरवठा करणे.

3) जि.प.व खाजगी अनुदानित शाळेतील इयत्ता 9 वी 10 मधील मागासवर्गीय हुशार विद्यार्थ्यांना मोफत पाठयपुस्तके पुरवठा करणे.-
उद्देश :- जि.प.व खाजगी अनुदानित शाळेतील इयत्ता 9 वी 10 मधील मागासवर्गीय हुशार विद्यार्थ्यांना मोफत पाठयपुस्तके पुरवठा करणे. 
लाभार्थी निकष :- विद्यार्थ्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे. 
लाभाचे स्वरुप :- सार्वजनिक 
अर्ज करण्याची पध्दत :- गटशिक्षणाधिकारी यांच्या कडून शाळेतील हजेरीपटावरील विद्यार्थ्यांची माहिती पंचयायत समिती स्तरावरुन प्राप्त होते.क) 7 टक्के वन महसूल अनुदान 1) जि.प.प्राथमिक शाळा इमारती,शिक्षक निवासस्थान, अपूर्ण कामे पूर्ण करणे, दुरुस्ती,तारेचे कुंपण

क) 7 टक्के वन महसूल अनुदान 1) जि.प.प्राथमिक शाळा इमारती, शिक्षक निवासस्थान, अपूर्ण कामे पूर्ण करणे, दुरुस्ती, तारेचे कुंपण-
उद्देश :- जि.प.प्राथमिक शाळा इमारती,शिक्षक निवासस्थान, अपूर्ण कामे पूर्ण करणे, दुरुस्ती, तारेचे कुंपण 
लाभार्थी निकष :- शाळांना भौतिक सुविधा उपलब्ध करणे. 
लाभाचे स्वरुप :- सार्वजनिक. 
अर्ज करण्याची पध्दत :- गटशिक्षणाधिकारी यांच्या कडून शाळेतील माहिती पंचायत समिती स्तरावरुन प्राप्त होते.ड) बाबा आमटे योजना (जिल्हा निधी)1) जिल्हा परिषद अंतर्गत जि.प. हायस्कूल मधील ग्रामिण भागातील 10 वी व 12 वी परीक्षेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना गुणानुक्रमे शिष्यवृत्ती देणे व प्रोत्साहित करणे.

ड)  बाबा आमटे योजना (जिल्हा निधी)1) जिल्हा परिषद अंतर्गत जि.प. हायस्कूल मधील ग्रामिण भागातील 10 वी व 12 वी  परीक्षेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना गुणानुक्रमे शिष्यवृत्ती देणे व प्रोत्साहित करणे.- 
उद्देश :- जिल्हा परिषद अंतर्गत जि.प. हायस्कूल मधील ग्रामिण भागातील 10 वी व 12 वी परीक्षेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना गुणानुक्रमे शिष्यवृत्ती देणे व प्रोत्साहित करणे. 
लाभार्थी निकष :- 1) 10 वी पास व दारिद्र रेषेखालील पाल्यांना पुढील उच्च शिक्षणासाठी प्रत्येकी 3000/- रोख 2) 10 वी व 12 वी परीक्षेत गुणवत्ता प्राप्त पुरस्कार गुणानुक्रमे 1,2,3 क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना 
लाभाचे स्वरुप :- सार्वजनिक
अर्ज करण्याची पध्दत :- गशिक्षणाधिकारी यांच्या कडून शाळेतील माहिती पंचायत समिती स्तरावरुन प्राप्त होते.इ) राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना 1) जि. प. अंतर्गत जि.प.हायस्कूल मधील विद्यार्थ्यांना अपघात सानुग्रह अनुदान योजना

इ) राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना 1) जि. प. अंतर्गत जि.प.हायस्कूल मधील विद्यार्थ्यांना अपघात सानुग्रह अनुदान योजना
उद्देश :- जिल्हा परिषद अंतर्गत जि.प.हायस्कूल मधील विद्यार्थ्यांना अपघात सानुग्रह अनुदान योजना 
लाभार्थी निकष :- 1) विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू 2) अपघाताने कायमचे अपंगत्व, त्यामध्ये (2 अवयव/दोन डोळे 1 अवयव/ 1 डोळा निकामी ) 3) अपघातामुळे कायमचे अपंगत्व, त्यामध्ये ( 1 अवयव 1 डोळा कायम निकामी) 
लाभाचे स्वरुप :- सार्वजनिक 
अर्ज करण्याची पध्दत :- गटशिक्षणाधिकारी यांच्या कडून शाळेतील माहिती पंचायत समिती स्तरावरुन प्राप्त होते.ई) सर्व शिक्षा अभियान --१) नविन शाळा उघडणे

