Logo1
flag

विभाग व योजना

list-of-department
ग्रामीण पाणी पुरवठा विभाग
ग्रामीण पाणी पुरवठा विभाग
फोटो
6
योजना
शासकिय योजना 1) नळ पाणी पुरवठा योजना -

1) नळ पाणी पुरवठा योजना

 

उद्देश - ग्रामीण भागातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याकरिता ही योजना राबविणे.

निकष - नळ पाणी पुरवठा योजना राबवितांना विविध लेखाशिर्षाखाली वेगवेगळया प्रकारे योजनेचे निकष ठरवून दिलेले आहेत. 
अ) आदिवासी उपयोजना -

अ) आदिवासी उपयोजना -
निकष - आदिवासी संख्या 60% ग्रामसभेचा ठराव तसेच आदिवासी गाव असल्यामुळे 1% लोकवर्गणी व श्रमदान 4% करून योजना राबविण्याची कार्यवाही करण्यात येते.ब) गैरआदिवासी उपयोजना -

ब) गैरआदिवासी उपयोजना -
निकष - गैरआदिवासी गाव असल्यामुळे ग्रामसभेचा ठराव तसेच लोकवर्गणी 5% व 5% श्रमदानातून व शासनाचा वाटा 90% उपलब्ध करून योजना राबविण्यात येते.क) आदिवासी जनजाती क्षेत्राबाहेरील योजना-

क) आदिवासी जनजाती क्षेत्राबाहेरील योजना-
निकष - आदिवासी जनजाती क्षेत्राबाहेरील गाव असल्यामुळे ग्रामसभेचा ठराव तसेच लोकवर्गणी 5% व 5% श्रमदानातून व शासनाचा वाटा 90% उपलब्ध करून योजना राबविण्यात येते.ड) विशेष घटक योजना -

ड) विशेष घटक योजना -
निकष - दलीत लोकसंख्या 150 व त्यापेक्षा जास्त असावी, ग्रामसभा ठराव झालाᅠअसावा तसेच कामे करण्याकरिता ग्रामपंचायतीची मालकीची जागा उपलब्ध असणे आवश्यक. वरील सर्व योजना राबविण्यासाठी मंजुरीची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे. - ग्रामसभेकडून योजनेची मागणी ठराव तसेच लोकवर्गणीची रक्कम प्राप्त झाल्यावर योजनेला तांत्रिक मान्यता तसेच मजुरीचे अधिकार ज्या स्तरावर आहेत त्यांचेकडून प्रशासकिय मान्यतेची कार्यवाही करण्यात येते. प्रशासकिय मान्यता प्राप्त झाल्याबरोबर योजना कार्यान्वीत करणेसाठी प्रथम 30% निधी देण्यात येतो. 30% निधी दिल्यानंतर दिलेला निधी व लोकवर्गणीची रक्कम यातून 90% रक्कम खर्च झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर द्वितीय हप्ता 30% निधी वितरीत करण्याची कार्यवाही करण्यात येते. एकुण दिलेला 60% निधी खर्च झाल्याचा अहवाल तसेच लेखापरिक्षण समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील 30% निधी वितरीत करण्यात येतो. एकुण 90% निधी वितरीत झाल्यानंतर काम पूर्ण झाल्यास काम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र व ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचा अहवाल मुल्यांकन प्राप्त झाल्यावर उर्वरीत 10% निधी वितरीत करण्यात येत असतो. या विभागाकडून सुरू असलेली कामे तसेच नवीन प्रस्तावित कामे ग्रामपंचायत / कंत्राटदार तसेच शासनाचे नवीन धोरणानुसार ग्रामपंचायतमध्ये ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समिती नेमून त्यांच्या मार्फत योजना राबविण्याची कार्यवाही सुरू आहे.2) शिवकालीन पाणी साठवन योजना -

