बंद

    वित्त विभाग

    जिल्हा परिषदेचे सर्व आर्थिक व्यवहारा संदर्भात कार्यवाही वित्त विभागाकडून करण्यात येत असते. जिल्हा परिषदेतील वित्त विभागाचे प्रमुख हे मुख्य लेखा व वित्त अधिकारी असून ते महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेतील उपसंचालक दर्जाचे अधिकारी आहेत. लेखा आणि अर्थसंकल्पीय अंदाज या बाबी तसेच आर्थिक नियमांच्या अंमलबजावणी सबंधी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषदेचा वित्तीय सल्लागार व प्राथमिक लेखा परिक्षक म्हणून ते काम करतात. त्यांना सहाय्यक म्हणून उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी (वर्ग1) व दोन लेखा अधिकारी (वर्ग2) असतात.

    खात्या विषयी

    • आस्थापना शाखा आस्थापना शाखेमार्फत वित्त विभागातील राजपत्रीत अधिकारी व लेखा संवर्गातील कर्मचारी यांचे आस्थापना विषयक कामकाज केले जाते. लेखा संवर्गातील कर्मचार्यांचे आस्थापना व इतर कामकाज (उदा.नेमणूका, पदोन्नत्या, बदल्या, आगावू वेतनवाढी, जेष्ठता यादया, सेवानिवृत्ती, गोपनिय अभिलेख, 50/55 वर्षे पुनर्विलोकन केले जाते.इ.) लेखा संवर्गातील कर्मचायांचे सर्व परिक्षाविषयक कामकाज, सेवानिवृत्तीवेतन, भ.नि.नि., गट विमा, अधिकारी/कर्मचारी यांचे वैद्यकिय प्रतीपुर्ती प्रस्ताव तयार करून मान्यतेसाठी सादर करणे. अतिरिक्त पदभार प्रकरणे मंजूरी, मा.आयुक्त यांच्या निरीक्षण अहवालाचे तपासणी बाबतची कार्यवाही इ.बाबतचे कामकाज. रोख शाखा रोख शाखेत वेतन, बांधकाम/रस्ते व इतर देयके मंजुर झाल्यावर त्यांचे कामकाजाबाबतचे धनादेश तयार करून वितरीत केले जातात. कोषागारातून प्राप्त धनादेश व इतर जमांची नोंद रोखवहीमध्ये घेतली जाते. तसेच प्रत्येक दिवसांचे/मासिक जमा व खर्चाच्या नोदींचा बँकेशी ताळमेळ घेतला जातो.
    • भांडार शाखा महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती लेखा संहिता 1968 मधील नियम 202 प्रमाणे जिल्हा परिषदेचा मालसंग्रह जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या ठिकाणी ठेवता येईल. जिल्हा परिषदे कडील सर्व विभाग व पंचायत समिती यांना आवश्यक असणारे स्टेशनरी, फॉर्म व नोंदवहयांची खरेदी भांडार शाखे मार्फत करून वितरीत केली जाते.मध्यवर्ती लेखा परिक्षण शाखा मध्यवर्ती लेखा शाखेमध्ये जिल्हा परिषदेतील खाते प्रमुखांकडून प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांवर प्रशासकिय मान्यता/खर्चास मान्यतेबाबतचे अभिप्राय देण्यात येतात.तसेच प्राप्त होणाऱ्या सर्व प्रकारच्या देयकांची तपासणी करुन अदायगी बाबतचे शेरे नोंदविण्यात येऊन झालेल्या जमा व खर्चाच्या नोंदी करुन मुख्यालयाचा मासिक लेखा तयार केला जातो. तसेच केंद्र शासनाकडील 15 व्या वित्त आयोगाकडून प्राप्त निधीचे नियोजन करून त्याच्या वितरणाची संपुर्ण कार्यवाही या विभागाकडून केली जाते.
    • अंदाजपत्रक व ताळमेळ शाखा महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नियम 137 व 138 मधील तरतूदी नुसार जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या स्वनिधीचे मुळ अंदाजपत्रक, तसेच सुधारित अंदाजपत्रक तयार करण्यात येते. सदरच्या अंदाजपत्रकाची छाननी वित्त समितीमध्ये करण्यात येते. समितीने शिफारस केल्याप्रमाणे जिल्हा परिषदेच्या सर्व साधारण सभेकडे सदरचे अंदाजपत्रक मंजूरीसाठी सादर करण्यात येते. सर्वसाधारण सभेत मा.जिल्हा परिषद सदस्यांनी सुचविलेल्या दुरुस्त्या व सुचनांचा समावेश करुन सुधारित अंदाजपञक व मुळ अंदाजपञक मंजूर केले जाते. जिल्हा परिषदेचे अंदाजपञक मंजूरी नंतर संबधित विभागाकडे मंजुर निधीचे वितरण करण्यात येते.
