Logo1
flag

विभाग व योजना

list-of-department
महिला व बाल कल्याण विभाग

एबाविसे योजनेचे उद्देश्य

 • > ० ते ६ वर्ष वयोगटातील बालकांच्या पोषण व आरोग्य विषयक स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणणे.
 • > बालकांच्या योग्य शारीरीक, मानसिक व सामाजिक विकासाचा पाया घालणे.
 • > अर्भक मृत्यू , बालमत्यू कुपोषण व शाळा गळतीच्या प्रमाणात घट करणे.
 • > बाल विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध विभागांमध्ये धोरण निश्चिती आणि कार्यक्रमाची 
 •      अंमलबजावणी करणेसाठी प्रभावी समन्वय कायम ठेवणे.
 • > योग्य पोषण आहार व आरोग्य शिक्षण याद्वारे बालकांचे सामान्य आरोग्य व पोषणासंबंधी काळजी  घेण्यासाठी मातांना सक्षम बनविणे.

एबाविसे योजने अंतर्गत देण्यात येणा-या सेवांची माहिती

 • > पूरक पोषण आहार
 • > आरोग्य तपासणी
 • > लसीकरण
 • > संदर्भ सेवा
 • > अनौपचारिक पूर्व प्राथमिक शिक्षण
 • > आरोग्य व पोषण शिक्षण

एबाविसे योजने अंतर्गत लाभ देण्यात येणारे लाभार्थी

 • > ० ते ६ महिने वयोगटातील बालके
 • > ६ महिने ते ३ वर्ष वयोगटातील बालके
 • > ३ वर्ष ते ६ वर्ष वयोगटातील बालके
 • > गर्भवती व स्तनदा माता
 • > किशोरवयीन मुली
 • > १५- ४५ वयोगटातील अन्य महिला
फोटो
2
योजना
अ) 10 टक्के महिला व बाल कल्याण योजना 1) महिला प्रतिनिधींसाठी प्रशिक्षण व मेळाव्याचे आयोजन करणे :-

अ) 10 टक्के महिला व बाल कल्याण योजना  
1) महिला प्रतिनिधींसाठी प्रशिक्षण व मेळाव्याचे आयोजन करणे :-
उद्देशः- महिला लोक प्रतिनिधींना पंचायत राज व त्यांचे अधिकारा बाबत प्रशिक्षीत करणे जेणे करुन त्या आपल्या कार्यक्षेत्रात उत्कृष्ट काम करु शकतील.
लाभार्थी निकष:- लाभार्थी हा ग्राम पंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद येथील महिला लोकप्रतिनिधी असावा. 
अर्ज करण्याची पध्दतः- सदरहु योजना वैयक्तीक लाभाची नाही त्यामुळे अर्ज करण्यांची पध्दत शासन निर्णयानुसार ठरवून दिलेली नाही. 
 अर्जासोबत लागणारे कागदपत्र:- सर्वच महिला लोक प्रतिनिधींना प्रशिक्षण द्यावयाचे असल्याने अर्ज मागविण्यात येत नाही.2) आदर्श अंगणवाडी सेविका / मदतनिस पूरस्कार :-

2) आदर्श अंगणवाडी सेविका / मदतनिस पूरस्कार :-
उद्देशः- ज्या अंगणवाडीचे कार्य उत्कृष्ट आहे, अशा अंगणवाडी केंद्रातील सेविका/मदतनीस यांना पुरस्कृत करण्यात येते. त्यामुळे इतर अंगणवाडी सेविका/ मदतनीस यांच्यामध्ये सुध्दा चांगले काम करण्यांस प्रेरणा निर्माण व्हावी. 
लाभार्थी निकष:- लाभार्थी अंगणवाडीत सेविका/मदतनिस या मानधनी सेवेत कार्यरत असणे आवश्यक.निवड झालेल्या अंगणवाडी सेविका यांना रु.3000/- व मदतनीस यांना रु.2000/- रोखबक्षीस देण्यात येऊन सत्कार करण्यात येतो. (पुरस्काराचे रक्कमेत महिला व बाल कल्याण समितीने ठरवल्यानुसार बदल होवू शकतो) 
अर्ज करण्याची पध्दत:- विहीत नमुन्यात प्रस्तात मागविण्यात येतो. प्राप्त प्रस्तावाची बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे कार्यालयातुन छाननी करुन प्रत्येकी तिन प्रस्ताव उप मु.का.अ.(बाक) यांचेकडे सादर करण्यात येतात. प्राप्त तिन प्रस्तावाची छाननी करुन ज्या सेविका/मदतनिसचे उत्कृष्ट काम असेल अशांना निवड समिती निवड करते. 
अर्जासोबत लागणारे कागदपत्र:- विहीत नमुन्यातील प्रस्ताव व त्यासोबत इतर बक्षीस पात्र कागदपत्र.3) ग्रामीण भागातील महिलांना 90% अनुदानावर सौर कंदील पुरविणे :-

