Logo1
flag

विभाग व योजना

list-of-department
शिक्षण विभाग (माध्यमिक)
शिक्षण विभाग (माध्यमिक)
फोटो
Education department
योजना
शासकीय योजना 1) पूर्व माध्यमिक शाळातील विद्यार्थ्यासाठी खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती

शासकीय योजना  1)  पूर्व माध्यमिक शाळातील विद्यार्थ्यासाठी खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती -
उद्देश :- गुणवंत विद्यार्थ्याना प्रोत्साहन देणे लाभार्थी 
निकषः- विद्यार्थी वर्ग 4 थी व वर्ग 7 वी ची परीक्षा उतीर्ण होणे आवश्यक आहे तो शाळा शिकत असावा. 
लाभाचे स्वरुप :- 1) पुर्व माध्यमिक विभाग-वर्ग 5 वी ते 7 वी पर्यत 10 महिण्याकरीता सतत तीन वर्ष प्रतिवर्ष 500/- रुपये देण्यात येते. 2) माध्यमिक विभाग - वर्ग 8 वी ते 10 वी पर्यत 10 महिण्याकरीता सतत तीन वर्ष 750/- रुपये देण्यात येते. 
अर्ज करण्याची पध्दत :- संबंधीत शाळेच्या मुख्याध्यापकाकडून प्रस्ताव शिक्षणाधिकारी (माध्य) जि.प.चंद्रपूर यांचेकडे सादर करणे आवश्यक आहे.2) ग्रामीण भागातील हुशार (प्रज्ञावान) विद्यार्थ्यासाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना

2)  ग्रामीण भागातील हुशार (प्रज्ञावान) विद्यार्थ्यासाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना -
उद्देश :- गुणवंत विद्यार्थ्याना प्रोत्साहन देणे लाभार्थी 
निकष :- विद्यार्थी वर्ग 7 वी ची राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत उतीर्ण होणे आवश्यक आहे. तसेच तो शाळेत शिकत असावा. 
लाभाचे स्वरुप :- माध्यमिक विभाग इयत्ता 8 वी ते 10 वी पर्यत प्रतिवर्ष 300/- रुपये इयत्ता 11 वी ते 12 वी पर्यत प्रतिवर्ष 600/- रुपये प्रमाणे 5 वर्षापर्यत शिष्यवृत्ती देण्यात येते. शिक्षण विभागाकडून संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना धनादेश वितरीत करण्यात येतात व मुख्याध्यापकाकडून पात्र विद्यार्थ्याना रोख स्वरुपात देण्यात येते. 
अर्ज करण्याची पध्दत :- संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाकडून प्रस्ताव शिक्षणाधिकारी (माध्य.) जि.प.चंद्रपूर यांचेकडे सादर करणे आवश्यक आहे.3) आर्थिकदृष्टया मागासवर्गीय विद्यार्थ्यांना खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती

3)  आर्थिकदृष्टया मागासवर्गीय विद्यार्थ्यांना खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती-


उद्देश :- आर्थिकदृष्टया मागासवर्गीय विद्यार्थ्याना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे. 
लाभार्थी निकष :- 1)इयत्ता 10 वी मध्ये 50 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. 2)पालकाचे आर्थिक उत्पन्न 30,000/- पर्यत मर्यादित असणे आवश्यक आहे. 3) विद्यार्थी 10 वी 12 वी शिकत असला पाहिजे व तो संबंधित वर्गात दरवर्षी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
लाभाचे स्वरुप :- उच्च माध्यमिक विभाग वसतीगृहात राहणा-या विद्यार्थ्यासाठी प्रतिमहा 140/- रुपये व विद्यार्थीनीसाठी 160/- रुपये प्रतिमहा दोन वर्षापर्यत ही शिष्यवृत्ती देय राहील. उच्च माध्यमिक विभाग वसतीगुहात न राहणा-या विद्यार्थ्यासाठी प्रतिमहा 80/- रुपये व विद्यार्थीनीसाठी 100/- रुपये देय राहील. 
अर्ज करण्याची पध्दत :- संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाकडून प्रस्ताव शिक्षणाधिकारी (माध्य) जि.प.चंद्रपूर यांचेकडे सादर करणे आवश्यक आहे.4) स्वातंत्र सैनिकाच्या पाल्यांना शैक्षणिक सवलती.