    • संकलन शाखा जिल्हातील सर्व पंचायत समिती व मुख्यालयातील जमा व खर्चाचे लेखे एकञित करुन जिल्हा परिषदेचा मासिक लेखा तयार केला जातो. मासिक लेखे दरमहाच्या वित्त समितीच्या मंजूरी नंतर स्थायी समिती समोर अंतिम मान्यतेसाठी ठेवले जातात.सबंधीत विभागाकडून मासिक लेख्याशी ताळमेळ घेतला जातो. मासिक लेख्यांवरुन जिल्हा परिषदेचा वार्षीक लेखे तयार केला जातो. सदर वार्षिक लेख्याची छाननी वित्त समितीच्या सभेमध्ये केल्यानंतर सप्टेंबर पूर्वी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या मंजूरीसाठी सादर केले जातात.जिल्हा परिषद सभेच्या मंजूरी नंतर सदरचे लेखे 15 नोंव्हेबर पुर्वी शासन राजपत्रात प्रसिध्द केले जातात.
    • भविष्य निर्वाह निधी शाखा जिल्हा परिषदेकडील शिक्षकेत्तर वर्ग 3 व वर्ग 4 च्या सर्व कर्मचार्यांचे भविष्य निर्वाह निधीचे लेखे वित्त विभागामार्फत ठेवले जातात. सदर लेखे आदयावत ठेवण्यासाठी संगणकीकृत प्रणालीचा वापर केला जातो. भविष्य निर्वाह निधीचे परतावा/नापरतावा तसेच अंतिम अदाईचे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर कोषागारातून धनादेश प्राप्त करण्याची कार्यवाही त्वरीत केली जाते. तसेच जिल्हा परिषद सेवेत असताना मृत्यु झालेल्या कर्मचार्यांचे वारसास ठेवसंलग्न योजनेचा लाभ सत्वर अदा केला जातो. गटविमा रक्कमेचे प्रदान सबंधीत कर्मचार्यांना करण्यात येते.बाह्य लेखा परिक्षण शाखा महाराष्ट्र शासन ग्रामविकास व जलसंधारण विभाग मंत्रालय मुंबई यांचे कडील संदर्भ क्र. एपीटी/ 1092/सीआर/76613 दि.7/10/1997 नुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती मधील लेख्याच्या तपासणी साठी जिल्हा स्तरावर अंतर्गत लेखा परिक्षण पथके निर्माण करणेत आली आहेत. सदर पथकामार्फत पुर्ण झालेल्या आर्थिक वर्षाचे खाते प्रमुख व पंचायत समितीचे अंतर्गत लेखा परिक्षण करण्यात येते. स्थानिक निधी लेखा, पंचायत राज समिती व महालेखापाल कार्यालयाकडील लेखा आक्षेपांची पुर्तता करणसाठी समन्वय व मार्गदर्शन केले जाते. जिल्हा परिषद कर्मचार्यांचे वेतन आयोगानुसार होणार्या सुधारित वेतन निश्चिती पडताळणी या शाखेमार्फत केली जाते.
    • निवृत्त वेतन शाखा महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) 1982 च्या नियमाचे अधिन राहून जिल्हा परिषद कर्मचार्यांचे वर्ग 3 च्या बाबतीत वयास 58 वर्ष व वर्ग 4 च्या बाबतीत 60 वर्ष पुर्ण झाल्यानंतर सेवानिवृत्त होणाऱ्या तसेच इतर प्रकारे सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचार्यांच्या प्रकरणांची छाननी करुन सेवानिवृत्ती वेतन मंजूर केले जाते. सदर निवृत्तीवेतनधारकांना विहीत मुदतीत दरमहा निवृत्तीवेतन अदा करण्याची दक्षता वित्त विभागाकडून घेतली जाते.
    • भविष्य निर्वाह निधी शाखा जिल्हा परिषदेकडील शिक्षकेत्तर वर्ग 3 व वर्ग 4 च्या सर्व कर्मचार्यांचे भविष्य निर्वाह निधीचे लेखे वित्त विभागामार्फत ठेवले जातात. सदर लेखे आदयावत ठेवण्यासाठी संगणकीकृत प्रणालीचा वापर केला जातो. भविष्य निर्वाह निधीचे परतावा / नापरतावा तसेच अंतिम अदायगांचे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर कोषागारातून धनादेश प्राप्त करण्याची कार्यवाही त्वरीत केली जाते. तसेच जिल्हा परिषद सेवेत असताना मृत्यु झालेल्या कर्मचाऱ्यांचे वारसास ठेवसंलग्न योजनेचा लाभ सत्वर अदा केला जातो.