3) ग्रामीण भागातील महिलांना 90% अनुदानावर सौर कंदील पुरविणे :-
उद्देशः- ग्रामीण भागातील महिलांना वैयक्तीक लाभ मिळावा तसेच महिलांचा दर्जा उंचावणे व त्यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देणे. 
लाभार्थी निकष:- महिला लाभार्थी दारिद्र रेषेखालील असावी किंवा वार्षिक उत्पन्न रु.50,000/- पर्यत असावे. लाभार्थी हा त्या गांवातील रहिवासी असणे आवश्यक आहे. 
अर्ज करण्याची पध्दत:- कार्यालया मार्फत ठरवून दिलेल्या विहित प्रपत्रात अर्ज करणे आवश्यक राहील. 
अर्जासोबत लागणारे कागदपत्र :- 2. सरपंच/सचिव यांचा त्याच गांवातील रहिवासी असल्याचा दाखला. 3. लाभार्थी अपंग असल्यास सक्षम अधिका-याचे प्रमाणपत्र. 4. ओळखपत्र (मतदान कार्ड, आधारकार्ड, रेशनकार्ड ई.) 5. दा.रे. खालील असल्याचे प्रमाणपत्र किंवा वार्षिक उत्पन्न रु. 50,000/- पर्यंत असल्याबाबत तहसिलदार यांचा दाखला. अंगणवाडी पर्यावेक्षीकेचा दाखला.4) ग्रामीण भागातील वर्ग 5 वी ते 12 वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या मुलींना लेडीज सायकल पुरविणे :-

4) ग्रामीण भागातील वर्ग 5 वी ते 12 वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या मुलींना लेडीज सायकल पुरविणे :-
उद्देशः- ग्रामीण भागातील वर्ग 5 वी ते 12 वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या मुलींना शाळेमध्ये जाण्या-येण्याची सुविधा उपलब्ध व्हावी याकरीता दारिद्र रेषेखालील किंवा ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 50,000/- पेक्षा जास्त नाही तसेच ज्यांना शाळेमध्ये त्यांचे राहते गावापासुन कमीत कमी 2 किलोमीटर अंतर चालत जावे लागते अशा विद्यार्थीनींना लाभ देण्यात येतो. तसेच लाभार्थी संपल्यावर योजनेवरील प्राप्त तरतुदीनुसार ज्यांना शाळेमध्ये त्यांचे राहते गावापासुन कमीत कमी 1 किलोमीटर अंतर चालत जावे लागते अशा लाभार्थ्यांचा विचार करण्यात येतो. लाभार्थी निकष :- 1. लाभार्थी ग्रामीण भागातील रहिवासी असावी. 2. लाभार्थी वर्ग 5 वी ते 12 वी मध्ये शिक्षण घेत असावी. 3.लाभार्थी आर्थीकदृष्ट्या कमकुवत घटकातील असावी. 4.लाभार्थ्यांचे गांव शाळेपासुन कमीत कमी 2 कि.मी. असावे. 
लाभाचे स्वरुप :- ग्रामीण भागातील मुलींना शाळेत जाण्या-येण्याच्या सुविधेकरीता वैयक्तीक लाभ देणे. 
अर्ज करण्याची पध्दतः- कार्यालयामार्फत ठरवुन दिल्यानुसार विहीत नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. सदरहु अर्ज बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे कडे सादर करणे आवश्यक. 1. अर्जासोबत लागणारे कागदपत्रः- 2. सरपंच/सचिव यांचा त्याच गांवातील रहिवासी असलेला दाखला. 3. जन्मतारखेचा दाखला 4. ज्या वर्गात शिकत आहे त्याबाबत तसेच राहते गावापासून ते शाळेपर्यंतच्या अंतराबाबतचे मुख्याध्यापकांचे प्रमाणपत्र दा.रे. खालील असल्याचे प्रमाणपत्र किंवा वार्षिक उत्पन्न रु. 50,000/- पर्यंत असल्याबाबत तहसिलदार यांचा दाखला.५) ग्रामीण भागातील घटस्पोटीत व परितक्त्या महिलांना घरकुल अर्थसहाय्य :-

