बंद

    पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग

    पाणी पुरवठा व स्वच्छता खात्या विषयी

    जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाची स्थापना सन 2012 मध्ये करण्यात आली. या कक्षा अंतर्गत निर्मल भारत अभियान पूर्वीचे व आताचे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक शौचालय सुविधा, सार्वजनिक शौचालय व सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन ईत्यादी योजना राबविल्या जातात. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकाम केल्या जातात. यापूर्वी लाभ न घेतलेले लाभार्थी, नवीन वाढीव कुटूंब इत्यादी लाभार्थी यांना लाभ दिल्या जाते. यामध्ये बीपीएल लाभार्थी व एपीएल मधील अल्प भूधारक, विधवा, अनु. जाती, अनु. जमाती, अपंग, इत्यादी लाभार्थ्यांना केंद्र (60 टक्के) व राज्य (4 टक्के) शासनाच्या निधीतून रु. 12000/- प्रोत्साहनअनुदान म्हणून दिले जाते. (संबंधित शासन आदेश)

    स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत 100% हागणदारीमुक्त झाली आहे अशा ग्रामपंचायतींना गावात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाची कामे करण्यासाठी गावाचे लोकसंख्येच्या आधारावर निधीची अनुज्ञेयता खालीलप्रमाणे आहेत :-

    अनू. क्रं. लोकसंख्या घनकचरा व्यवस्थापन सांडपाणी व्यवस्थापन
    5000 पर्यंत रु.60/- प्रति व्यक्ती रु.280/- प्रति व्यक्ती
    5000 पेक्षा जास्त रु.45/- प्रति व्यक्ती रु.660/- प्रति व्यक्ती

    स्वच्छ भारत अभियान (ग्रा) टप्पा-II नुसार अनुज्ञेयते मधून, उपांगासाठी लागणारी मजूरी, (स्वच्छ भारत अभियान (ग्रा) टप्पा-II संदभातील केंद्र शासन मार्गदर्शक सूचना मधील परिच्छेद 15.2.(II) (a) ) ( 15 वा वित्त अयोग/ मनरेगा / ग्राप स्वनिधी/इतर) वजावट करून निधी प्रत्यक्षात अनुज्ञेय असेल. अशा प्रकारे परिगणीत केलेल्या निधी पैकी ( जर गावा करीता एकंदर अनुज्ञेयता, रू. 0.50 लक्ष पेक्षा कमी असेल तर, किमान एकंदर अनुज्ञेयता रु. 0.50 लक्ष समजावी ) ७०% निधी स्वच्छ भारत अभियान (ग्रा) टप्पा-II (केंद्र 6०% व राज्य 4०% ) अंतर्गत व उर्वरीत 30% निधी 15 व्या वित्त आयोगातून अनुज्ञेय राहील. सदर निधी अनुज्ञेयता गावाच्या सन 2021 च्या लोकसंख्येसाठीच्या सार्वजनीक उपांगाकरीता अनुज्ञेय राहील. ( केंद्र शासनाचे पत्रक्र : S-11015/1/2020-SBM-DDWS, दिनांक 28/05/2020 अन्वये दिलेल्या निर्देशानुसार सन 2021 ची लोकसंख्या परीगणना करून घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाकरीता निधी अनुज्ञेयतेसाठी गृहीत धरावी. याकरीता“प्रपत्र-14”नुसार गणना करता येईल. )
    II) मैला गाळ व्यवस्थापन:- प्रती व्यक्ती रूपये 230/-या दराने III) प्लास्टिक कचरा व्यवस्थापन:- प्रत्येक तालुक्या मध्ये एका युनिट करीता रू. 16 लक्ष. IV) गोबरधन:- प्रत्येक जिल्ह्या करीता रू. 50 लक्ष.

     

     

    पदनाम

    नाव

    मोबाईल क्र.

    ईमेल

    उपमुका (पु.स्.) श्रीमती. नूतन सावंत ९७६६८८२९०७ nbazpchandrapur@gmail.com
    लेखाधिकारी (जिपास्वमि) श्री. दीपक जेउरकर ९४२३४१९१०० nbazpchandrapur@gmail.com
    कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्रीमती भारती करशैलम ७३९१८८९८९२ nbazpchandrapur@gmail.com

    जिल्हा परिषद चंद्रपूर (पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग)
    माहितीचा अधिकार कायदा २००५

     क्रमांक

    पदनाम

    नाव

    संपर्क तपशील

    जन माहिती अधिकारी

    श्रीमती भारती करसायल

    कनिष्ठ प्रशासन अधिकारी

    9518766415

    प्रथम अपिलीय अधिकारी

    श्रीमती नूतन सावंत

    उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी  पुरवठा व स्वच्छता)

    8888850383