    वित्त विभागामध्ये खालील निधी निहाय लेखे ठेवले जातात.
    1. जिल्हा परिषद योजना (जिल्हा निधी)
    2. अभिकरण योजना (अभिकरण निधी)
    3. हस्तांतरीत योजना (शासकीय निधी)
    4. दुरूस्ती देखभाल निधी
    5. घसारा निधी

    अ.क्र.

    अधिनस्त अधिकारी व कर्मचा-यांचा हुद्या

    त्यांचे कर्तव्य (शासनाने / अधिका-यांने ठरवुन दिलेले)

    1

    मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर

    1. महा.जि.प.व पंचायत समित्या अधिनियम 1961 व महा.जिल्हा परिषदा व पंचायत समित्या लेखा संहिता, 1968 मध्ये विहीत केल्याप्रमाणे तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशानूसार अधिकार व कर्तव्य.

    2. वित्त विभाग, जिल्हा परिषदेचे सर्व विभाग आणि पंचायत समित्याच्या लेख्यांवर नियंत्रण ठेवणे.
    3. वित्तीय सल्लागार व प्राथमिक लेखा परीक्षक म्हणून कामे.
    4. वित्तीय व्यवस्थापन व गुंतवणूका यावर नियंत्रण ठेवणे.
    5. अर्थसंकल्प : जिल्हा परिषदेचे स्वत:चे उत्पन्न व शासकिय विविध योजनांचे अर्थसंकल्पीय अंदाज तयार करणे.
    6.   1) लेखा संवर्गाची जिल्हा आस्थापना(बदली,पदोन्नती,ज्येष्ठता यादी ही जबाबदारी राहील)
    2) वित्त विभागाची कार्यालयीन आस्थापना (वर्ग 1 ते वर्ग 4)
    3) महा.वित्त व लेखा सेवा संवर्गाच्या अधिकाऱ्यांवर / कर्मचाऱ्यांवर पर्यवेक्षण व नियंत्रण ठेवणे.
    4) जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील व पंचायत समितीमधील लेखा संवर्गावर पर्यवेक्षण व नियंञण ठेवणे.
    5) जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील व पंचायत समितीमधील लेखा संवर्गावर पर्यवेक्षण व नियंञण ठेवणे.
    7. पंचायती राज संस्थाच्या लेख्यांवरील लेखापरिक्षण पुर्नविलोकन अहवालात समाविष्ट लेखा आक्षेप व महत्वाचे लेखा आक्षेप तसेच भारताचे नियंत्रक व महालेखा परिक्षक यांच्या अहवालात समाविष्ट लेखा आक्षेप व महत्वाचे लेखा आक्षेप याबाबत समन्वय ठेवणे.
    8. रु.2,00,000/- वरील देयके पारीत करणे व त्याचे धनादेश अदा करणे.
    9. वित्त विभागास प्राप्त होणाऱ्या सर्व नस्त्यांचे (रु.2,00,000/- च्या आतीलही ) पुर्व लेखा परिक्षण करणे व अभिप्राय देणे.
    10.अनुदान निर्धारण, जिल्हा परिषदेस शासनाकडून येणे व शासनास देणे स्थिती यावर नियंत्रण.
    11.मध्यवर्ती भांडार / पुर्ण नियंञण.
    12. जि.प.चे खरेदी व्यवहार विहित पध्दतीने करणे.
    13. आर्थिक शिस्तीचे पालन करण्यासाठी योग्य व आवश्यक नियोजन, उपाययोजना व अंमलबजावणी करणे.
    14. महा.जि.प.व पंचायत समित्या अधिनियम 1961 व महा.जिल्हा परिषदा व पंचायत समित्या लेखा संहिता, 1968 व शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे जबाबदाऱ्या स्वत: किंवा इतर अधिकाऱ्यांकडून पुर्ण करुन घेणे.
    15.महालेखापाल ,कोषागार यांच्या कार्यालयातील लेख्यांशी (जमा व खर्च ) ताळमेळ घालावयाच्या कामावर नियंञण ठेवणे.
    16.अखर्चित रक्कमांचा आढावा घेणे व शासनास वेळेत भरणा करणे.
    17. वार्षिक लेखे अंतीमीकरण करुन आर्थिक शिस्तीच्या अहवालासह जिल्हा परिषद सभेस सादर करणे व त्या मान्यतेनंतर शासनास सादर करणे.
    18.अंतर्गत लेखा परिक्षण भांडार पडताळणी व वेतननिश्चिती कामे प्रभावी होईल या दृष्टीने संबंधित सहकारी अधिकारी / कर्मचारी यांचेकडून काम करुन घेणे व नियंञण ठेवणे.
    19.वर्ग 3,वर्ग 4 कर्मचा-यांची भ.नि.निधीचे काम ताळमेळ सह अद्यावत राहील यावर नियंञण ठेवणे.
    20.वर्ग 3,वर्ग 4 कर्मचारी व अंशदान निवृत्ती वेतन योजनेंतर्गत लेख्याचे काम ताळमेळसह अद्यावत राहील यावर नियंञण ठेवणे.
    21. जि.प. व स्थायी समिती यांच्या सभांना उपस्थित राहून माहिती पुरविणे,सभेच्या अध्यक्षांनी विचारणा केल्यास योग्य तो वित्तीय सल्ला देणे आणि अर्थ समितीचे सचिव म्हणून काम पहाणे.
    22. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेशाने दिलेली कामे पार पाडणे.