2) शिवकालीन पाणी साठवन योजना -
निकष - पाण्याच्या स्त्रोतांचे बळकटीकरण करणे, पाण्याची पातळी वाढविणे, जमीनीमध्ये पाणी मुरविणे इत्यादि. पाण्याची टंचाई असलेल्या गावात भूजल पातळी कमी झाल्याने भूवैज्ञानिक यांच्या अभिप्रायासह ग्रामपंचायतच्या मागणी ठरावानुसार कामे घेण्यात येतात. यासाठी 10% लोकवर्गणी सहभाग आवश्यक आहे. प्रस्ताव ग्रामपंचायत कडून भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणाकडे प्राप्त झाल्यानंतर वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा, चंद्रपूर यांचेमार्फत मंजुरीची कार्यवाही करण्यात येते. मंजुरी नंतर कामे हाती घेतल्या जातात. सदर कामे ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीमार्फत राबविण्यात येतात.3) नक्षलग्रस्त भागाकरिता विशेष कृती कार्यक्रम -

3) नक्षलग्रस्त भागाकरिता विशेष कृती कार्यक्रम -
निकष - नक्षलग्रस्त भागामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय करणे. नक्षलग्रस्त घोषीत भागामध्ये पिण्याच्या पाण्याच्या सोयी करण्याकरिता नळ योजना, साध्या विहीरी इत्यादी कामे घेण्यात येतात. सदर कामाचे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर मा. जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचेकडे मंजुरीसाठी सादर करण्यात येते. या कार्यक्रमाअंतर्गत समाविष्ट गावाचे प्रस्ताव उपविभागीय अधिकारी, ग्रा.पा.पु. उपविभाग यांचेकडून प्राप्त झाल्यानंतर मा. जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचेकडे पुढील मंजुरीकरीता सादर करण्यात येते. मंजुरी प्राप्त झाल्यानंतर कामे करण्याबाबतची कार्यवाही ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत राबविण्यात येतात. सदर कामे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाद्वारा ग्राम पंचायत स्तरावरील समितीमार्फत राबविण्यात येतात.4) विदर्भ वैधानिक विकास मंडळ -

4) विदर्भ वैधानिक विकास मंडळ -
उद्देश - पिण्याच्या पाणी पुरवठयाच्या सोयी करणे. या कार्यक्रमाअंतर्गत नळ योजना, साध्या विहीरी इत्यादि कामे घेतल्या जातात. सदर कामाचे प्रस्ताव ग्रामपंचायत स्तरावरून मा. आमदार, खासदार यांचे सहमताने सादर केल्या जाते. लोकप्रतिनिधीने सुचविलेल्या गावांचे प्रस्ताव उपविभागीय अधिकारी, ग्रा.पा.पु. उपविभाग यांचेकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचेकडे पुढील मंजुरीकरीता सादर करण्यात येते. मंजुरी प्राप्त झाल्यानंतर कामे करण्याबाबतची कार्यवाही ग्रामिण पाणी पुरवठा विभागामार्फत राबविण्यात येतात. सदर कामे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाद्वारा ग्रामपंचायत मार्फत राबविण्यात येतात. सदयास्थितीत या लेखाशिर्षा अंतर्गत निधी उपलब्ध नाही.5) स्थानिक विकास निधी -

5) स्थानिक विकास निधी -
उद्देश - पिण्याच्या पाणी पुरवठयाच्या सोयी करणे. या कार्यक्रमाअंतर्गत मा. आमदार, मा. खासदार यांनी प्रस्तावित केलेली कामे बाबतचे प्रस्ताव तयार करून मा. जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचेकडे प्रशासकिय मंजूरीसाठी सादर करण्यात येते. लोकप्रतिनिधीने सुचविलेल्या (आमदार / खासदार) गावांचे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर मा. जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचेकडे मंजुरी प्राप्त झाल्यानंतर कामे ग्रा.पा.पु. विभागाकडून करून घेतल्या जातात. सदर कामे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाद्वारा ग्राम पंचायत मार्फत राबविण्यात येतात.6) रोजगार हमी योजना :-

