Logo1
flag

विभाग व योजना

list-of-department
बांधकाम विभाग

ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण करणे (योजने अंतर्गत कामे) 

३०५४ मार्ग व पुल (बिगर आदिवासी) या अंतर्गत प्रामुख्याने इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्गाची कामे घेण्यात येतात. या मध्ये रस्ते सुधारणा/अस्तिवातील रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण इत्यादी कामे करण्यात येतात. 

 

योजनेतर रस्ते विशेष दुरूस्ती करणे कार्यक्रम व वार्षिक दुरूस्ती करणे.

अस्तिवातील जिल्हा परिषद मालकीचे इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग दर्जा असलेले व रस्ते आराखडे मध्ये सामाविष्ट असलेल्या रस्त्याची खालील प्रमाणे दुरूस्ती करणेची कामे केली जातात.

  • खडी व डांबराने ख़ड्डे भरणे
  • पाण्याचा निचरा होणेसाठी गटर्स बांधणे
  • पाणी वाहून जाण्यासाठु योग्य ठिकाणी सिमेंट पाईप टाकणे व पाणी वाहून जाणेसाठी योग्य दिशेने गटर्स काढणे
  • अति पावसामुळे खराब झालेले रस्ते दुरूस्त केली जातात.

मा.खासदार/मा.आमदार निधी अंतर्गत करण्यात येणारी कामे 

प्रामुख्याने मा.आमदार/खासदार/यांचेकडून आवश्यकतेनुसार व तातडीची कामे घेतली जातात. यामध्ये प्रामुख्याने रस्ते/शाळागृह/समाज मंदिर /व्यायाम शाळा इत्यादी कामे मंजूर केली जातात. 

तिर्थक्षेत्र विकास योजना ( ब वर्ग, क वर्ग)

जिल्हयातील तिर्थक्षेत्राना मा.जिल्हा नियोजन समितीमार्फत क वर्गीय तिर्थक्षेत्र म्हणून मान्यता देण्यात येते. याचा आराखडा तयार करून त्या ठिकाणी आवश्यक सुख सुविधा (उदा.शौचालय /स्वच्छता गृह/भक्त निवास/वाहनतळ/ पाणीपुरवठा/ पथदिवे/संरक्षक भित) इ.कामे घेतली जातात.प्रकल्प आराखड्यानुसार कामे हाती घेण्यात येतात. ब वर्ग तिर्थक्षेत्र घोषित झाल्यावर दरवर्षी एक लाख भाविक दर्शनास येत असलेबाबतचा प्रांताधिकारी/पोलिस निरीक्षक यांचा दाखला आवश्यक आहे. 

उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ 

या योजनेतून ग्रामपंचायत कार्यालय/संरक्षक भित/दशक्रिया घाट/प्रशिक्षण केंद्र इमारत/नविन रस्ता/पाणी पुरवठ्याची पुरक कामे घेतली जातात. 

२५१५ शासकिय योजना लोकप्रतिनीधींनी सुचविलेली कामे

या योजनेतून सामाजिक सभागृह, रस्ते दशक्रिया घाट, स्मशान भूमी व इतर विविध कामे मंजूर केली जातात. 


जिल्हा परिषद/पंचायत समिती नविन प्रशासकीय इमारती, निवासस्थाने बांधकामे 

पंचायत समिती नविन प्रशासकीय इमारतीचे बांधकामे व पदाधिकारी/अधिकारी कर्मचार्‍यांसाठी निवास स्थान बांधकाम करण्यात येतात. 


जिल्हा परिषद निधीतील विविध कामे

१. इमारतीचे मुळ कामे (सामाजिक सभागृह, सांस्कृतिक केंद्र/कर्मचारी व अधिकारी निवासस्थान) 

२. इमारत दु्रूस्ती व देखभाल (जिल्हा परिषद/पंचायत समिती मालकीच्या इमारतींची दुरूस्ती) 

३. रस्ते विशेष दुरूस्ती (अस्तिवातील जिल्हा परिषद मालकीचे रस्ते दुरूस्ती) 

४. विविध विकास कामे(नविन इमारती/संरक्षण भिंत/रस्ते)

५. विश्रामगृह दुरूस्ती(जिल्हा परिषद मालकीचे)

यामध्ये साधारण रस्ते/एस.टी थांबे/समाज मदिर/व्यायाम शाळा/सभा मंडप व नविन किरकोळ लांबीचे रस्ते व अस्तिवातील रस्त्यांची विशेष दुरूस्ती करणे आदी कामे केली जातात. 