    2

    उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर

    1.आस्थापना
    1.1) वित्त विभागाचे आहरण व संवितरण अधिकारी म्हणून काम करणे. (वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते, प्रवासभत्ते व इतर वैयक्तिक प्रदाने इत्यादी)
    1.2) जि.प.चे वित्त विभागाचे आस्थापना विषयक प्रकरणे नस्त्या/प्रकरणे तपासुन (सर्व) अभिप्राय देणे व मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना सादर करणे. (सर्व प्रकारच्या रजा /वेतनवाढ, सेवापुस्तक)
    1.3) आवक-जावक शाखा – विभागात येणारी टपाल सहा.लेखा अधिकारी हे लेखा अधिकारी यांना सादर करतील व लेखाअधिकारी हे उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचेमार्फत मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना सादर करतील.
    1.4) रोख शाखा – रुपये 2,00,000/- च्या आतील देयके पारीत करणे व त्यांचे धनादेश अदा करणे.(कामाच्या व खरेदीच्या संदर्भातील रु.2,00,000/- च्या आतील अंतिम देयक तपासुन मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना सादर करणे)
    2. निवृत्तीवेतन, भविष्य निर्वाह निधी व गट विमा योजना या संबंधीत प्रकरणांना मंजूरी देणे.(पुर्ण अधिकार वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचाऱ्यांच्या प्रकरणाबाबत व परिभाषित अंशदार निवृत्ती वेतन (DCPS)(NPS) योजनांची लेखे तयार करणे व प्रकरणे तपासून मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना सादर करणे.
    3.संकलन – जि.प. लेखा विषयक सर्व जबाबदारी वार्षिक लेखे वेळेत होतील यावर नियंञण.
    4.अर्थसंकल्प – जि.प. स्वत:चे उत्पन्न व शासनाच्या विविध योजना अर्थसंकल्प तयार करणेसाठी मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना सहाय्य करणे.
    5. देयक व नस्त्या – पुर्व लेखा परिक्षण – सामान्य प्रशासन विभाग ,ग्रामपंचायत, पशुसंवर्धन, वित्त,बांधकाम विभाग या विभागाच्या संबंधित नस्त्यांचे पुर्व लेखा परिक्षण करणे व अभिप्राय देवून मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना सादर करणे तसेच संबंधित विभागाच्या रु.2,00,000/- पर्यंतची धावती पुस्तके पुर्व लेखा परिक्षण करुन पारीत करणे व धनादेश अदा करणे. (कोणत्याही कामाचे व खरेदीचे अंतिम देयक / प्रकरणे रु. 2,00,000/- आतील असतिल तरी ते देयक / प्रकरणासंदर्भात पुर्ण लेखा परिक्षण करुन मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना सादर करणे) रु.2,00,000/- वरील देयके /प्रकरणे पुर्वलेखा परिक्षण करुन मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना सादर करणे.
    6. मध्यवर्ती भांडार
    6.1 सर्व प्रकरणे तपासून मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना सादर करणे.
    6.2 विभाग व कार्यालयाकडून येणे रक्कमांच्या वसुलीवर नियंञण ठेवणे.
    6.3 वित्त विभाग व भांडार शाखेचे लेखे ठेवणे.
    7. अंतर्गत लेखा परिक्षण
    7.1 सर्व जिल्हा परिषदेच्या विभागांचे व पंचायत समितीचे अंतर्गत लेखा परिक्षण व भांडार पडताळणीचे पथकावर नियंञण व नियोजन बध्द कार्यक्रम तयार करुन मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्या मान्यतेने काम करणे.(शासन परिपञक क्रमांक-2015/प्र.क्र.42/वित्त-6 दि. 05 डिसेंबर, 2015 मधील सुचनानुसार)
    7.2 स्थानिक निधी लेखा ,महालेखापाल व आयुक्त या सर्वांचे लेखा आक्षेपाबाबत व लेखा परिक्षणाबाबत समन्वय म्हणून काम करणे.
    7.3 अंतर्गत लेखा परिक्षण पथकास उपलब्ध करुन दिलेल्या वाहनाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्या सल्ल्याने संनियंञण करणे.
    8. सभा व बैठका उपस्थिती.
    8.1 अर्थ संमितीच्या सर्व बैठकांना उपस्थित राहणे.
    8.2 जि.प. च्या सभेला मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्यासोबत उपस्थित राहणे.
    9. मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचे रजा कालावधीत व पद रिक्त असतांना मुख्य लेखा व वित्त अधिकारी काम पहाणे.
    10. मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी सोपविलेली कामे व दिलेल्या आदेशाचे पालन करणे.

