Logo1
flag

बातम्या आणि घोषणा

जिल्हा पाणी व स्वछता मिशन कक्ष (जलस्वराज्य-२) जि.प.चंद्रपूर अंतर्गत कंत्राटी पदभरती सूचना दि.03-03-2018

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, (जलस्वराज्य-2),

जिल्हा परिषद, चंद्रपूर

प्रसिध्दी पत्रक-2 - दिनांक :- 03/03/2018

 

उपरोक्त संदर्भांन्वये समाज व्यवस्थापन तज्ञ, ग्रामलेखा समन्वयक, सल्लागार( पाणी गुणवत्ता)  पदांसाठी अर्ज सादर करणाऱ्या सर्व उमेदवारांना याद्वारे सुचित करण्यात येत आहे की, संदर्भीय जाहिरात क्र.1 अन्वये देण्यात आलेल्या जाहिरातीनुसार पात्र/अपात्र तसेच विहित मुदतीनंतर अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची अंतरीम यादी ही जिल्हा परिषद, चंद्रपूरच्या संकेत स्थळावर (www.zpchandrapur.maharashtra.gov.in)  ई -नोटीसबोर्ड वर  जाहिर करण्यात आलेली आहे. त्यानुसार

1) अनुभव हा शासकीय, निमशासकीय, शासन अधिकृत कार्यालय, महामंडळे, संविधान मान्य विद्यापीठ मधूनच ग्राहय धरण्यात आला आहे.

2) सदर अंतरिम यादीवर उमेदवारांची आक्षेप / हरकती असल्यास दिनांक07/03/2018 ला सायंकाळी 5.45 वाजेपर्यत प्रत्यक्ष कार्यालयात लेखी निवेदन देणे आवश्यक आहे. सोबत आक्षेपासंबधाने पुरावा सादर करावे लागेल. परंतू अर्जात सूटलेले कागदपत्रे नव्याने लावता येणार नाही. सदर दिनांकानंतर येणा-या आक्षेप/हरकती ग्राहय धरल्या जाणार नाही याची नोंद घ्यावी.

3) निवड प्रक्रीये दरम्यान तसेच नियूक्ती नंतर उमेदवाराचे दस्ताऐवज खोटे आढळल्यास सदर पात्र उमेदवाराची निवड कोणत्याही टप्यावर रद्द करण्यात येईल.

4) पात्र अर्जाची अंतीम यादी जिल्हा परिषदेच्या संकेत स्थळावर (www.zpchandrapur.maharashtra.gov.in) प्रसिध्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी. याबाबतीत सर्व उमेदवारांनी संकेत स्थळाचे नियमितपणे अवलोक करणे आवश्यक आहे. उपरोक्त प्रमाणे नोंद घेण्यात यावी.https://zpchandrapur.maharashtra.gov.in/mr/recruitment