फोटो
3
योजना
राज्य पुरस्कृत योजना 1) क वर्ग तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रमः-

राज्य पुरस्कृत योजना  - 1) क वर्ग तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रमः-

राज्यातील नागरी व ग्रामिण भागामध्ये अनेक प्रसीध्द यात्रा स्थळे, ऐतिहासीक, सांस्कृतिक निसर्ग रम्य स्थळे, स्मारके असुन अशा स्थळांना भावीक/पर्यटक/यात्रेकरू भेटी देत असतात. पर्यटनाच्या दृष्टीने अशा स्थळांचा विकास केल्यास अशा महत्वाच्या स्थळांची जोपासना होऊन पर्यटन व्यवसाय वृध्दीस लागेल. क वर्ग श्रेणी मध्ये जिल्हा स्तरावर स्थानिक महत्व असलेली ठिकाणे, जिल्हा नियोजन विकास मंडळाने उपलब्ध केलेल्या तरतुदी मधुन विकसीत करण्यात येणार आहे. तिर्थक्षेत्र /यात्रा स्थळांना भेट देणा-या यात्रेकरू/प्रवाशांची संख्या वार्षिक 1 लाख किंवा अधिक आहे अशा तिर्थक्षेत्र /यात्रा स्थळांना प्राधान्य द्यावयाचे आहे. जिल्हयातील क श्रेणी मधील ठिकाणाचा पर्यटनदृष्टया विकास करण्याच्या संदर्भात शासनाकडे/महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे विविध व्यक्तीकडून/संस्थेकडून अर्ज पाठविण्यात येतात. सदर निवेदन संबधित जिल्हयाच्या जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येतात. जिल्हाधिकारी ही निवेदने/अर्ज जिल्हा नियोजन समितीच्या विचारार्थ सादर करतात. जिल्हा नियोजन व विकास मंडळापुढे पर्यटन विकासासाठी ठेवण्यात आलेल्या स्थळांच्या बाबतीत कोणत्या स्थळांचा प्राधान्याने विकास करावा याचे प्राधान्य ठरविण्यात येते. जिल्हयातील पर्यटन स्थळाचा विकासाच्या संदर्भात प्राधान्य ठरवितांना मा. मुख्यमंत्री, मा.उपमुख्यमंत्री, मा. मंत्री, मा. राज्यमंत्री यांनी जाहीर केलेल्या स्थळाचा विकास योजनेत प्राथम्याने विचार करावयाचा आहे. क वर्गातील तिर्थक्षेत्र/यात्रा स्थळांच्या विकास आराखडयास व त्या अंतर्गत समाविष्ट विविध प्रकल्पाचे ढोबळ अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार अति.मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. चंद्रपूर यांना देण्यात आले आहे. तिर्थक्षेत्र/ यांत्रा स्थळांचे विकास योजने मध्ये खालील पायाभूत सुविधाची कामे घेता येतील.1) पिण्याचे पाण्याची सोय, 2)पथदिवे, 3)शौचालय व स्नानगृह, 4) भक्त निवास, 5) वाहनतळ, 6) जोड 7) रस्त्याचे बांधकाम, 8)नदी असेल तर घाट, 9) तिर्थक्षेत्राचा परिसर सुशोभित व स्वच्छ राहावा यादृष्टीकोनातून उपलब्ध जागेवर झाडे लावणे/चे बांधकामे, ईत्यादी. सदर विकासाची कामे पूर्ण झाल्यानंतर त्याची देखभाल व दुरूस्ती करण्याची जबाबदारी संबंधित ग्रा.पं./जि.प. यांची असते. शक्य असेल त्या ठिकाणी ट्रस्ट स्थापन करण्याचा प्रयत्न करता येईल.2) ग्रामिण रस्त्याची देखभाल दुरूस्ती कार्यक्रम :-