    3

    लेखा अधिकारी – 1

    1.अर्थसंकल्प :
    1.1) जिल्हा परिषदेचे स्व: उत्पन्न व शासनाच्या विविध योजनांचा अर्थसंकल्प तयार करुन वरिष्ठांना सादर करणे. 1.2) पं.स.च्या अर्थसंकल्पाबाबत तपासणी व पं.स.च्या उपकर अर्थसंकल्पाचे संकलन करणे व एकञित अर्थसंकल्प तयार करुन सादर करणे.
    1.3) कार्यक्रम अंदाजपञक (सर्व कामे)
    1.4) रोख अनुदान व सहाय्यक अनुदान यांची देयके तयार करुन सादर करणे.
    1.5) अर्थसंकल्पीय मंजुर तरतुदीचे पं.स.ना वाटप प्रस्तावित करणे.
    1.6) केंद्रीय व वित्त आयोग व महा. राज्य वित्त आयोग यांचेशी संबंधित माहिती संकलित करुन सादर करणे.
    1.7) अर्थ संकल्पाशी संबंधित व उपरोक्त विषयाबाबत सर्व नोंदवहया अद्यावत ठेवणे, नियतकालीक अहवाल सादर करणे व सर्व प्रकारचा पञव्यवहार करणे.
    1.8) आहरण केलेल्या रक्कमांचा महालेखापाल कार्यालयांच्या लेख्याशी ताळमेळ घालणे व ताळमेळाचा अहवाल सादर करणे.
    2. संकलन :
    2.1) सर्व विभागाच्या लेखा शिर्षाचे जमा व खर्चाचे लेखे ठेवणे.
    2.2) पं.स.चे लेखे स्विकारणे,तपासणी व संकलन करणे.
    2.3) मासिक खर्चाचे विवरण तयार करुन विहीत दिनांकास सादर करणे.
    2.4) वार्षिक लेखे तयार करणे व सादर करणे.
    2.5) अर्थसंकल्पीय तरतूदीपेक्षा कमी अथवा अधिक झालेल्या खर्चाचे विवरण तयार करुन सक्षम प्राधिका-यास सादर करणे.
    2.6) अनुदान निर्धारण – मंजुर आर्थिक तरतूद खर्च प्रमाणित करुन देणे.
    2.7) उपयोगीता प्रमाणपञ – मंजुर आर्थिक तरतूद व खर्च प्रमाणित करुन देणे.
    2.8) जि.प.स शासनाकडून येणे व शासनास देणे असलेल्या रक्कमांची माहिती काढून सादर करणे.
    2.9) खातेप्रमुखाकडील नोंदवह्यांची पं.स.च्या खर्चासह लेखाशिर्षनिहाय खर्चाचा दरमहा ताळमेळ घालणे
    . 2.10) खर्चाचे मासीक /ञेमासिक व वार्षिक विवरणपञे शासनाच्या संबंधित नियंञण अधिका-यांना वेळेवर सादर करणेसाठी आवश्यक ती कार्यवाही करणे. 3. सर्व साधारण भविष्य निर्वाह निधी :
    जि.प.च्या वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचाऱ्यांचे भ.नि.निधीचे काम पहाणे,लेखे ठेवणे,मंजुरी व अदायीचे प्रकरणे उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना सादर करणे,ठेव संलग्न विमा योजनेचे देयके तपासणे व मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना सादर करणे.
    4.परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना –
    परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेचे लेखे ठेवणे अहारण व वितरण केलेल्या रक्कमांचा ताळमेळ घेणे,कर्मचाऱ्यांना त्यांच्या लेख्यांचे विवरणपञ देणे.