ई)  सर्व शिक्षा अभियान --१)     नविन शाळा उघडणे 
लाभार्थी- 6 ते 14 वयोगटातील सर्व बालक
निकष - 1 किमी पेक्षा जास्त अंतर असल्यास प्राथमिक व 3 किमी पेक्षा जास्त अंतर असल्यास उच्च प्राथमिक शाळा. 
स्वरूप - निकषाप्रमाणे अंतर व गावाची लोकसंख्येच्या अधिन राहुन नविन शाळा उघडण्यात येते.2) मुख्य प्रवाहातील शाळाबाहय मुलांसाठी विशेष प्रशिक्षण

2) मुख्य प्रवाहातील शाळाबाहय मुलांसाठी विशेष प्रशिक्षण-
लाभार्थी- 6 ते 14 वयोगटातील शाळाबाहय बालक 
निकष - वयानुरुप समकक्ष वर्गात दाखल होणारे व शाळाबाहय असणारे विद्यार्थी
स्वरूप - आवश्यक क्षमता व कौशल्य विकास करण्यासाठी अतिरिक्त वेळ देवून शाळास्तरावर संबंधित विदयार्थ्यास शिक्षकाव्दारा विशेष प्रशिक्षण दिले जाते.3) मोफत पाठयपुस्तके

3) मोफत पाठयपुस्तके -
लाभार्थी - 6 ते 14 वयोगटातील बालक निकष - शासकिय, स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी अनुदानित शाळातील विद्यार्थी 
स्वरूप - इ. 1 ली ते 8 वी तील विद्यार्थ्यांना मोफत पाठयपुस्तके तसेच शासकिय व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळामधील इ. 1 ली ते 8 वी तील विद्यार्थ्याना मोफत स्वाध्याय पुस्तिका वितरीत करणे.4) शालेय गणवेश -

4) शालेय गणवेश-
लाभार्थी- 6 ते 14 वयोगटातील मुली, अनु.जाती/जमाती संवर्गातील मुले आणि दारिद्र रेषेखालील पालकांचे मुले.
निकष - शासकिय व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळातील इ. 1 ली ते 8 वीतील विद्यार्थी 
स्वरूप - प्रत्येकी दोन गणवेश संच करिता रूपये 400/- प्रति विद्यार्थी याप्रमाणे निधी संबंधित शाळा व्यवस्थापन समितींना वर्ग करण्यात येते.5) नविन शिक्षक वेतन

5) नविन शिक्षक वेतन -
लाभार्थी- निम शिक्षक / नियमित शिक्षक 
निकष - वस्तीशाळेचे नियमित प्राथमिक शाळेत रुपांतरीत झालेल्या शाळेतील निमशिक्षकांना नियमित वेतनश्रेणी लागू करण्यात आलेली आहे. 
स्वरूप -  मासिक मानधनाची प्रतिपूर्ती करण्यात येते.6) शिक्षक प्रशिक्षण-

6) शिक्षक प्रशिक्षण-
लाभार्थी - इयत्ता 1 ली ते 8 वीला शिकविणारे शिक्षक 
निकष -   शासकिय, स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी अनुदानित शाळातील शिक्षक 
स्वरूप - शिक्षकांच्या क्षमता व ज्ञान अद्यावत व वृधीगंत करणे, शैक्षणिक अभ्यासक्रमात वेळोवेळी होणारे बदल अवगत करणे याकरीता पुनर्रचित अभ्यासक्रम, भाषा, गणित, संगणक, जीवनकौशल्य, विपश्यना, कृतीसंशोधन इ. प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येते.7) गट साधन केंद्र-