6) रोजगार हमी योजना :- 
उद्देश - पिण्याच्या पाणी पुरवठयाच्या सोयी करणे. पाण्याची टंचाई असलेल्या गावांमध्ये पाण्याची व्यवस्था करणे करिता चंद्रपूर जिल्हयासाठी विशेष बाब म्हणून 100 पिण्याच्या पाण्याच्या विहिरींना मंजुरी देण्यात आली होती. वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा चंद्रपूर यांचे स्त्रोत प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर ग्रामस्तरावरून गावनकाशा, सातबारा, ठरावानिशी अंदाजपत्रक मा. जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचेकडे मंजुरीस सादर करण्यात येतात. सदर कामे संवर्ग विकास अधिकारी यांचे मार्फत राबविण्यात येतात.7) पाणी टंचाई कार्यक्रम -

7) पाणी टंचाई कार्यक्रम -
उद्देश - उन्हाळयामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणा-या  गावात पाणी टंचाई दूर करणे. पाणी टंचाई निवारण कार्यक्रमाअंतर्गत नळ योजना दुरूस्ती, तात्पुरती नळ योजना नवीन हातपंप, झिरे बुडक्या घेणे, विहीर खोलीकरण, गाळ काढणे, अटकर लावणे इत्यादी कामे घेण्यात येतात. पिण्याच्या पाण्याच्या टंचाई भासणा-या गावांची पंचायत समिती स्तरावरून आराखडयाद्वारे माहिती संकलीत केल्या जाते. याबाबत जिल्हास्तरावर टंचाई निवारण आराखडा तयार करून मा. जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचे मंजुरीस सादर करण्यात येते. सदर कामे ग्रामिण पाणी पुरवठा विभाग व म.जि.प्रा. विभागाद्वारे ग्राम पंचायत / कंत्राटी पध्दतीने राबविण्यात येतात.अ) विंधन विहिर कार्यक्रम -

अ) विंधन विहिर कार्यक्रम -
उद्देश -  टंचाई कालावधीत गावकर्यां ची पाण्याची टंचाई दूर करणे. 
निकष - पाणी टंचाई आराखडयात गाव समाविष्ठ असणे आवश्यक आहे. या कार्यक्रमाअंतर्गत विंधन विहीर तथा कुप नलिका तयार करण्यात येतात. विंधन विहीर व कुप नलिका तयार झाल्यानंतर त्यातील पाण्याची क्षमता पाहुन त्यावर हातपंप किंवा विद्युतपंप बसवून पाणी पुरवठा करण्यात येतो. विंधन विहीर तथा कुपनलिका तयार करतांना त्या अंतर्गत वेगवेगळे तांत्रिक उपयोगाखाली वेगवेगळा खर्च सर्वसाधारणपणे एक 60 मीटर खोल विंधन विहीरीला रू. 90,000/- तर एका 60 मीटर खोल कुपनलिकेला रू. 1,80,000/- एवढा खर्च येतो. या खर्चात हातपंप बसविणे इत्यादि कामाचा समावेश आहे. सदर कामे भु.स.वि.यं. उपविभाग (यांत्रिकी) जिल्हा परिषद, चंद्रपूर यांचेकडून पूर्ण करण्यात येतात.ब) हातपंप / विद्युतपंप देखभाल दुरूस्ती :-

