बंद

    ग्रामपंचायत विभाग

    ग्रामपंचायती स्वावलंबी होवून त्यांना स्वायत्त संस्थाप्रमाणे आपला कारभार करण्याचे सामर्थ्य प्राप्त व्हावे म्हणून केंद्गशासनाने 73 वी घटना दुरूस्ती केली . त्यामुळे ग्रामपंचयतींना घटनात्मक दर्जा प्राप्त झाला आहे .अशा त-हेने ग्रामपंचयतीची वाटचाल गावातील लोकांना सामाजिक न्याय मिळावा आणि त्यांचा आर्थिक विकास व्हावा या दिशेने सुरू झाली आहे. देशाचा सर्वागिंन विकास होण्यासाठी केंद्गशासनाकडून विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहेत. विकास योजनाचा लाभ अगदी तळागाळातील माणसाला मिळावा व त्यांची उन्नती / प्रगती व्हावी यासाठी सत्तेचे विकेंद्गीकरण करून जिल्हा परिषद समित्या व ग्रामपंचायती यांना अधिकार देण्यात आले. शासन विविध योजनाᅠराबवते या योजनांचा ख-या अर्थाने .लाभ होवून गरीब जनतेचे जीवन सुधारणे हा हेतू आहे. विविध शासकिय योजनांचा लाभ घेवून ग्रामीण लोकांचे राहणीमान उंचावणे ही शासनाची अपेक्षा आहे. अशा सर्व योजनांची माहिती जनतेपर्यत पोहचणे अत्यंत महत्वाचे आहे.

    चंद्रपूर जिल्हा हा 15 तालुक्यामध्ये विभागलेला असून एकूण 825 ग्रामपंचायती कार्यरत आहेत. ग्रामीण भागाच्या क्षेत्रफाळाचा विचार करायाचा झाल्यास 15642 चौ.कि.मी. ने व्यापलेला आहे. ग्रामीण भागातील तळागाळातील लोकांपर्यत प्रस्तुत केलेल्या विविध शासकिय (केंद्ग शासन,राज्य शासन ) योजना ग्रामपंचायत विभाग ,जिल्हा परिषदेमार्फत प्रभाविणे राबविल्या जात आहेत.सर्वसामान्य व्यक्तीबरोबरच , मागासवर्गीय व दारिद्ग रेषेखालील व्यक्ती दारिद्ग रेषेच्या वर आणुन त्याला आर्थिकदृष्टया स्वंयपुर्ण करणे हीच एकमेव ध्येयपूर्ती असून जिल्हामध्ये त्याची चांगल्या पध्दतीने अंमलबजावणी ग्रामपंचायत विभाग ,जिल्हा परिषद मार्फत करणेत येत आहे.

    पदनाम

    नाव मोबाईल क्र.

    इमेल

    उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) श्रीमती मीना साळुंखे

    9371670000, 9075058111

    dyceopzpchandrapur@gmail.com
    कनिष्ठ प्रशासन अधिकारी  श्री. गजेंद्र आ. पोटदुखे