2) ग्रामिण रस्त्याची देखभाल दुरूस्ती कार्यक्रम :-

जिल्हा परिषदेकडे इतर जिल्हा मार्ग व ग्रामिण मार्ग दर्जाच्या रस्त्यांच्या देखभाल दुरूस्तीची जबाबदारी जि. प. च्या बांधकाम विभागाकडे असून देखभाल दुरूस्ती व परिरक्षणाकरीता राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरवर्षी निधी मिळत असतो. सदर निधीमधून रस्ते, पुल व मो-या ची विशेष दुरुस्ती तथा किरकोळ दुरूस्तीची कामे केली जातात.3) जिल्हामध्ये डांबरी रस्त्यां -

3)   जिल्हामध्ये डांबरी रस्त्यां - 

जिल्हामध्ये डांबरी रस्त्यांचे 1864.68 कि.मी, खडी पृष्ठभागाच्या रस्त्याची 2213.83 कि.मी. व अपृष्ठांकीत रस्त्याची 844.52 कि..मी. अशी एकूण 4923.03 कि.मी. लांबी असून या लांबीपैकी दरवर्षी वाहतूकी योग्य रस्ते ठेवण्याकरीता खड्डे भरून योग्य पृष्ठभाग ठेवणे, डांबरी व खडीच्या पृष्ठभागाच्या रस्त्याची फेरडांबरीकरण तथा फेर खडीकरण आणि पुलांची दुरूस्ती तथा आवश्यक त्या ठिकाणी नविन मो-या तथा रपटयाची बांधकामे करण्यात येतात.4) ठक्कर बाप्पा अदिवासी वस्ती सुधार योजना :-

4) ठक्कर बाप्पा अदिवासी वस्ती सुधार योजना :-

वरिल प्रकल्पाचे अधिनस्त असलेल्या गावामध्ये दलित वस्ती सुधार योजनाचे धर्तीवर ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजना राबवावयाची आहे. ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा विस्तारीत कार्यक्रमांतर्गत आदिवासी उपयोजना क्षेत्र गाव, माडा, मिनी माडा, आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील क्षेत्र इत्यादी अंतर्गत प्रत्येक गावात एकावर्षी दोन कामे घेता येईल. तसेच गावाच्या लोकसंखेच्या 50% अनुसुचित जमातीची लोकसंख्या असलेल्या गावाकरीता सदर योजना राबवावयाची असून अनुसुचित जमातीची लोकसंख्या 1000 पेक्षा जास्त असलेल्या प्रत्येक गावात प्रत्येक कामासाठी रू. 15.00 लाखाची दोन कामे मात्र एकूण रू 25.00 लाखाचे आधिन राहून व 500 ते 999 लोकसंख्या पर्यत रू. 10.00 लक्ष आणि 500 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावात रू 5.00 लक्ष पर्यतची कामे घेता येईल. यामध्ये सामुहिक विकासाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी प्रस्तावीत सामुहिक लाभाच्या योजना घेण्यात येतात. यामध्ये आदिवासींना विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देणे, ग्राम स्वच्छता अभियान राबविणे इत्यादी बाबीचा समावेश आहे.जिल्हा निधी व सेस फंड :-

4) ठक्कर बाप्पा अदिवासी वस्ती सुधार योजना :-

ग्रामीण भागातील नागरीकांचे जीवनमान उंचावण्याचे दृष्टीने ग्रामीण भागातील नागरीकांना मुलभूत सुविधा पुरविण्याकरीता जिल्हा निधी व सेस फंड हया योजनेत जिल्हा परिषदेमार्फत दरवर्षी निधी उपलब्ध करण्यात येतो. अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या निधीचे जि.प.प्रभारात समप्रभारात वाटप करण्यात येते सन्मा.जि.प.सदस्यांनी त्यांना विहित केलेल्या निधीचे अधीन राहून सुचविलेल्या कामांनुसार नियोजन तयार करण्यात येते. वरील योजना अंतर्गत प्रामुख्याने गावातील रस्ते नाली, व मोरी बांधकाम, रंगमंच बांधकाम, शाळा/ ग्रामपंचायतीला संरक्षक भिंतीचे बांधकाम इ.विकास कामे हाती घेण्यात येतात.अधिकारी
Narendra burande

श्री.नरेंद्र बुरांडे

कार्यकारी अभियंता (बांधकाम)
दूरध्वनी क्र.07172-250518 , -
eewzpchandrapur@gmail.com

श्री.शेख

प्र.कार्यकारी अभियंता (बांधकाम)
दूरध्वनी क्र.07172-250518 , -
eewzpchandrapur@gmail.com


कार्यादेश