उद्देशः- ग्रामीण भागातील दोलायमान परिस्थितीत जीवन जगावे लागणार्याक ज्या घटस्फोटीत व परितक्त्या महिलांकडे हक्काचे घर नाही अशा दारिद्र रेषेखालील व वार्षिक उत्पन्न रु. 50,000/- पर्यंत असणार्यार महिलांना हक्काचा निवारा मिळावा म्हणुन रु. 50,000/- पर्यंत अर्थसहाय्य देणे. लाभार्थी निकष:- 1. लाभार्थी ग्रामीण भागातील रहिवासी असावी. 2. लाभार्थी घटस्पोटीत किंवा परितक्त्या असणे आवश्यक. 3. लाभार्थी आर्थीकदृष्ट्या कमकुवत घटकातील असावी.         लाभाचे स्वरुपः- १. ग्रामीण भागातील घटस्फोटीत व परितक्त्या महिलांना घरकुलाकरीता रु. 50,000/- पर्यंत अर्थसहाय्य देणे. लाभार्थ्यांची निवड झाल्यानंतर घरकुल बांधकामाकरीता खालील प्रमाणे अर्थसहाय्य देण्यात येईल. २. घरकुल बांधकामास सुरुवात करण्याकरीता प्रथम रु. 20,000/- ३. घरकुलाचे बांधकाम जोता लेवल पर्यंत आल्यानंतर रु. 20,000/- ४. घरकुलाचे बांधकाम पुर्ण झाल्याबाबत प्रमाणपत्र सादर केल्यानंतर रु. 10,000/- अर्ज करण्याची पध्दतः- कार्यालयामार्फत ठरवुन दिल्यानुसार विहीत नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. सदरहू अर्ज बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे कडे सादर करणे आवश्यक. 
अर्जासोबत लागणारे कागदपत्रः- 1. सरपंच/सचिव यांचा त्याच गांवातील रहिवासी असल्याबाबतचा दाखला. 2. ओळखपत्र (मतदान कार्ड, आधारकार्ड, रेशनकार्ड ई.) 3. दा.रे.खालील असल्याचे () प्रमाणपत्र किंवा तहसिलदार यांचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला जोडणे आवश्यक. 4. राहण्यासाठी घर नसलयाबाबत ग्राम पंचायतीचे प्रमाणपत्र 5. स्वतःची जागा उपलब्ध असल्याबाबत ग्राम सेवकाचे प्रमाणपत्र 6. लाभार्थी अपंग असल्यास सक्षम अधिकार्यासचे अपंगाबाबतचे प्रमाणपत्र 7. यापुर्वी घरकुल योजनेचा लाभ मिळाला नसल्याबाबतचे चे प्रमाणपत्र 8. घरकुल मंजुर झाल्यानंतर तिन महिण्यात घरकुल पुर्ण करुन देण्याबाबत लाभार्थ्यांचे संमतीपत्र घटस्फोटीत असल्यास कोर्टाचा आदेश व परितक्त्या असल्यास अॅफेडीव्हीट.६) दुर्धर आजारी मुलांचे शस्त्रक्रियेसाठी अर्थसहाय्य (0 ते 6 वर्ष वयोगट) :-