    9423117439

    dyceopzpchandrapur@gmail.com

    योजनेचे नाव: फॉगींग मशीन करीता केमिकल्स पुरवठा करणे

    योजनेची संक्षिप्त माहिती:-

    • चंद्रपूर जिल्हयात मोठया प्रमाणात साथीचे आजाराची साथ सुरू असतात तसेच किटकजन्य आजाराचे आणि विशेषतः डेंग्युचे रूग्ण नियमित स्वरूपात आढळताना दिसुन येतात. जिल्हयातील उपरोक्त नैसर्गिक आपत्ती लक्षात घेता धूर फवारणीकरीता फॉगींग मशीनला लागणारे केमीकल्स पंचायत समिती मार्फत ग्रामपंचायतींना पुरवता येईल. सन 2010-11 मध्ये पंचायत विभागाकडून 277 फॉगींग मशीन खरेदी करून पंचायत समिती निहाय अनुक्रमे सर्वात जास्त लोक संख्या असलेल्या ग्रामपंचायतींना पंचायत समिती मार्फत पुरविण्यात आले. सदरचे 277 ग्रामपंचायती सदर योजने अंतर्गत तरतुद निधीच्या प्रमाणात खरेदी करण्यात येत असलेल्या केमिकल्स करीता लाभार्भी म्हणुन पात्र राहतील. 1) योजना कशा पध्दतीने राबविणार 2) सन 2014-15 या आर्थीक वर्षात फॉगींग मशीन करीता केमिकल्स पुरवठा करणेध तरतुद रू. 35.00 लक्ष या योजनेस शासन निर्णयानुसार प्रशासकिय मान्यता स्थायी समिती, जिल्हा परिषद, तथा तांत्रिक मंजुरी मा. मु.का.अ. महोदय यांचेकडून प्राप्त करणे. 3) जिल्हयात मर्यादीत ग्रामपंचायतीकडे फॉगींग मशीन असून सदर ग्रामपंचायतीकडून आवश्यकता असल्यास केमिकल्सची मागणी मागवावी लागेल. मागणीनुसार व आवश्यकतेनुसार केमिकल्सचा पुरवठा ग्रामपंचायतींना करता येईल. 4) 2% केमिकल्स खरेदी करतांना केमिकल्सचे दरकरार उपलब्ध नसल्यास ई-निविदा प्रक्रिया राबवून केमीकल्स खरेदी करण्यात येईल. केमिकल्स खरेदी करतांना पुरवठादाराकडून फक्त केमिकल्सचे दर मागवून व आवश्यकतेनुसार / मागणीनुसारच केमिकल्स खरेदीचा आदेश देण्यात येईल. जसजशी ग्रामपंचायतकडून मागणी येईल तसतशी केमिकल्सची खरेदी पुरवठादाराकडून करण्यात येईल. अशी अट घालून केमिकल्स खरेदी करण्यात येईल. 5) ई-निविदा द्वारे प्राप्त दर व त्याअनुषंगाने मा. मु.का.अ. महोदय यांचे आदेशानुसार मंजुर दरांच्या निविदा स्विकारण्याचा अधिकार उपरोक्त शासन निर्णयानुसार स्थायी समिती, जिल्हा परिषद यांना असल्याने सदरचे निविदा स्विकारण्यास्तव निविदा स्थायी समिती, जिल्हा परिषद समक्ष सादर करण्यात येईल. स्थायी समिती, जिल्हा परिषद, यांचेकडुन मंजुर निविदाच्या व तरतुद निधीच्या प्रमाणात आवश्यकतेनुसार / मागणीनुसार केमिकल्स खरेदीकरून पंचायत समिती निहाय (उद्दिष्ट) पुरवठा आदेश निर्गमित करण्यात येईल. गट विकास अधिकारी हे संबंधित ग्रामपंचायतींना केमिकल्स पुरवतील. लाभार्थ्यांची निवड :- फॉगींग मशीन असणारे ग्रामपंचायती मर्यादीत असल्याने 277 ग्रामपंचायती लाभार्थी म्हणुन पात्र राहतील. योजने वरील खर्च :- केमिकल्स खरेदी करणे अंदाजे रू. 35.00 लक्षाच्या मर्यादेत तसेच दरकरार उपलब्ध नसल्यास ई-निविदा प्रक्रिया राबविण्यास्तव वृत्तपत्रात जाहिरात प्रकाशित करणे या करीता वृत्तपत्राचे देयक अंदाजे रू. 10,000/- तरतुदी निधीच्या मर्यादीत

    योजनेचे नाव: पेसा 5% अबंध निधी

    योजनेची संक्षिप्त माहिती:-

    • सन २०१५-१६ या आर्थिक वर्षापासुन अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) ग्रामपंचायतींना शा. नि. दिनांक २१ एप्रिल, २०१५ व २१ ऑगष्ट २०१५ तसेच सुधारित शा.नि. दि. २० फेब्रुवारी २०१६ ग्रा. प. चे ग्रामसभा कोष समिती या बँक खात्यामध्ये थेट वर्ग करण्यात येतो.

    संदर्भ

    फाईल

    माझी वसुंधरा अभियान

    पाहा

    माझी वसुंधरा अभियान टूल किट

    पाहा

    लोक सेवा हक्क अधिनियम २०१५ राज पत्र

    पाहा

    लोक सेवा हक्क अधिनियम २०१५ अधिसूचित सेवांची यादी

    पाहा

    लोक सेवा हक्क अधिनियम २०१५

    पाहा

    क्रमांक.

    पदनाम नाव

    संपर्क तपशील

    1

    जन माहिती अधिकारी

    श्री. गजेंद्र पोटदुखे

    ( कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी)

    9423117439

    2

    प्रथम अपील अधिकारी

     श्रीमती मीना साळुंखे

     उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत)

    9371671111

    जिल्हा परिषद चंद्रपूर (ग्रामपंचायत विभाग)
    माहितीचा अधिकार कायदा २००५

    अनू. क्रं.

    विषय

    फाइल

    महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 राजपत्र

    पहा

    महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अध्यादेश

    पहा

    महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत अधिसूचित केलेल्या सेवांची माहिती

    पहा