    5.देयक व नस्ती – पुर्व लेखा परिक्षण – कृषि विभाग,समाजकल्याण (अपंग कल्याण सह) ,महिला व बालकल्याण विभाग (एकात्मिक बाल विकासासह) व लघु पाटबंधारे विभाग या विभागाच्या संबंधित नस्त्यांचे पुर्व लेखापरिक्षण करणे व अभिप्राय देवून मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी यांना सादर करणे संबंधित विभागाच्या देयकांची तपासणी करणे व रु.2,00,000/- पर्यंतची देयके /प्रकरणे उप मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी यांना सादर करणे व रु.,20,0000/- वरील देयके /प्रकरणे मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी यांना सादर करणे.
    6.कर्ज :
    व्याजी, बिनव्याजी कर्ज मंजुरीसाठी प्रकरणे सादर करणे,लेखे ठेवणे,व्याजाची गणना करणे व वसुली व नियंञण ठेवणे.
    7.अग्रीमे :
    मुख्यालयातील कर्मचाऱ्यांना व विभागांना दिलेल्या सर्व प्रकरच्या अग्रीमाच्या वसुलीवर नियंञण ठेवणे व विभागाच्या नोंदवह्यांशी ताळमेळ घेणे.
    8.ठेवी :
    जिल्हा निधीत जमा होणाऱ्या सर्व विभागाच्या ठेवेचा हिशोब ठेवणे , ठेव परतावा ठेवी व्यपगत करणे,महसुल खाती जमा रक्कमांचा परतावा,अग्रीम व त्यांचे विवरण उपमुख्य लेखा तथा वित्त अधिकारी यांना सादर करणे.
    9. वित्त विभागाची रोख शाखा – वित्त विभागात ठेवण्यांत येणाऱ्या सामान्य किर्दी
    9.1) हस्तांतरीत योजना
    9.2) अभिकरण योजना
    9.3) जिल्हा परिषदेचे स्वत:चे उत्पन्न
    9.4) ग्रामीण पुरवठा देखभाल व दुरुस्ती निधी
    9.5) घसारा निधी
    9.6) अल्पबचत प्रोत्साहनपर अनुदान
    9.7) आश्वासित रोजगार योजना इ. रोख पुस्तके अद्यावत ठेवणे,जमा व खर्च बाजुच्या नोंदी तपासून आवश्यक त्या नोंदी साक्षांकीत करणे,बँक ताळमेळ करणे,किर्दी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करणे,ताळमेळात तफावत आढळल्यास शोधून दूर करणे.
    10. लेखा आक्षेपाचे निराकरण – अर्थ विभागाचे अहवाल,महालेखापालाचे निरिक्षण अहवाल आणि आयुक्त यांचे तपासणी अहवाल यातील लेखा आक्षेपाचे संबंधित शाखेकडून अनुपालन तयार करुन घेणे.
    11. सोपविण्यांत आलेल्या विभागाच्या योजना, अर्थसंकल्प व अडचणी इ.बाबत समन्वयक म्हणून काम करणे व याबाबतची माहिती उप मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी व मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी अधिकारी यांना देणे.
    12. मुख्य लेखा व वित्त अधिकारी व उप मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी यांनी सोपविलेली इतर कामे व आदेशाचे पालन करणे.
    13.सभा व बैठका उपस्थिती –
    13.1) अर्थसमितीच्या सर्व बैठकांना उपस्थित राहणे
    13.2) अनु.क्र. 05 मध्ये सोपविण्यांत आलेल्या विभागाच्या विषय समितीच्या सभेचा वृत्तांत मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी यांना देणे.