६) दुर्धर आजारी मुलांचे शस्त्रक्रियेसाठी अर्थसहाय्य (0 ते 6 वर्ष वयोगट) :- 
उद्देश:- ज्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे अशा कुटुंबातील 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुलामुलींच्या ह्दय शस्त्रक्रिया, ह्दय उपमार्ग शस्त्रक्रिया, अस्थिव्यंग असणा-या क्लेप पळॅलेट, सेरेब्रलपाल्सी, कर्करोग, किडणीतील दोष अशा गंभीर शस्त्रक्रिया करणेसाठी, त्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य मिळावे म्हणुन प्राथमिक तपासणीसाठी रु. 15,000/- पर्यंत व ऑपरेशन झाल्यानंतर रु. 35,000/- पर्यंत किंवा प्रत्यक्ष झालेला खर्च यापैकी कमी असेल ती रक्कम अर्थसहाय्य देता येईल. 
 लाभार्थी निकष :- 1. लाभार्थी ग्रामीण भागातील रहिवासी असावी. 2. लाभार्थी 0 ते 6 वर्ष वयोगटातील असावा. 3.लाभार्थी आर्थीकदृष्ट्या कमकुवत घटकातील असावी. 
लाभाचे स्वरुपः- ग्रामीण भागातील 0 ते 6 वर्ष वयोगटातील दुर्धर आजारी मुलांचे शस्त्रक्रियेसाठी रु. 50,000/- पर्यंत अर्थसहाय्य देणे. 
अर्ज करण्याची पध्दतः- विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. सदरहू अर्ज बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे कडे सादर करणे आवश्यक. 
अर्जासोबत लागणारे कागदपत्र :- 1. सरपंच/सचिव यांचा त्याच गांवातील रहिवासी असलेला दाखला 2. लाभार्थी 0 ते 6 वर्ष वयोगटातील असावा. 3. लाभार्थ्यांचे कुटुंब दारिद्र रेषेखालील असल्याबाबतचे प्रमाणपत्र किंवा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 50,000/- चे मर्यादेत असल्याबाबतचे तहसिलदारचे प्रमाणपत्र. 4. आजाराबाबतचे वैद्यकिय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र व इतर आवश्यक दस्तऐवज.७ ) ग्रामीण भागातील महिलांना 90% अनुदानावर शिलाई मशिन + पिको फॉल मशिन (टु ईन वन) पुरविणे :-

७ ) ग्रामीण भागातील महिलांना 90% अनुदानावर शिलाई मशिन + पिको फॉल मशिन (टु ईन वन) पुरविणे :- 
उद्देश :- ग्रामीण भागातील महिलांना वैयक्तीक लाभ मिळावा (90% अनुदानावर) तसेच महिलांचा दर्जा उंचावणे व त्यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देणे.
लाभार्थी निकष :- महिला लाभार्थी दारिद्र रेषेखालील असावी किंवा वार्षिक उत्पन्न रु.50,000/- पर्यत असावे. लाभार्थी त्या गांवातील रहीवासी असणे आवश्यक आहे. 
अर्ज करण्याची पध्दतः- विहीत नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. सदरहू अर्ज बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे कडे सादर करणे आवश्यक. 
अर्जासोबत लागणारे कागदपत्रः- 1. शिवणक्लास प्रशिक्षण पुर्ण केल्याबाबतचा दाखला 2. सरपंच/सचिव यांचा त्याच गांवातील रहिवासी असल्याबाबतचा दाखला. 3. ओळखपत्र (मतदान कार्ड, आधारकार्ड, रेशनकार्ड ई.) दा.रे.खालील असल्याचे प्रमाणपत्र किंवा वार्षिक उत्पन्न रु. 50,000/- पर्यंत असल्याबाबत तहसिलदार यांचा दाखला.८ ) इयत्ता 7 वी ते 12 वी पास मुलींना व महिलांना संगणक () प्रशिक्षण देणे :-

८ ) इयत्ता 7 वी ते 12 वी पास मुलींना व महिलांना संगणक () प्रशिक्षण देणे :-
उद्देशः- सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात नौकरी करीता चे प्रशिक्षण आवश्यक आहे तसेच स्वयंरोजगाराकरीता सुध्दा वरील प्रशिक्षणाची आवश्यक्ता असते. त्यामुळे वरील प्रमाणे प्रशिक्षण दिल्या जाते. 
लाभार्थी निकष :- 1.महिला ग्रामीण भागातील रहिवासी असावी. 2.महिलांनी 7 वी ते 12 वी पास असणे आवश्यक राहील. लाभाचे स्वरुपः- महिलांना संगणक व तत्सम प्रशिक्षण देऊन त्यांना शासकीय व निमशासकीय नौकरी करीता किंवा स्वयंरोजगारा करीता तयार करणे. 
अर्ज करण्याची पध्दतः- विहीत नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. सदरहू अर्ज बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे कडे सादर करणे आवश्यक. 
अर्जासोबत लागणारे कागदपत्रः- 1. जन्मतारखेचा दाखला 2. सरपंच/सचिव यांचा त्याच गांवातील रहिवासी असल्याबाबतचा दाखला 3. शैक्षणीक अर्हतेचे प्रमाणपत्र 4. अपंग असल्यास सक्षम अधिकार्या चे प्रमाणपत्र 5. दा.रे. खालील असल्याचे प्रमाणपत्र किंवा वार्षिक उत्पन्न रु. 50,000/- पर्यंत असल्याबाबत तहसिलदार यांचा दाखला जोडणे आवश्यक.९) ग्रामीण भागातील मुलींना विविध स्पर्धा परिक्षासाठी प्रशिक्षण देणे :-