4)   स्वातंत्र सैनिकाच्या पाल्यांना शैक्षणिक सवलती.-

उद्देशः- स्वातंत्र्य सैनिकाच्या पाल्यांना उच्च स्तरापर्यत शैक्षणिक सवलत देणे. 
लाभार्थी निकष :- 1) विद्यार्थी दरवर्षी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. 2) विद्यार्थी स्वातंत्र्य सैनिकांचा पाल्य असावा. 
लाभाचे स्वरुप :- वर्ग 5 ते 67 ते 1011 ते 12 पी.टी.आय.पदविकाअभियांत्रिकी शिक्षण शुल्क प्रतिमाह 15/- 20/- 25/- 40/- 50/- 60/- पुस्तक शुल्क 75/- 75/- 75/- 75/- 300/- 400/- 
अर्ज करण्याची पध्दत :- संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाकडून प्रस्ताव शिक्षणाधिकारी (माध्य.) जि.प.चंद्रपूर यांचेकडे सादर करणे आवश्यक आहे.5) आजी/माजी सैनिकांच्या मुलांना/मुलींना /विधवांना शैक्षणिक सवलती

5)  आजी/माजी सैनिकांच्या मुलांना/मुलींना /विधवांना शैक्षणिक सवलती-
उद्देश :- आजी/माजी सैनिकांच्या मुलांना/मुलींना /विधवांना शैक्षणिक सवलती देणे. 
लाभार्थी निकष :-1) विद्यार्थी माजी सैनिकाचा पाल्य असणे आवश्यक आहे. 2) तो दरवर्षी परीक्षेत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. आजी सैनिकवर्ग 5 ते 7वर्ग 8 ते 10 वर्ग 11 ते 12 वर्ग पुस्तक दर 50/- 100/- 100/- गणवेश 80/- 100/- 100/- माजी सैनिकवर्ग 5 ते 7 वर्ग 8 ते 10 पुस्तक दर 75/- 75/- गणवेश 80/- 100/- 
अर्ज करण्याची पध्दत :-संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाकडून प्रस्ताव शिक्षणाधिकारी (माध्य) जि.प.चंद्रपूर यांचेकडे सादर करणे आवश्यक आहे.6) ज्याचे किंवा ज्यांच्या पालकाचे आर्थिक उत्पन्न 15,000/- पेक्षा जास्त नाही अशा विद्यार्थ्याना फी माफी.

6)  ज्याचे किंवा ज्यांच्या पालकाचे आर्थिक उत्पन्न 15,000/- पेक्षा जास्त नाही अशा  विद्यार्थ्याना फी माफी.-
उद्देशः- आर्थिकदृष्टया कमकुवत विद्यार्थ्याना शैक्षणिक सवलत देणे. 
लाभार्थी निकष :-1. विद्यार्थ्याना मागील वार्षिक परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. 2. पालकाचे वार्षिक उत्पन्न 15,000/- पेक्षा अधिक नसावे. 
लाभाचे स्वरुप :-खालीलप्रमाणे शुल्क फक्त शाळांना देण्यात येते प्रत्यक्ष विद्यार्थ्याना देण्यात येत नाही. शिक्षण शुल्क, प्रवेश शुल्क, सत्र शुल्क, प्रयोगशाळा शुल्क, अनुदानित शाळेकरीता 11 वी    16/- 32/- 70/- 12 वी 18/- 36/- 70/- विना अनुदानित शाळेकरीता 11 वी 192/- 16/- 32/- 70/- 12 वी 216/- 18/- 36/- 70/- 
अर्ज करण्याची पध्दत :- संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाकडून प्रस्ताव शिक्षणाधिकारी (माध्य) जि.प.चंद्रपूर यांचेकडे सादर करणे आवश्यक आहे.7) इयत्ता 10 वी पर्यंतचे सर्वांना मोफत शिक्षण-