ब) हातपंप / विद्युतपंप देखभाल दुरूस्ती :- 
उद्देश :- बंद हातपंप, विजपंप दुरूस्त करून पाणी पुरवठा करणे, जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्र अंतर्गत असलेल्या विंधन विहीरीवरील हातपंप व विद्युत पंपाची देखभाल दुरूस्ती यांत्रिकी उपविभागामार्फतीने केली जाते. यासाठी संबंधीत ग्रामपंचायतीला जि.प. सोबत करारनामा करून प्रति हातपंप प्रति वर्ष रू. 1200/- तथा प्रति विद्युतपंप प्रति वर्ष रू. 6000/- एवढी रक्कम ग्रामपंचायतकडून घेण्यात येते. सदर कामे पंचायत समिती स्तरावरील देखभाल दुरूस्ती पथकाद्वारे भु.स.वि.यं. उपविभाग (यांत्रिकी) जिल्हा परिषद, चंद्रपूर यांचे नियंत्रणात करण्यात येतात.8) भारत निर्माण कार्यक्रम - या अंतर्गत महाजल, वर्धित वेग, स्वजलधारा हया योजनांची अंमलबजावणी करण्यात येते.

8) भारत निर्माण कार्यक्रम - या अंतर्गत महाजल, वर्धित वेग, स्वजलधारा हया योजनांची अंमलबजावणी करण्यात येते. 
उद्देश - ग्रामीण भागात गावातील प्रत्येकाला नियमीतपणे शुध्द, स्वच्छ व पुरेसे पिण्याचे पाणी समूह सहभागातून व मागणीवर आधारीत धोरणानुसार उपलब्ध करणे.
निकष - कॉम्प्रेहेन्सीव्ह अॅरक्शन प्लॅन (99) मधील गावे, गुणवत्ता बाधीत 2003 सर्वेक्षणानुसार गावे, टंचाईग्रस्त गावे या प्राधान्य क्रमाणे व पुढील नियमानुसार निवड करण्यात येते. 
नियम - साध्या उपलब्ध पिण्याच्या पाण्याचे प्रमाण, टँकरग्रस्त गावे, जिल्हास्तराचे तुलनेत मागासवर्गीयांचे प्रमाण, आदिवासीचे प्रमाण, पाणी पट्टीची वसुलीची टक्केवारी व संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानातील बक्षीस या निकषांवर गुणानुक्रमे निवड करण्यात येते. आवश्यक लोकवाटा (लोकवर्गणी, श्रमदान) योजना पुर्ण झाल्यावर दैनंदिन देखभाल दुरूस्ती, 100 टक्के हागणदारी मुक्त व स्वच्छतेकरिता गावाची तयारी असली पाहीजे. 
अर्ज करण्याची पध्दत - ग्रामिण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूर ने याकरिता अर्जाचा नमुना तयार केला असून ते ग्रामिण पाणी पुरवठा विभागामधून प्राप्त करून घ्यावे. त्यात संपूर्ण माहीती भरावी. त्यासोबत जोडलेल्या विहित नमुन्यात महिला सभा व सर्वसाधारण ग्राम सभेचे मंजूर ठराव अर्जासोबत जोडावे. पुढील आशयाचे ग्रामसभेचे ठराव असावे. अ) सिंचनासाठी गावठाणात विंधन विहीरी / कूपनलिका  घेण्यात येणार नाही. ब) गाव 100 टक्के हागणदारी मुक्त करण्यात येईल व प्रत्यक्ष योजनेसाठीचा दुसरा हप्ता मिळण्यापूर्वी गाव 100 टक्के हागणदारी मुक्त करण्यात येईल. क) योग्य (शासनाने ठरवून दिलेल्या किमान दरापेक्षा कमी नसेल) पाणी पट्टी लावून त्याची वसूली करून योजनेच्या देखभाल दुरूस्तीचा 100 टक्के खर्च वसूल केला जाईल. योजनेचा शेवटचा हप्ता मिळण्यापूर्वी 3 महिण्याची पाणीपट्टी लाभार्थ्याकडून आगावू वसूल करण्यात येईल.अधिकारी
Thumbuse

श्री.दशरथ पिपरे

कार्यकारी अभियंता (ग्रा.पा. पु.)
07172-273978 , -
eerwzpchandrapur@gmail.com

Thumbuse

श्री.गजानन तेलकापल्लीवार

सहा.प्रशासन अधिकारी
07172-273978 , -
eerwszpchandrapur@gmail.com