7) गट साधन केंद्र-
लाभार्थी- तालुका अंतर्गत सर्व शाळा 
निकष - प्रती तालुका एक गट साधन केंद्र 
स्वरूप - तालुका अंतर्गत शाळा व शिक्षकांना शैक्षणिक मार्गदर्शन व शैक्षणिक सहाय्य करणे.8) समुह साधन केंद्र-

8) समुह साधन केंद्र-
लाभार्थी - समुह केंद्राअंतर्गत सर्व शाळा 
निकष - प्रती केंद्रात एक समुह साधन केंद्र 
स्वरूप - केंद्राअंतर्गत शाळा व शिक्षकांना शैक्षणिक मार्गदर्शन व शैक्षणिक सहाय्य करणे.9) शाळा अनुदान-

9) शाळा अनुदान-
लाभार्थी - प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा 
निकष - शासकिय, स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी अनुदानित शाळा. 
स्वरूप - प्राथमिक शाळा प्रती शाळा रूपये 5000/- आणि उच्च प्राथमिक शाळा प्रती शाळा रूपये 7000/- अनुदान शाळांना सादिल खर्चाकरीता देण्यात येते.10) संशोधन व मूल्यमापन पर्यवेक्षण -

10) संशोधन व मूल्यमापन पर्यवेक्षण -
लाभार्थी - शिक्षक व शाळा 
निकष -  शासकिय, स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी अनुदानित शाळा व शिक्षक..
स्वरूप - शिक्षकाकरिता कृतीसंशोधन व शाळा करिता सनियंत्रण साधनांचा वापर करून मूल्यमापन व सनियंत्रण आणि सर्व्हेक्षण करणे.11) शाळा देखभाल दुरुस्ती अनुदान -

11) शाळा देखभाल दुरुस्ती अनुदान - 
लाभार्थी- शाळा 
निकष - शासकिय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा 
स्वरूप - तीन वर्ग खोल्या असणा-या शाळा करिता रू. 5000/- आणि त्यापेक्षा जास्त वर्गखोल्या असणा-या शाळा करिता रू. 10000/- अनुदान दिले जाते.12) अपंग समावेशित शिक्षण -

12) अपंग समावेशित शिक्षण - 
लाभार्थी - 6 ते 18 वयोगटातील विशेष गरजा असणारे बालक () 
निकष - सर्व प्रकारच्या शाळांमधील विद्यार्थी 
स्वरूप - विशेष गरजा असणा-या विद्यार्थ्यांचा शोध घेवून आवश्यक संदर्भ सेवा देणे. ( भौतिक, वैद्यकिय आणि शैक्षणिक सहाय्य )13) नवोपक्रम -

13) नवोपक्रम - 
लाभार्थी- 6 ते 14 वयोगटातील मुली, अनु.जाती/जमाती संवर्गातील आणि अल्पसंख्याक प्रवर्गातील विद्यार्थी.
निकष - शासकिय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा
स्वरूप - मिना राजू मंच, किशोरी मेळावे, मातापालक संघ, व्यवसायिक प्रशिक्षण, क्षमता विकसन शिबिर/ प्रशिक्षण व इतर शैक्षणिक सहाय्य14) शाळा व्यवस्थापन समिती प्रशिक्षण -

14) शाळा व्यवस्थापन समिती प्रशिक्षण - 
लाभार्थी - शाळा व्यवस्थापन समिती सदस्य 
निकष - शासकिय व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळा 
स्वरूप - योजनांची माहिती देणे, प्रचार व प्रसार आणि लोकसहभाग याकरिता मेळावे/प्रशिक्षणाचे आयोजन करणे.15) बांधकाम -

15) बांधकाम -

लाभार्थी - शाळा 
निकष - 1) शासकिय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा. 2) खाजगी अनुदानीत शाळांना किचनशेड बांधकाम 
स्वरूप - शाळा व्यवस्थापन समिती यांचे मागणी नुसार आवश्यकतेच्या प्राधान्यक्रमाने शाळा इमारत, वर्गखोली, संरक्षण भिंत, शोैचालय, विदयुतीकरण, पिण्याचे पाणी, किचनशेड बांधकाम.अधिकारी
Thumbuse

श्री.संजय डोर्लीकर

शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
07172-252560 , -
eopzpchandrapur@gmail.com

कार्यादेश