Logo1
flag

पर्यटन स्थळ

Tigers

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प

चंद्रपूर जिल्ह्यात असलेल्या ताडोबाच्या जंगलाला ताडोबा हे नाव येथील घनदाट जंगलात राहणाऱ्या आदिवासी जमातींच्या तारू किंवा ताडोबा या देवदेवतांच्या नावावरुन पडले असावे असे स्थानिक लोक सांगतात. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा प्रकल्प आहे. 625 स्क्वेअर किलोमिटर इतके मोठे याचे क्षेत्रफळ आहे. याचे प्रामुख्याने दोन मुख्य भाग असून 1955 पासून अस्तित्वात असलेले ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि 1986 मध्ये त्यात समाविष्ट करण्यात आलेले 508 स्क्वेअर किलोमिटरचे अंधारी अभयारण्य या दोन्हींचे मिळून बनलेले आजचे हे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे. या अभयारण्यातून अंधारी नावाची नदी वाहते. त्यावरुनही याला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प असे म्हणतात. यात प्रामुख्याने घनदाट जंगलांनी व्यापलेल्या टेकड्या या उत्तर आणि पश्चिम भागात आहेत. ताडोबा रिझर्व्ह मध्ये चिमुरच्या टेकड्यांचा परिसर येतो तर, अंधारी अभयारण्यात मोहर्ली आणि कोलसा टेकड्यांचा परिसर येतो. अंधारी नदीच्या व्यतिरिक्त असलेल्या पाणथळ जागा अर्थातच कोसला तळे जंगलाच्या मध्यवर्ती भागात आहे. ताडोबा हे मुख्यत्वे उष्ण कटिबंधीय जंगल प्रकारांमध्ये मोडते. याचा 87 टक्के भाग अतिसुरक्षित आहे. जंगलात ऐन, बीज, धौडा, हळदू, साल, सिमल, तेंदू, बेडहा, हरडा हे वृक्ष मोठ्या प्रमाणात असून महुआ, ब्लॅक प्लम, अर्जुन फळ, बांबू अशी वनसंपदाही आढळते.

प्राणीसंपदा

ताडोबाचे जंगल सर्वाधिक प्रसिद्ध आहे ते रॉयल बेंगॉल टायगर या वाघांच्या प्रजातीसाठी. सध्याच्या आकडेवारीनुसार येथे 80 वाघ आहेत. याशिवाय बिबट्या, रानमांजरी, हरणे, बारहसिंगे, चीतळ, गवे, रानडुक्कर, नीलगाय, रानकोंबड्या, ठिपकेवाली हरणे असे प्राणी आहेत. तर सरपटणा-या प्राण्यांमध्ये मगरी, सुसरी, अजगर, इंडियन कोब्रा, घोरपड हे प्रामुख्याने आढळतात. इंडियन स्टार जातीचे कासवही या ठिकाणी आढळते. त्याचबरोबर पाणथळ जागेत वावरणारे आणि जमिनीवर उडणारे सुमारे 195 विविध जातींच्या पक्षांची नोंद जंगलात करण्यात आली आहे.

Anandwan

आनंदवन वरोरा

वरोरा शहरातील उंच भागावर आनंदवन आश्रमाचे" स्थान आहे. श्री बाबा आमटे ज्यांचे कार्य आणि प्रयत्न ज्ञात आणि कुष्ठरोग्यांचे पुनर्वसन आणि काळजी घेणारे सामाजिक कार्यकर्ता आणि महाराष्ट्र भुषण म्हणून जगभरात ओळख पसरलेली आहे. मोठ्या संख्येने विदेशी पर्यटक अनेकदा आनंदवन आश्रमाला भेट देतात.
Shri keshariya mandir

श्री.केशरीया पार्श्वनाथ जैन मंदिर भद्रावती

हे प्राचीन मंदिर शहराच्या हृदयी वसलेले आहे. भक्तांची वर्षभर मंदिरात गर्दी असते