    4

    लेखा अधिकारी – 2

    1. सेवानिवृत्ती वेतन विषयक कामे –

    1.(1) मंजुरीच्या अदयीची प्रकरणे उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना सादर करणे.
    1.(2) निवृत्ती वेतन विषयक नोंदवह्या अद्यावत ठेवणे.
    1.(3)निवृत्ती वेतन लेखा परिक्षा नोंदवही अद्यावत ठेवणे (सा.प्र. व शिक्षण अशा दोन भागात)

    2. वेतननिश्चिती पडताळणी – वेतननिश्चिती पडताळणी पथकाचे नियंञण व या संदर्भातील सर्व कामे.

    3.दक्षता पथक (Vigilance) – सदर पथकाचे नियंञक म्हणून काम करणे,पंचायत समित्यांची तपासणी व भांडार पडताळणी अंतर्गत लेखा परिक्षण मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी आदेशीत केल्याप्रमाणे विशेष निवड केलेल्या विभाग/पं.स.चे अंतर्गत लेखा परिक्षण तथा भांडार पडताळणी करणे.
    4. कर्मचारी गट विमा योजना – राज्य शासकीय कर्मचारी व जि.प. कर्मचारी/अधिकारी यांची गट विमा योजना विषयक काम पहाणे व लेखे ठेवणे,मंजुरी व अदाईचे प्रकरणे उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना सादर करणे.
    5.देयक व नस्ती – पुर्व लेखा परिक्षण – आरोग्य विभाग,शिक्षण व निरंतर शिक्षण विभाग (शालेय पोषण आहारासह) ,पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग या विभागाच्या संबधित नस्त्यांचे पुर्व लेखा लेखा परिक्षा करणे व अभिप्राय देवून मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना सादर करणे,संबंधित विभागांच्या देयकांची तपासणी करणे व रु.2,00,000/- पर्यंतची देयके /प्रकरणे उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना सादर करणे व रु.2,00,000/- वरील देयके मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना सादर करणे.
    6.आवक – जावक शाखा –
    6.(1) दैनंदिन टपाल
    6.(2) पोस्टल नोंदवह्या व हिशोब
    6.(3) इतर नोंदवह्या बाबत नियंञण ठेवणे
    7. भांडार – अर्थ विभागाचे अंतर्गत भांडाराबाबत कार्यवाही करणे.
    7.(1)सर्व प्रकरणे तपासुन सादर करणे.
    7.(2) नोंदवह्या अद्यावत ठेवणे
    7.(3)नियतकालीक पडताळणी करुन घेणे.
    7.(4) अंतर्गत भांडाराच्या सर्व व्यवहारावर नियंञण ठेवणे
    8. लेखा परिक्षण –
    8.(1) पंचायती राज संस्थांच्या लेख्यावरील लेखा परिक्षण पुर्नविलोकन अहवाल, स्थानिक निधी लेखा विभागाचे लेखा परिक्षण अहवालातील लेखा आक्षेपाबाबत पाठपुरावा व मदत करुन अहवाल तयार करुन मुद्दे वगळून घेणे.
    8.(2) लेखा परिक्षणात /तपासणी आढळून आलेल्या उणीवा व अनयिमिततेबाबत उपाययोजना सूचविणे.
    8.(3) लेखा परिक्षणाबाबत नियतकालीक अहवाल पाठविणे व संपुर्ण पञव्यवहार.
    9. सर्व विभागप्रमुखांच्या नोंदवह्या तपासून अर्थ समितीस सादर करणे.
    10. सोपविण्यांत आलेल्या विभागाच्या योजना,अर्थ संकल्प व अडचणी याबाबत समन्वयक म्हणून काम करणे व याबाबतची माहिती वेळोवेळी उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी व मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना सादर करणे संबंधित विषय समितीच्या सभेचा वृत्तांत अवगत करणे. अर्थ विभागाच्या नोंदवह्या तपासणी करुन अर्थ समितीस सादर करणे.
    11. मुख्य लेखा व वित्त अधिकारी व उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी सोपविलेली इतर कामे व आदेशाचे पालन करणे.
    12.सभा व बैठका उपस्थिती –
    12. (1) अर्थ समितीच्या सर्व बैठकांना उपस्थित राहणे.
    12. (2) अनुक्रमांक 05 मध्ये सोपविण्यांत आलेल्या विभागाच्या विषय समितीच्या सभेस व त्या विभागाच्या खरेदी समितीस उपस्थित राहून लेखा व वित्त विषयक सल्ला देणे व वृत्तांत मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना देणे.

    5

    सहाय्यक लेखा अधिकारी

    1. आस्थापना पर्यवेक्षक,वार्षिक लेखा योजना पर्यवेक्षक, अंतर्गत लेखा परिक्षण पर्यवेक्षक, भविष्य निर्वाह निधी पर्यवेक्षक, जिल्हा परिषद अंतर्गत विभागाचे पर्यवेक्षक व मुख्य लेखा व वित्त अधिकारी तसेच उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी सोपविलेली कामे व आदेशाचे पालन करणे.

    6

    कनिष्ठ लेखा अधिकारी

    1. अंदाजपत्रक शाखा
    2. भविष्य निर्वाह निधी शाखा
    3. वार्षिक लेखा शाखा
    4. अंतर्गत लेखा परिक्षण शाखा
    5. अंकेक्षक बांधकाम
    6. अंकेक्षक ग्रामीण पाणी पुरवठा
    7. अंकेक्षक सिंचाई

    7

    वरिष्ठ सहाय्यक (लेखा)

    1. लेखापरिक्षणाची कामे
    2. लेखा परिक्षण / पंचायत राज समिती अनुपालन अहवाल तपासणी करणे.
    3. जि.प.प्रिंटींग प्रेस विभागाची कामे.
    4. अंकेक्षक शिक्षण, बालकल्याण, अंकेक्षक आरोग्य विभाग व गट विमा योजना, अंकेक्षक कृषि व पशु, अंकेक्षक ठेवी अग्रीम, अंकेक्षक ग्रा.पा.पु. व लेखा संवर्गीय कर्मचाऱ्यांची कार्यालयीन आस्थापना व जिल्हा आस्थापना, अंकेक्षक समाज कल्याण, नविन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना, अंकेक्षक सा.प्र.वि., पंचायत व वित्त, वार्षिक लेखा विषयक कामे, भविष्य निर्वाह निधी शाखेतील , शासकिय / खासदार निधीतील धनादेश लिपीकाची कामे.

