आमच्याबद्दल
सन 1960 पासून चंद्रपूर जिल्हा हा स्वतंत्र जिल्हा म्हणून गणला जाऊ लागला. सन 1874 पर्यंत जिल्ह्यात मुल, वरोरा व ब्रम्हपूरी या तीन तहसिल होते. त्यानंतर सन 1874 मध्ये मद्रास राज्यातील गोदावरी जिल्हा संपुष्टात येवून त्यातून चार तहसिल चंद्रपूर, जिल्ह्याला जोडण्यात आले. व तहसिलचे मुख्यालय सिरोंचा येथे ठेवण्यात आले. सन 1905 मध्ये गडचिरोली मुख्यालय असलेली नविन तहसिल निर्माण करण्यात आली. सन 1907 मध्ये नव्यानेच निर्माण झालेल्या दुर्ग जिल्ह्यात चंद्रपूर जिल्ह्यातील जमीनदारीचा काही भाग स्थानांतरीत करण्यात आला. याच वर्षी लोअर सिरोंचा तहसिलातील केरला, अवलक आणि पुगूर या तीन विभागांचा जवळजवळ 1560 चौ.कि.मी. हिस्सा संलग्न मद्रास राज्यात स्थानांतरीत करण्यात आला. सन 1956 मधील राज्य पुनर्रचनेचा परिणाम म्हणून पुर्वी मध्यप्रदेशात असलेला हा जिल्हा मुंबई राज्यात विलीन करण्यात आला.
अधिक वाचा …ताज्या घडामोडी
-
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा
योजनेचे नाव: प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण योजनेची थोडक्यात माहिती:- विभाग- ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार. सरकारचा निर्णय – १ एप्रिल २०१६ पासून इंदिरा आवास योजनेचे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमध्ये पुनर्रचना. उद्दिष्ट – २०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे वैशिष्ट्ये – ग्रामीण भागातील कच्च्या घरातील बेघर कुटुंबांना मूलभूत सुविधांसह झोपडीचा लाभ देणे. २६९ चौरस फूट कार्पेट क्षेत्रात स्वयंपाकघर […]
18-02-2025

हेल्पलाइन
-
आपत्कालीन एलपीजी गळतीच्या तक्रारी: 1096
-
वैद्यकीय राज्य नियंत्रण कक्ष: 104
-
रुग्णवाहिका: 108
-
गुन्हेगारी थांबवणारा: 1090
-
महिला हेल्पलाइन: 1091
-
बाल हेल्पलाइन: 1098
-
मतदार हेल्पलाइन: 1950
-
बचाव आणि आराम: 1077
-
कोरोना जिल्हा नियंत्रण कक्ष: 07172274161
-
कोरोना राज्य नियंत्रण कक्ष: 104