९) ग्रामीण भागातील मुलींना विविध स्पर्धा परिक्षासाठी प्रशिक्षण देणे :-
लाभाचे स्वरुप:- महिलांना विविध स्पर्धा परिक्षेबाबतचे प्रशिक्षण देऊन त्यांना शासकीय व निमशासकीय नौकरी करीता किंवा स्वयंरोजगारा करीता तयार करणे. 
लाभार्थी निकष:- 1.महिला ग्रामीण भागातील रहिवासी असावी. 2.महिलांनी 12 वी पास असणे आवश्यक राहील. 3. लाभार्थ्यांचे कुटुंब दारिद्र रेषेखालील असल्याबाबतचे प्रमाणपत्र किंवा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.50,000/- चे मर्यादेत असल्याबाबतचे तहसिलदारचे प्रमाणपत्र. 
अर्ज करण्याची पध्दत:- विहीत नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. सदरहु अर्ज बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे कडे सादर करणे आवश्यक. 
अर्जासोबत लागणारे कागदपत्रः- 1. सरपंच/सचिव यांचा त्याच गांवातील रहिवासी असल्याबाबतचा दाखला. 2. शैक्षणीक अर्हतेचे प्रमाणपत्र. 3. ओळखपत्र (मतदान कार्ड, आधारकार्ड, रेशनकार्ड ई.) 4. अपंग असल्यास सक्षम अधिकार्या चे प्रमाणपत्र 5. दा.रे. खालील असल्याचे प्रमाणपत्र किंवा वार्षिक उत्पन्न रु. 50,000/- पर्यंत असल्याबाबत तहसिलदार यांचा दाखला.१०) ग्रामीण भागातील मुलींना व महिलांना 90% अनुदानावर व्यावसायीक व तांत्रिक प्रशिक्षण देणे ( 10 टक्के म. व बा.क. व जिल्हा निधी )

१०) ग्रामीण भागातील मुलींना व महिलांना 90% अनुदानावर व्यावसायीक व तांत्रिक   प्रशिक्षण देणे ( 10 टक्के म. व बा.क. व जिल्हा निधी )
उद्देशः-  व्यावसायीक व तांत्रिक प्रशिक्षण योजने अंतर्गत ग्रामीण भागातील मुली व महिलांना इंग्रजी / मराठी टायपिंग, लघुलेखन, बेकिंग, संगणक दुरुस्ती, मोटार ड्रायव्हींग, ब्युटी पार्लर, इत्यादी प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगाराकरीता तयार करणे. 
लाभार्थी निकष:- 1.महिला लाभार्थी ग्रामीण भागातील रहिवासी असावी. 2.महिला लाभार्थी दारिद्र रेषेखालील असावी किंवा त्यांचे वार्षिक उत्पन्न रु.50,000/- पर्यंत असावे. 
लाभाचे स्वरुप:- महिलांना विविध प्रकारचे व्यावसायीक व तांत्रीक प्रशिक्षण देण्यात येते. यात प्रशिक्षणाचा जो खर्च येईल त्याचे 10% हिस्सा लाभार्थ्यांनी द्यावयाचा आहे. शासन निर्णयानुसार प्रशिक्षणाकरीता प्रति लाभार्थी रु.5000/- खर्चाची मर्यादा ठेवलेली आहे. 
अर्ज करण्यांची पघ्दतः- विहीत नमुन्यातील अर्ज लाभार्थ्यांनी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना भरुन द्यावयाचा आहे. बाल विकास प्रकल्प अधिकारी प्राप्त अर्जाची छाननी करुन योग्य त्या लाभार्थ्यांचे नांव उप मु.का.अ.(बाक) यांचेकडे सादर करेल. अर्जासोबत लागणारे कागदपत्रः- 1. जन्मतारखेचा दाखला 2. शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र. 3. ओळखपत्र (मतदान कार्ड, आधारकार्ड, रेशनकार्ड ई.) 4. अपंग असल्यास सक्षम अधिकार्यामचे प्रमाणपत्र. 5. रहिवासी प्रमाणपत्र 6. दारिद्र रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र किंवा वार्षिक उत्पन्न रु. 50,000/- पर्यंत असल्याबाबत तहसिलदार यांचा दाखला.११) विशेष प्राविण्य मिळालेल्या मुलींचा सत्कार व उच्च शिक्षणाकरीता अर्थसहाय्य /शिष्यवृत्ती :-

