खात्या विषयी
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, चंद्रपूर कार्यालयामार्फत विविध केंद्ग व राज्य पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी करणेत येते. सदरचे कार्यालय हे एक स्वायत्त संस्था असून संस्था नोंदणी अधिनियम १८६० नोंदणी क्रमांक एम.ए.एच.८१५/चंद्रपूर/८१, दिनांक १० सप्टेंबर १९८१ अन्वये हे कार्यालय मा.धर्मादाय आयुक्त यांचेकडे नोंदणीकृत आहे.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयामार्फत राबविणेत येणार्या योजनांमध्ये प्रामुख्याने स्वर्णजयंती ग्रामस्वरोजगार योजना, इंदिरा आवास योजना, पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम इत्यादी महत्वाकांक्षी योजनांचा समावेश होतो. जिल्हयामध्ये दारिद्गय रेषेखाली असणार्या कुटुंबांकरीता कल्याणकारी योजना राबविण्याचे कार्य या कार्यालयामार्फत करणेत येते. ग्रामीण भागातील दारिद्गय रेषेखाली असणार्या कटुंबांचे दारिद्गय निर्मुलन करुन त्यांचे जीवनमान उंचावण्याकरीता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालय कटिबद्ध आहे.