Logo1
flag

विभाग व योजना

list-of-department
पाणी व स्वच्छता विभाग
पाणी व स्वच्छता विभाग
फोटो
13
योजना
अ) निर्मल भारत अभियान-

अ)  निर्मल भारत अभियान-
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाची स्थापना सन 2012 मध्ये करण्यात आली. या कक्षा अंतर्गत निर्मल भारत अभियान मधून वैयक्तिक शौचालय सुविधा, सार्वजनिक शौचालय व सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन ईत्यादी योजना राबविल्या जातात.2) सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन-

सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन-
जी ग्रामपंचायत 100 टक्के हागणदारी मुक्त झाली आहे व निर्मल ग्राम पुरस्कार योजनेकरीता प्रस्तावित करण्यात आली किंवा निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त आहे अशा ग्रामपंचायतींना गावात सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे करण्याकरीता गावाच्या कुटूंबाच्या आधारावर योजनेच्या मागणीनुसार निधी मिळतो. कुटूंब संख्या निधी मर्यादा 1) 150 - रु.7.00 लक्ष 2) 300 - रु.12.00 लक्ष 3) 500 - रु.15.00 लक्ष 4) 500 पेक्षा अधिक असल्यास - रु.20.00 लक्ष  अशा प्रकारे ग्रामपंचायतीला सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची कामे गावस्तरावर घेता येतात.3) सार्वजनिक स्वच्छता संकूल-

3) सार्वजनिक स्वच्छता संकूल-
सार्वजनिक स्वच्छता संकुल हा निर्मल भारत अभियानाचा अंतर्भुत घटक आहे. एका सार्वजनिक स्वच्छता संकुलासाठी रु.2 लाखापर्यंत कमाल खर्च करता येतो. या योजनेत 90 टक्के शासन अनुदान तर 10 टक्के मात्र समाजाचा वाटा, समाजाचा वाटा (लोकवर्गणी) ग्रामपंचायत स्वतःच्या संसाधनातुन, तेराव्या वित्त आयोगाच्या अनुदानातून किंवा राज्याद्वारे दिल्या जाणार्याय कोणत्याही निधीतून त्यांच्या परवानगीने देऊ शकते.4) शालेय शौचालय-

4) शालेय शौचालय-

शालेय स्तरावर युनिट बांधकामाला खर्च रु.35,000/- (दुर्गम आणि डोंगरी भागासाठी रु. 38,500/-) लाभ देता येतो.5) अंगणवाडी शौचालय--

5) अंगणवाडी शौचालय--
ग्रामीण भागातील प्रत्येक अंगणवाडीसाठी स्वच्छतागृह युनिट करीता रु.8000/- (दुर्गम आणि डोंगरी भागासाठी रु.10,000/-) पर्यंत लाभ देता येतो.6) निर्मलग्राम पुरस्कार योजना

6) निर्मलग्राम पुरस्कार योजना-

पूर्ण ग्राम पंचायती निर्मल करण्याचे शासनाचे धोरण असुन निर्मल भारत अभियांतर्गत 100 टक्के शौचायलाचे बांधकाम करुन त्याचा वापर करणे तसेच सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन यातही स्वच्छतेचे काम होणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे शाळा, अंगणवाडी सहित संस्थागत स्वच्छतागृहे व्यवस्थीत वापरात असणे आवश्यकत आहे. संपूर्ण पणे स्वच्छ झालेले आणि उघड्यावरील शौचविधी पासून मुक्त झालेल्या ग्रामपंचायतीकरीता, तालुक्याकरीता, जिल्ह्याकरीता हा पुरस्कार आहे. लोकसंख्या निकष 1000 पेक्षा कमी 1000 ते 1999 2000 ते 4999 5000 ते 9999 10000 ते त्यावरील बक्षिसाची रक्कम 1 लाख 2 लाख 4 लाख 8 लाख 10 लाख.ब) संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान :

ब) संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान :
मीण भागात अशुद्ध पाण्यामुळे, अस्वच्छ परिसरामुळे व वैयक्तिक स्वच्छते अभावी उद्‌भवणा-या रोगांना प्रतिबंध घालण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे ज्यांचे आरोग्यमान, पर्यायाने जिवनस्तर उंचावण्यासाठी शासनाने ग्रामस्थांचा सक्रिय व सातत्यपूर्ण सहभाग करण्यासाठी सन 2000-2001 पासून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्रामस्पर्धा सुरू करण्यात आली. सन 2002-2003 पासून स्वच्छतेशी व ग्राम विकासाशी निगडीत एखाद्या विशिष्ट क्षेत्रात भरीव काम करण्या-या ग्रामपंचायतीना जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर विशेष बक्षीसे देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.याकरीता दरवर्षी 2 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर पर्यंत अभियानाचे उत्कृष्ठ काम करण्या-या ग्रामपंचायतीना पुढील प्रमाणे प्रत्येक स्तरावर बक्षीसे दिली जातात. पंचायत समितीस्तर 1) प्रथम क्रमांक - रु. 25.00 हजार 2) द्वितीय क्रमांक - रु. 15.00 हजार 3) तृतीय क्रमांक - रु. 10.00 हजार पंचायत समितीस्तरावर प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या ग्रामपंचायतीची जिल्हास्तरावरील स्पर्धेसाठी पात्र असतील. जिल्हास्तर 1) प्रथम क्रमांक - रु. 5.00 लाख 2) द्वितीय क्रमांक - रु. 3.00 लाख 3) तृतीय क्रमांक - रु. 2.00 लाख जिल्हास्तरावर निवडलेल्या प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या ग्रामपंचायत विभागस्तरावरील स्पर्धेकरीता पात्र असतील. विभागस्तर 1) प्रथम क्रमांक - रु. 10.00 लाख 2) द्वितीय क्रमांक - रु. 8.00 लाख 3) तृतीय क्रमांक - रु. 6.00 लाख राज्यस्तर 1) प्रथम क्रमांक - रु. 25.00 लाख 2) द्वितीय क्रमांक - रु. 20.00 लाख 3) तृतीय क्रमांक - रु. 15.00 लाख या शिवाय विशेष पुरस्कार उपरोक्त पुरस्कार शिवाय या अभियानांतर्गत साने गुरूजी स्वच्छ शाळा स्पर्धा, सावित्रीबाई फुले स्वच्छ अंगणवाडी स्पर्धा, आबासाहेब खेडकर पुरस्कार (कुटूंब कल्याण) स्व. वसंतराव नाईक पुरस्कार (पाणी व्यवस्थापन), डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार (सामाजिक एकता) इ. बक्षीस संबधीत ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी इ. ना दिल्या जाते.क) राष्ट्रीय ग्रामीण पेयजल अंतर्गत पाणी गुणवत्ता :

क) राष्ट्रीय ग्रामीण पेयजल अंतर्गत पाणी गुणवत्ता :
1) अंतर्गत पाणी गुणवत्ता शाखा यामध्ये विविध कार्यक्रम राबविले जातात. यामध्ये जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची स्त्रोतांची रासायनिक व जैविक तपासणी करण्यात येते. 2) जैविक तपासणी ही वर्षातून 4 वेळा (दर तीन महिण्यात) प्रयोगशाळा मार्फत केली जाते. तसेच रासायनिक तपासणी ही वर्षातून 1 वेळा करण्यात येते. तसेच वेळोवेळी जैविक तथा रासायनिक फिल्ड टेस्ट किट द्वारे गावातल्या गावात सोप्या पध्दतीने गावकरांना समक्ष करण्यात येते. 3) स्वच्छता सर्वेक्षण पावसाळ्यापूर्वी (1 एप्रिल - 30 एप्रिल) आणि पावसाळ्यानंतर (1 नोव्हे. - 30 नोव्हें.) असे वर्षातून 2 वेळा राबविण्यात येते. या अंतर्गत गुणानुक्रमानुसार लाल, हिरवे, पिवळे कार्ड ग्रामपंचायतीला वितरीत केले जातात. तसेच लाल कार्ड/पिवळे कार्ड यांचे रुपांतर हिरवे कार्डमध्ये कसे होईल याचे सनियंत्रण केल्या जाते. 4) सर्व स्त्रोतांची नविन कार्यप्रणाली नुसार स्त्रोत सांकेतांक दिले जातात. जेणेकरून सर्वांना प्रत्येक स्त्रोतांची माहिती उपलब्ध होऊ शकेल. 5) प्रयोगशाळेत तपासण्यात आलेले सर्व नमुण्यांची सविस्तर माहिती राज्यशासनाच्या संकेतस्थळावर नोंदी घेतल्या जातात. जलसुरक्षकांचे प्रशिक्षण, क्षमता बांधणी, मानधन इत्यादी सर्व कामे या अंतर्गत केल्या जातात.अधिकारी
Mohite sir1

श्री. रवींद्र टी. मोहिते

उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पा. व. स्व.)
07172-274352 , 9423297010
nbazpchandrapur@gmail.com

कार्यादेश