११) विशेष प्राविण्य मिळालेल्या मुलींचा सत्कार व उच्च शिक्षणाकरीता अर्थसहाय्य /शिष्यवृत्ती :-
लाभाचे स्वरुप :- ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील राज्यस्तरावर क्रिडा, कला, शिक्षण अशा विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळालेल्या मुलींचा सत्कार करणे व महिला व बाल कल्याण समितीने ठरवुन दिल्यानुसार 12 वी नंतरच्या उच्च शिक्षणाकरीता आवश्यक आर्थिक मदत करणे. 
लाभार्थी निकष :- 1. लाभार्थी ग्रामीण भागातील रहिवासी असावी. 2. विशेष प्राविण्य मिळाल्याबाबतचे प्रमाणपत्र. 3. उच्च शिक्षणाकरीता प्रवेश घेतल्याबाबतचे शैक्षणिक प्रमाणपत्र. 4. लाभार्थ्यांचे कुटुंब दारिद्र रेषेखालील असल्याबाबतचे प्रमाणपत्र किंवा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.50,000/- चे मर्यादेत असल्याबाबतचे तहसिलदारचे प्रमाणपत्र. 
अर्ज करण्याची पध्दतः- विहीत नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. सदरहू अर्ज बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे कडे सादर करणे आवश्यक. 
अर्जासोबत लागणारे कागदपत्रः- 1. सरपंच/सचिव यांचा त्याच गांवातील रहिवासी असल्याबाबतचा दाखला. 2. विशेष प्राविण्य मिळाल्याबाबतचे प्रमाणपत्र. 3. उच्च शिक्षणाकरीता प्रवेश घेतल्याबाबतचे शैक्षणीक प्रमाणपत्र. 4. दा.रे. खालील असल्याचे प्रमाणपत्र किंवा वार्षिक उत्पन्न रु. 50,000/- पर्यंत असल्याबाबत तहसिलदार यांचा दाखला जोडणे आवश्यक.१२) ग्रामीण भागातील मुलींना स्पर्धा परीक्षेकरीता जिल्हा स्तर व तालुका स्तरावर मार्गदर्शन शिबीर आयोजीत करणे :-

१२) ग्रामीण भागातील मुलींना स्पर्धा परीक्षेकरीता जिल्हा स्तर व तालुका स्तरावर मार्गदर्शन शिबीर आयोजीत करणे :-
लाभाचे स्वरुप:- मार्गदर्शन शिबिराद्वारे तज्ञ व्यक्तींकडुन मुली व महिलांना विविध स्पर्धा परीक्षेबाबतची माहिती देऊन त्यांना शासकीय व निमशासकीय नौकरी करीता किंवा स्वयंरोजगारा करीता तयार करणे. 
लाभार्थी निकष :- 1.महिला ग्रामीण भागातील रहिवासी असावी. 2.महिलांनी 12 वी पास असणे आवश्यक राहील. 
अर्ज करण्याची पध्दतः- ग्रामीण भागातील वर्ग 12 वी उत्तीर्ण तसेच पुढील शिक्षण घेणार्याव सर्वच मुली व महिलांना मार्गदर्शन शिबिरामध्ये सहभागी होता येणार असल्यामुळे अर्ज करण्याची आवश्यकता नाही.१३) महिलांसाठी समुपदेशन केंद्र चालविणे :-

१३) महिलांसाठी समुपदेशन केंद्र चालविणे :-
उद्देशः- ज्या महिलांना कौटुंबिक मारहाण, लैगिक छळ व इतर त-हेने त्रासलेल्या अशा महिलाचे समुपदेशनाव्दारे अडचणी सोडविण्यात येते. 
लाभार्थी निकषः- या योजने अंतर्गत कोणतेही लाभार्थी निकष ठरवून दिलेले नाही. 
लाभाचे स्वरुपः- यात महिलांच्या समोपचाराने समस्या सोडविण्यांत येतात व कायदेशिर सल्ला देण्यात येतो. 
अर्ज करण्याची पध्दतः- ज्या महिलांना कौटूंबिक व इतर त-हेने छळ होत असेल अशा महिलांनी त्या-त्या प्रकल्पातील समुपदेशन केंद्राकडे अर्ज करावा लागतो व होणा-या छळाची माहिती द्यावी लागते.
अर्जासोबत लागणारे कागदपत्रः- याबाबत अर्जासोबत कोणतेही कागदपत्राची आवश्यकता नाही.14) अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षीका यांना प्रशिक्षण देणे :-

14) अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षीका यांना प्रशिक्षण देणे :-