7)  इयत्ता 10 वी पर्यंतचे सर्वांना मोफत शिक्षण-

उद्देश :-इयत्ता 10 वी पर्यतचे सर्वांना मोफत शिक्षण देणे. 
लाभार्थी निकष :- 1)पालकाचे महाराष्ट्रात 15 वर्ष वास्तव्य असणे आवश्यक आहेत. 2) विद्यार्थ्याची शालेय वार्षिक उपस्थिती 75 टक्केअसणे आवश्यक आहेत. 3) विद्यार्थी दरवषी त्या परीक्षा उत्तीर्ण असावा. 
लाभाचे स्वरुप :- खालीलप्रमाणे शुल्क फक्त शाळांना देण्यात येते प्रत्यक्षात विद्यार्थ्याना देण्यात येत नाही. 5 वी 6 वी 7 वी 8 वी 9 वी 10वी अनुदानित शाळा शिक्षण शुल्क 3/- 4/- 5/- 6/- 7/- 8/- सत्रशुल्क 6/- 6/- 6/- 12/- 12/- 12/- विना अनुदानित शाळा शिक्षण शुल्क 36/- 48/- 60/- 72/- 84/- 96/- सत्र शुल्क 6/- 6/- 6/- 12/- 12/- 12/- नव्याने प्रवेश घेतांना वर दर्शविलेल्या प्रमाणे इयत्तानुसार प्रवेशशुल्क शाळांना देण्यात येते. प्रत्यक्ष विद्यार्थ्याना देण्यांत येत नाही.
अर्ज करण्याची पध्दत :- संबधित शाळेच्या मुख्याध्यापकाकडून प्रस्ताव शिक्षणाधिकारी (माध्य.) जि.प.चंद्रपूर यांचेकडे सादर करणे आवश्यक आहे.8) इयत्ता 11 वी व 12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण

8)  इयत्ता 11 वी व 12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण-
उद्देश - इयत्ता 11 वी व 12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण देणे. 
लाभार्थी निकष -1. विद्यार्थीनी दरवर्षी उत्तीर्ण असावी. उपस्थिती 75 टक्के असणे आवश्यक आहे. 
लाभाचे स्वरुप - खालीलप्रमाणे शुल्क फक्त शाळांना देण्यात येते प्रत्यक्षात विद्यार्थ्याना देण्यात येत नाही. शि.शुल्क प्रवेश शुल्क सत्र शुल्क प्रयोगशाळा शुल्क अनुदानित 11 वी - 16/- 32/- 70/- 12 वी - 18/- 36/- 70/- विना अनुदानित 11 वी 192/- 16/- 32/- 70/- 12 वी 216/- 18/- 36/- 70/- अर्ज करण्याची पध्दत - संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाकडून प्रस्ताव शिक्षणाधिकारी (माध्य.) जि.प.चंद्रपूर यांचेकडे सादर करणे आवश्यक आहे.9) टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्याना परीक्षा फी माफी/प्रतिपूर्ती

9)  टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्याना परीक्षा फी माफी/प्रतिपूर्ती-

उद्देश - टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्याना परीक्षा फी माफी/प्रतिपूर्ती करणे. 
लाभार्थी निकष - विद्यार्थी टंचाईग्रस्त घोषित गावातील असावा. 
लाभाचे स्वरुप - इयत्ता 10 वी परीक्षा फी  225/- इयत्ता 12 वी परीक्षा फी 245/- पदवीधर परीक्षा फी 115/- प्रमाणे प्रतिपुर्ती करण्यात येते.
अर्ज करण्याची पध्दत - संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाकडून प्रस्ताव शिक्षणाधिकारी (माध्य.) जि.प.चंद्रपूर यांचेकडे सादर करणे आवश्यक आहे.10) प्राथमिक शिक्षकाच्या मुलांना मोफत शिक्षण

10) प्राथमिक शिक्षकाच्या मुलांना मोफत शिक्षण -

उद्देश -प्राथमिक शिक्षकांच्या मुलांना मोफत शिक्षण देणे.
लाभार्थी निकष - 1.पाल्य प्राथमिक शिक्षकांचा असावा. 2. विद्यार्थ्यानी प्राथमिक शिक्षकांच्या पाल्यांना मोफत शिक्षण फार्म शाळेकडे सादर करणे आवश्यक आहे. 
लाभाचे स्वरुप - 5,6,7 वी 8,9,10 वीपरीक्षा फी सत्र शुल्क 6/- 12/- 235/- इ. 10 वी 245/- इ.12 वी 115/- पदव्युत्तर 
अर्ज करण्याची पध्दत - संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाकडून प्रस्ताव शिक्षणाधिकारी (माध्य.) जि.प.चंद्रपूर यांचेकडे सादर करणे आवश्यक आहे.11) मुलींना प्रोत्साहन भत्ता केंद्र पूरस्कृत योजना-

