लघू पाटबंधारे विभाग
लघूपाटबंधारे विभागाचा प्रमुख हा राज्य शासनाचा वर्ग 1 चा अधिकारी असतो. याचे पदनाम जिल्हा जलसंधारण अधिकारी असते,यासोबत एक वर्ग १ चे सहायक जिल्हा जलसंधारण अधिकारी म्हणून काम पाहतो. यासोबत एक वर्ग १ चे अधिकारी उपविभागीय जलसंधारण अधिकारीम्हणून काम पाहतो. सदर प्रकल्पांची सिचंन क्षमता वाढविने व जलसंधारण अंतर्गत विविध प्रकारचे सिंचन प्रकल्पांची निर्मीती करून सिंचनाची सोय उपलब्ध करून देणे व शेतक-यांना त्याचा लाभ देवून त्याचा आर्थीकस्तर उंचावने व त्यासोबतच जमीनीतील पाण्याची पातळी उंचावने व मत्स्यपालन व्यवसाय विकसीत करण्यासाठी या विभागातर्फे तलावांची निर्मीती करण्यात येते. तसेच या प्रकल्पांचा वन्यजिव संरक्षणात सिहांचा वाटा आहे. तसेच जिल्हयामध्ये सिचंनाची सोय उत्तम व्हावी म्हणून सिंचन विहीरीचे बांधकाम मोठयाप्रमात करण्यात येते. या सर्व बाबीमुळे या विभागाला जिल्हयात अनन्यसाधारण महत्व आहे.