उद्देश:- एकात्मीक बाल विकास सेवा योजने अंतर्गत अंगणवाडी पर्यवेक्षीका यांना जिल्हास्तरावर व अंगणवाडी सेविका / मदतनिस यांना प्रकल्प स्तरावर प्रशिक्षण देणे. 
लाभार्थी निकष:- जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत सर्वच अंगणवाडी पर्यवेक्षीका / सेविका / मदतनीस
अर्ज करण्याची पद्धत:- अर्ज करण्याची आवश्यकता नाही. बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी प्रस्तावित केलेल्या अंगणवाडी पर्यवेक्षीका / सेविका / मदतनिस यांना प्रशिक्षण देण्यात येईल. अर्जासोबत लागणारे कागदपत्रः- याबाबत अर्जासोबत कोणतेही कागदपत्राची आवश्यकता नाही.१५) अंगणवाडी भाडे (खाजगी इमारतीत सुरु असलेल्या अंगणवाडीकरीता) :-

१५) अंगणवाडी भाडे (खाजगी इमारतीत सुरु असलेल्या अंगणवाडीकरीता) :- 
उद्देशः- ज्या ठिकाणी अंगणवाड्याकरीत स्वतंत्र इमारत नाही त्या ठिकाणी अंगणवाडी चालविण्याकरीता भाड्याने इमारत घेंणे.
लाभार्थी निकषः- सदरहू योजना वैयक्तीक लाभाची नाही. ज्या गांवात अंगणवाडी इमारत नाही व भाडयाच्या इमारतीमध्ये अंगणवाडी केंद्र सुरु आहेत अशा गावांची यादी व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी निश्चित केल्यानुसार जागांचे भाडेमूल्य संबंधीत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना अदा करण्यात येतो. 
लाभाचे स्वरुपः- ज्या गांवात अंगणवाडी इमारत नाही अशा गांवात भाडे तत्वावर एखादी इमारत घेऊन अंगणवाडी सुरु करणे. 
अर्ज करण्याची पध्दतः- ज्या ठिकाणी अंगणवाडी करीता स्वतंत्र इमारत नाही, अशा प्रकल्पाकडून यादी मागवून सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी निश्चित केल्यानुसार जागांचे भाडेमुल्य संबंधीत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना अदा करण्यात येते. अर्जासोबत लागणारे कागदपत्र:- सदरहू योजना वैयक्तीक लाभाची नाही.१६) अंगणवाडीतील बालकांना प्रोटीन पावडर पुरविणे (इंटरल फिड पावडर) व प्रोटीन सिरप पुरविणे :-

१६) अंगणवाडीतील बालकांना प्रोटीन पावडर पुरविणे (इंटरल फिड पावडर) व प्रोटीन सिरप पुरविणे :-
उद्देशः- अंगणवाडी कार्यक्षेत्रातील 6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील मुलामुलींना अंगणवाडी मार्फत आहार दिला जातो. या व्यतीरीक्त कुपोषित मुलांचे कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे यासाठी विशेष आहार म्हणून प्रोटीन पावडर व प्रोटीन सिरप पुरवठा करणे. 
लाभार्थी निकषः-  अंगणवाडी कार्यक्षेत्रातील 6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील बालके. 
अर्ज करण्याची पध्दतः- सदरहू योजना वैयक्तीक लाभाची नाही. परंतु अंगणवाडीला कोणत्या साहित्याचीआवश्यकता आहे याबाबत संबंधीत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचेकडुन मागणी सादर करण्याबाबत सुचना देण्यात येतात. व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे मार्फत प्राप्त मागणी नुसारच आवश्यक साहित्याचा पुरवठा केल्या जातो. 
अर्जासोबत लागणारे कागदपत्र:- सदरहू योजना वैयक्तीक लाभाची नसून अर्ज करण्यांची आवश्यकता नाही.1७) अंगणवाडी केंद्राकरीता वजनकाटे पुरविणे (लहान मुले व गरोदर मातांकरीता) :-