11) मुलींना प्रोत्साहन भत्ता केंद्र पूरस्कृत योजना-

उद्देश - वर्ग 9 वी मध्ये शिकणा-या अनु.जाती व जमाती च्या सोळा वर्षाखालील मुलींना वार्षिक 3,000/- रुपये प्रोत्साहनपर भत्ता . 
लाभार्थी निकष - 1) सदरची योजना अनु.जाती,जमाती मधील वय वर्ष सोळा पूर्ण न झालेल्या विद्यार्थीनीसाठी लागु आहे. 2) ज्या मुली कस्तुरबा गांधी बालीका विद्यालयातून इयत्ता 8 वी उत्तीर्ण झालेल्या आहेत अशा सर्व मुलींनाच लागू आहे. 3) अविवाहित मुलींनाच सदरची योजना लागू आहे. 4) शासकीय/शासन अुनदानित /स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता 9 वी मध्ये शिकत असलेल्या मुलींसाठीच ही योजना लागू आहे. 
लाभाचे स्वरुप - अनु.जाती/जमाती च्या सोळा वर्षाखालील मुलीना वार्षिक 3,000/- रुपये प्रोत्साहनपर भत्ता 
अर्ज करण्याची पध्दत -संबंधित पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारीकडून प्रस्ताव शिक्षणाधिकारी(माध्य.) जि.प.चंद्रपूर यांचेकडे सादर करणे आवश्यक आहे.12) राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना

12)  राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना -

उद्देश - 1) ग्रामीण भागातील विद्यार्थीनीना शिक्षणाची आवड निर्माण करुन शाळेत शिक्षण घेण्यास प्रोत्साहित करणे. 2) मुलीचे शाळेतील उपस्थितीचे प्रमाण वाढविणे. 3) शाळेतील मुलीची गळती कमी करणे/गळतीचे प्रमाण शुन्य टक्केवर आणने. 
लाभार्थी निकष – 1) इयत्ता 8 वी मधील दारिद्रय रेषेखालील मुली हया योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहील. 2) ग्रामिण भाग व क वर्ग नगर परिषद क्षेत्रातील शाळा या ठिकाणी ही योजना लागू राहील 3) लाभार्थीचे घर व शाळेचे अंतर कमीतकमी 2 कि.मी.अंतर असावे. 4) इतर योजनेतून लाभार्थीस सायकल प्राप्त झाल्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही. 5) इयत्ता 7 वीमध्ये कमीतकमी 45 टक्के गूण प्राप्त केलेले असावे. 6) लाभार्थी ही शासन मान्यता प्राप्त अनुदानित माध्यमिक शाळेत शिक्षण घेत असावी. 7) लाभार्थीची निवड करतांना दुर्गम/अतिदुर्गम ग्रामिण भाग तसेच शहरी भागातील झोपडी / गलिच्छ वस्तीतील मुलींना प्राधान्य दयावे. 
लाभाचे स्वरुप - लाभार्थी मुलीना लेडीज सायकलचे वाटप करण्यात येते. 
अर्ज करण्याची पध्दत - संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाकडून प्रस्ताव शिक्षणाधिकारी (माध्य.) जि.प.चंद्रपूर यांचेकडे सादर करणे आवश्यक आहे.13) मानव विकास कार्यक्रम-

13)  मानव विकास कार्यक्रम-
अ) इयत्ता 10 वी व 12 वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांकरीता विशेष शिकवणी वर्ग सुरू करणे. 