    8

    कनिष्ठ सहाय्यक (लेखा)

    1. आवक – जावक विभागाची कामे करणे.
    2. नविन परिभाषित योजनेची पोष्टींगची कामे.
    3. जिल्हा निधी / अभिकरण निधी / देखभाल दुरुस्ती निधी अंतर्गत धनादेश लिपीकाची कामे.
    4. नियमित निवृत्ती वेतन प्रकरणे / सुधारित निवृत्ती वेतन प्रकरणे / वेतन पडताळणी तसेच अभिलेख कक्षाची कामे.
    5. भ.नि.नि. पोष्टींगची कामे

    9

    परिचर वर्ग – 4

    कार्यालयीन स्वच्छता ठेवणे. अधिकारी व कर्मचारी यांना सहकार्य करणे. व सांगीतलेली कामे करणे.

    पदनाम

    नाव

    मोबाईल क्र.

    इमेल

    मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री अतुलकुमार रा. गायकवाड 9422296948 cafozpchandrapur@gmail.com
    उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री धर्मराव म. पेंदाम 9881522921 cafozpchandrapur@gmail.com

    माहिती अधिकारी यांचे नांव, पदनाम व इतर माहिती (वित्त विभाग, जि..चंद्रपूर)

    सहाय्यक जन माहिती अधिकारी

    जन माहिती अधिकारी

    प्रथम अपिलीय अधिकारी

    श्री सुशिल नगरकर

    कनिष्ठ सहा. (लेखा)

    वित्त विभाग,जि.प. चंद्रपूर

    दुरध्वनी क्रमांक    07172-250273

    श्री धर्मराव म.पेंदाम

    उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी

    वित्त विभाग,जि.प. चंद्रपूर

    दुरध्वनी क्रमांक   07172-250273

    श्री अतुलकुमार रा. गायकवाड

    मुख्य लेखा व  वित्त अधिकारी वित्त विभाग,जि.प. चंद्रपूर

    दुरध्वनी क्रमांक 07172-250273

    .क्र.

    सुचना पत्रकानुसार दिलेले विषय नियम क्रमांक व वर्ष

    अभिप्राय(असल्यास)

    1

    महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961

     

     

     

     

    प्रस्तुत नियम अधिनियमातील तरतुदी व संबंधातील प्रचलित शासन निर्णय नुसार कार्यवाही करण्यांत येते.

    2

    महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम 1981

    3

    महाराष्ट्र नागरी सेवा(सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम 1981

    4

    महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम 1981

    5

    महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतन) नियम 1982

    6

    महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1964/1969

    7

    महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम 1964/1969

    8

    महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी/स्वयेत्तर सेवा आणि निलंबन बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे इ.) नियम 1981

    9

    महाराष्ट्र जिल्हा परिषदा (सेवा प्रवेश) नियम 1967

    10

    महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम 1966

    11

    महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (अंदाजपत्रक) नियम 1966

    12

    जिल्हा परिषद ( आकस्मिक खर्च ) नियम 1966

    13

    मुंबई ग्राम पंचायत, अधिनियम नियम 1958

    14

    महाराष्ट्र जिल्हा परिषदा (कामकाज चालविणे) 1964

    15

    शासनाकडुन वेळोवेळी प्राप्त होणारे आदेश/परिपत्रके.  

    16

    महा.जि.प. व पं.स. लेखा संहिता नियम 1968  

    प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीकोन व नितीनिर्धारण संबधाने सर्वसामान्याशी संपर्क करण्याकरिता करण्यात आलेली व्यवस्था :-

    .क्र.

    विवरण

    कार्यवाहीसाठी व्यवस्था

    1 प्रशासकीय कामकाजाचा दृष्टीकोन व निती निर्धारण संबंधाने सर्वसामान्याचे परामर्श  करिता करण्यात आलेली व्यवस्था

    1)  मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जि.प. चंद्रपूर  यांना प्रशासकीय कामाकरिता भेटण्याची वेळ रोज कार्यालयीन वेळेत सायंकाळी-4.00 ते 5.00 पर्यंत

    2) या विभागाकडे कोणत्याही वैयक्तिक व कोणत्याची लाभाच्या योजना राबविल्या जात नाही. परंतु विभागाकडून राबविल्या जाणाऱ्या योजनांचे लेखांकन व वित्तीय नियमानूसार बरोबर आहे  किंवा नाही याची खात्री करुन त्यानंतर संबंधिताना देयकाचे भुगतान केले जाते.