खात्या विषयी
पशुसंवर्धन विभागाचा प्रमख हा राज्य शासनाचा वर्ग 1 दर्जा असलेला अधिकारी असतो.यास जिल्हा पशुसंर्धन अधिकारी असे पदनाम आहे.या विभागामार्फत पशुंपालन तसेच दुध उत्पादन वाढविण्यासाठी अनेक राज्य व केंद्र शासना योजना प्रभाविपणे राबविल्या जातात.जिल्हयात पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी 1 – 27 व श्रेणी 2 – 37 असे एकुण 64 दवाखाने कार्यरत आहेत. यामध्ये एक डॉक्टरची नेमणूक राज्य शासनामार्फत केलेली असते या पशुधन विकास अधिकारी असे पदनाम दिलेले आहे. तसेच पंचायत समिती स्तरावरील कार्यालयात प्रमुख म्हणून पशुधन विकास अधिकार (विस्तार) कार्यरत असतो.
वैरण विकास कार्यक्रम :-
उददेश :- पशुपालकाकडील 70 % खर्च जनावरांच्या खादय व चाऱ्यावर होत असतो व उत्तम शास्त्रोक्त पोषण हीच पशुपालकाची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे खर्चावर मर्यादा आणण्याकरीता उच्च्ा प्रतीच्या वैरणीचे उत्पादन घेणे हा सर्वोत्तम उपाय आहे.
चाऱ्याचे प्रकार:-
- एकदल वर्गीय वैरण यामध्ये ज्चारी , मका, मल्टीकट बाजरा इ. वैरण पिके यामधून जनावरांना मोठया प्रमाणात कार्बोदके व फायबर उपलब होते ज्यामुळे दुध उत्पादन व दुधातील फॅट यामध्ये वाढ होते.
- व्दिदल वर्गीय वैरण :- यामध्ये बर्सीम, चवळी, लुसर्न इत्यादी वैरण पिकांचा समावेश होतो. या चाऱ्यामधून जनावरांना उच्च प्रतीची प्रथिने उपलब्ध होवून दुधातील एस.एन.एफ. चे प्रमाणात वाढ होते.
- बहुवार्षिक गवत :- यामध्ये हायब्रिड नेपिअर ( सुपर नेपिअर इ. व न्युट्रीफिड इ.वैरण पिके आहेत. या चारा पिकांचे प्रति एकरी वैरण उत्पादन विक्रमी असते तसेच यातुन जनावरांना वर्षभर हिरवा चारा उपलब्ध होतो.
- जिल्हा वार्षिक योजना-सर्वसाधारण :- अंतर्गत जनावरांना चांगल्या प्रतिचे हिरवे वैरण उपलब्धतेसाठी खरीप व रब्बी हंगामांत एम.पी.चारी, मका, मालदांडी , बरसीम बियाणे किंवा हायब्रीड नेपिअर , न्युट्रीफीड किंवा ठोंबे पुरवठा जि.वा.यो.सर्वसाधारण योजनेमधून उपलब्ध तरतुदीच्या अधिन राहुन 100 टक्के अनुदानावर वाटप करण्यांत येते. या योजनेचा लाभ सर्व जाती / जमातीच्या लाभार्थींना घेता येईल.
- विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प :-
- कडबा कुटटी यंत्र : चारा पिके फुलोऱ्यावर आल्यानंतर त्यामध्ये सर्व आवश्यक पोषण तत्वे साठविले जातात. त्यामुळे असे मोठे गवत कडबाकुटटी यंत्राने बारीक करुन खाऊ ु घातल्याने वैरणीचा पुर्ण वापर होवून वाया जाण्याचे प्रमाण कमी होते. विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पाअंतर्गत या यंत्राच्या खरेदीवर 50 % किंवा अधिकतम रु.8000/- चे शासकिय अनुदान दिले जाते.
- मुरघास निर्मिती : हिरव्या चाऱ्याची पोषक तत्वे वाढविणे व वर्षभर हिरवा चारा उपलब्ध करुन ठेवण्याचा सोपा उपाय म्हणजे मुरघास तयार करणे. कार्बोदके मुक्त चारा जसे मका, ज्वारी, बाजरी, हायब्रीड नेपिअर गवत इ. यांची कुटटी करुन हवाबंद मोठया प्लॅस्टीकच्या पिशवीमध्ये बंद करुन ठेवल्याने जिवाणुंच्या क्रियेव्दारे चाऱ्यात मर्यादित स्वरुपात आम्ल तयार होवून चारा वर्षभर साठवून ठेवता येतो. यामुळे चाऱ्याची प्रत सुधारते. तसेच हिरव्या चाऱ्यापेक्षा मुरघास खाऊ घालणे हे अधिक फायदेशीर आहे. मुरघास बॅग खरेदीवर विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प अंतर्गत 60 % किंवा रु.3600/- चे मर्यादेत शासकिय अनुदान दिले जाते.
वैरण/ चारा पिकांचे फायदे:-
- बहुवार्षिक गवत असल्यामुळे वर्षभर नियमित हिरवा चारा उपलब्ध होतो. एकदा लागवड केल्यास 5 ते 6 वर्ष हिरव्या चाऱ्याचा पुरवठा होतो. हंगामी चारा पिकांप्रमाणे मशागतीवरील खर्च लागत नाही त्यामुळे उत्पादन खर्चात बचत होते.
- हायब्रिड नेपिअर हे बाजरा व नेपिअर यांच्या संकरातुन विकसित केलेले वाण असुन पौष्टिक व जास्त उत्पन्न देणारे आहे. नेपिअर गवताची सरासरी उंची 10 फुट पर्यंत असुन प्रति ठोंबास फुटव्यांची संख्या 30-40 असते. वर्षभरात 180-200 मे.टन हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळते.
- प्रथिनांचे प्रमाण 10-12 % असून ऑक्झलिक ॲसिडचे प्रमाण अत्यल्प असते. कोणतेही हानीकारक घटक नसल्यामुळे जनावरांना कोणताही अपाय होत नाही.
- खोड इतर संकरित नेपिअर वाणाच्या तुलनेने मऊ व रसाळ असल्यामुळे चाऱ्याची कापणी करतांना कोणताही त्रास होत नाही. चारा चाफकटरशिवाय कुटटी न करता जनावरांना खाऊ घालता येतो. त्यामुळे खर्चात व मनुष्यबळात बचत होवून चाऱ्याचा कोणताही भाग वाया जात नाही.
- जनावरे चारा आवडीने खात असून यापासून उत्तम प्रतीचा मुरघास तयार करता येतो.