उद्देश - ग्रामीण भागातील जे विद्यार्थी शिकवणी वर्ग लावू शकत नाही अशा विद्यार्थ्यांना विषयनिहाय मार्गदर्शन करणे. 
लाभार्थी निकष - विद्यार्थी हा 10 वी व 12 वी च्या परिक्षेत अनुत्तीर्ण असावा व पुरवणी परीक्षेकरीता अर्ज सादर केलेला असावा. लाभाचे स्वरूप -इयत्ता 10 वी साठी इंग्रजी,गणित व विज्ञान या तीन विषयाचे शिकवणी वर्ग घेण्यात येतात. इयत्ता 12 वी साठी विज्ञान शाखेत गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जिवशास्त्र व वाणिज्य शाखेसाठी अकाऊंट्‌स तसेच कला शाखेसाठी इंग्रजी या विषयाचे उजळणी प्रशिक्षण घेण्यात येतात. ब) तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये अभ्यासिका सुरू करणे. उद्देश -ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरीता अभ्यासासाठी पोषक वातावरण निर्माण करणे. 
लाभार्थी निकष -या योजनेमध्ये विद्यार्थी हा इयत्ता 8 वी ते 12 वी मध्ये शिक्षण घेणारा असावा. लाभाचे स्वरूप -सदर अभ्यासिका केंद्गामध्ये इयत्ता 8 वी ते 12 वी मध्ये शिक्षण घेणार्यास विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जातात.ग्रामिण भागातील लोडशेडींगची समस्या विचारात घेऊन सोलर लाईटची व्यवस्था करण्यात येते,त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास पोषक वातावरण निर्माण होते. क) शासकिय तसेच अनुदानित माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळांमध्ये प्रयोगशाळेंकरीता आवश्यक साहित्य पुरविणेबाबत. उद्देश - ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची आवड निर्माण करणे. लाभाचे निकष -या योजनेमध्ये विद्यार्थी हा इयत्ता 8 वी ते 12 वी मध्ये शिक्षण घेणारा असावा. 
लाभाचे स्वरूप -ग्रामिण भागातील शाळेमध्ये प्रयोगशाळा अद्यावत नसतात त्यामुळे बहुतेक विद्यार्थी हे विज्ञान विषयात कच्चे राहु नये म्हणुन ग्रामिण भागातील शासकिय तसेच अनुदानित माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळांमध्ये प्रयोगशाळेकरीता आवश्यक साहित्य पुरविण्यात येवुन प्रयोगशाळा अद्यावत करण्यात येतात. ड) तालुक्याच्या ठिकाणी बालभवन विज्ञान केंद्र स्थापन करणे. उद्देश - ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची रूची निर्माण करणे. लाभाचे निकष - तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या एका उच्च माध्यमिक शाळेकडे जबाबदारी सोपविण्यात येते. लाभाचे स्वरूप - या योजनेमध्ये तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या ज्या उच्च माध्यमिक शाळेकडे इमारत उपलब्ध आहे अशा शाळेमध्ये वैज्ञानिक उपकरणांचा पुरवठा केला जातो.तसेच अशा प्रकारचे वैज्ञानिक उपकरणे व्यवस्थित ठेवण्याकरीता येणारा खर्चही या योजनेतून केला जातो.14) राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना (परिक्षा)

14)  राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना (परिक्षा) -

उद्देश -इयत्ता आठवी च्या अखेर प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेवून बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करणे. 
लाभार्थी निकष - विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासनमान्य अनुदानित शाळेत इयत्ता 8 वीत शिक्षण घेत असावा. पालकांचे वार्षीक उत्पन्न 1,50,000/-पेक्षा जास्त नसावे. लाभाचे स्वरूप - शिष्यवृत्तीस पात्र ठरणा-यां विद्यार्थ्यांना एका वर्षास 6,000/- रूपये याप्रमाणे तीन वर्षापर्यंत सदर शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येतो. 
अर्ज करण्याची पध्दत - संबंधित शाळेचे मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म परिषदेच्या वेबसाईटवर ऑनलाईन भरून भरलेल्या फॉर्मची पावती स्वाक्षरीसह व राष्ट्रीयकृत बँकेत रक्कम भरलेल्या चालानच्या पावतीसह शिक्षणाधिकारी (माध्य.) यांचे कार्यालयास विहीत केलेल्या मुदतीत सादर करणे आवश्यक आहे.15) राष्ट्रीय प्रज्ञाशोध परिक्षा -

15)  राष्ट्रीय प्रज्ञाशोध परिक्षा -
उद्देश - इयत्ता आठवी च्या अखेर प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुध्दीवान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करणे. 
लाभार्थी निकष -विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासनमान्य अनुदानित शाळेत इयत्ता 10 वीत शिक्षण घेत असावा. 
लाभाचे स्वरूप -विद्यार्थ्यांस प्रथम जिल्हा स्तरावर व त्यानंतर राज्यस्तरावर व पुढे राष्ट्रीय स्तरावर परीक्षा गुणवत्तेनुसार उत्तीर्ण झाल्यास उच्च शिक्षण पुर्ण होईपर्यंत संपुर्ण खर्च शासनामार्फत केला जातो. 
अर्ज करण्याची पध्दत - संबंधित शाळेचे मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांचे परिक्षा फॉर्म परिषदेच्या वेबसाईटवर ऑनलाईन भरून भरलेल्या फॉर्मची पावती स्वाक्षरीसह व राष्ट्रीयकृत बँकेत रक्कम भरलेल्या चालानच्या पावतीसह शिक्षणाधिकारी (माध्य.) यांचे कार्यालयास विहीत केलेल्या मुदतीत सादर करणे आवश्यक आहे.अधिकारी
Hod

श्री.संजय डोर्लीकर

शिक्षणाधिकारी (माध्यमिक)
२५५०१३ , -
eoszpchandrapur@gmail.com

कार्यादेश