1७) अंगणवाडी केंद्राकरीता वजनकाटे पुरविणे (लहान मुले व गरोदर मातांकरीता) :-
उद्देश:- एकात्मीक बाल विकास सेवा योजनेखालील अंगणवाड्यांना एकात्मिक बाल विकास सेवेकडुन विविध साहित्य पुरविण्यात येते. मात्र हे साहित्य अपूरे पडते त्यामुळे या अंगणवाडीतील, मिनी अंगणवाडीतील बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी साहित्याची आवश्यकता असल्यास यावरील खर्च जिल्हा परिषदेने स्वतःच्या / शासन निधीतून करुन साहित्याचा पुरवठा करावयाचा असल्यामुळे अंगणवाडी केंद्राकरीता वजनकाटे पुरविणे (लहान मुले व गरोदर मातांकरीता ) लाभार्थी निकषः- अंगणवाडी कार्यक्षेत्रातील बालके व गरोदर माता. 
अर्ज करण्याची पध्दतः- सदरहु योजना वैयक्तीक लाभाची नाही. परंतु, अंगणवाडीला कोणत्या साहित्याची आवश्यक्ता आहे याबाबत संबंधीत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचेकडुन मागणी सादर करण्यातबाबत सुचना देण्यात येतात. व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे मार्फत प्राप्त मागणी नुसारच आवश्यक साहित्याचा पुरवठा केल्या जातो. 
अर्जासोबत लागणारे कागदपत्रः- सदरहू योजना वैयक्तीक लाभाची नसुन अर्ज करण्यांची आवश्यकता नाही.ब) जिल्हा निधीतील योजना -- 1) ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींना व महिलांना जेंडर, आरोग्य, कुटुंबनियोजन, कायदेविषयक प्रशिक्षण देणे :-

ब) जिल्हा निधीतील योजना -  1) ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींना व महिलांना जेंडर, आरोग्य, कुटुंबनियोजन, कायदेविषयक प्रशिक्षण देणे :-
उद्देशः- शाळेत किंवा महाविद्यालयात मुलामुलींना त्यांचे मानसिक, सामाजीक, मनावैज्ञानिक याबाबत प्रशिक्षण दिल्या जात नसल्यामुळे, जेंडर प्रशिक्षण आयोजीत करण्यात येते. जेणे करुन त्यांना उदभवणा-या समस्या बाबत समज येईल. लहान बालकांना विशेषतः मुलींना  लैंगिक हिंसाचारापासून वाचविण्यासाठी विशेष प्रयत्न. 
लाभार्थी निकष :- ग्रामीण भागातील सर्वच किशोरवयीन मुली व महिला. 
लाभाचे स्वरुप :- ग्रामीण भागातीलशाळेत किंवा महाविद्यालयात मुलामुलींना त्यांचे शारीरीक बदलाबाबतचे प्रशिक्षण देणे व लहान बालकांना विशेषतः मुलींना लैंगिक हिंसाचारापासून वाचविण्यासाठी विशेष प्रयत्न करणे. 
अर्ज करण्याची पध्दत :- ग्रामीण भागातील सर्वच किशोरवयीन मुली व महिलांना सदर योजनेचा लाभ द्यावयाचा असल्यामुळे अर्ज करण्याची आवश्यकता नाही. 
अर्जासोबत लागणारे कागदपत्र :- अर्ज सादर करावयाचा नसल्यामुळे कागदपत्रांची आवश्यकता नाही.2) अंगणवाडीतील बालकांना साहित्य पुरविणे (बैठक व्यवस्थेकरीता बस्करपट्टी) :-

2) अंगणवाडीतील बालकांना साहित्य पुरविणे (बैठक व्यवस्थेकरीता बस्करपट्टी) :-

उद्देशः- अंगणवाडीचा दर्जा उंचावणे व अंगणवाडीतील बालकांच्या सुविधेकरीता लागणारे आवश्यक साहित्य पुरविणे. 
लाभार्थी निकषः- सदरहू योजना वैयक्तीक लाभाची नाही. अंगणवाडीस लागणारे आवश्यक साहित्य शासन निर्णयाचे अधिन राहुन पुरविणे. 
 अर्ज करण्याची पध्दतः- सदरहू योजना वैयक्तीक लाभाची नाही. परंतु, अंगणवाडीला कोणत्या साहित्याची आवश्यक्ता आहे याबाबत संबंधीत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचेकडुन मागणी सादर करण्यातबाबत सुचना देण्यात येतात. व त्यानुसारच आवश्यक साहित्याचा पुरवठा केल्या जातो. 
अर्जासोबत लागणारे कागदपत्रः- सदरहू योजना वैयक्तीक लाभाची नसून अर्ज करण्यांची आवश्यकता नाही.अधिकारी
Thumbuse

श्री.संजय जोल्हे

महिला व बाल विकास अधिकारी
07172-273606 , -
dyceobkzpchandrapur@gmail.com

कार्यादेश