स्वच्छ भारत मिशन (ग्रा) : केंद्र व राज्य पुरस्कृत
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाची स्थापना सन 2012 मध्ये करण्यात आली. या कक्षा अंतर्गत स्वच्छ भारत मिशन (ग्रा) मधून वैयक्तिक शौचालय सुविधा, सार्वजनिक शौचालय व सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन ईत्यादी योजना राबविल्या जातात. केंद्र व राज्यस्तरावर राबविण्यात येत असलेल्या निर्मल भारत अभियानाचे नामकरण दिनांक 2 ऑक्टोबर 2014 पासून स्वच्छ भारत मिशन (ग्रा) असे करण्यात आले. भारताचे पंतप्रधान यांनी हे मिशन अंमलात आणले आहे.
योजनेचे उद्देश : गावातील सर्व लोकांकडे वैयक्तिक शौचालय बांधकाम करणे, परिसर स्वच्छ ठेवणे, शौचालय बांधकाम करून त्याचा वापर करणे, श्वाश्वत शौचालय कायम ठेवणे. सांडपाणी निचऱ्याची व्यवस्था करणे, शाळा अंगणवाडी इत्यादीमध्ये शौचालय बांधकाम व पिण्याचे पाण्याची व्यवस्था करणे, इ.
लाभार्थी:
लाभार्थी निकष : 1) सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा बिपीएल मध्ये असावा. 2) दारिद्रय रेषेवरील एपीएल घटकातील अल्पभूधारक, अनु. जाती, अनु. जमाती, अपंग, महिला कुटूंब प्रमुख, भूमिहिन या कुटूंबांना सदर योजनेचा लाभ घेता येईल. 3) यापूर्वी शौचालय बांधकामकरीता कोणत्याही योजनेतून लाभ घेतलेला नसावा. 4) पायाभूत सर्व्हेक्षणानुसार शौचालय नसणारा लाभार्थी हा स्वच्छ भारत मिशन मधून लाभ घेऊन शकतो.
फायदे:
वैयक्तिक शौचालयाच्या बांधकाम : यासाठी प्रोत्साहनपर रक्कम रु. 12,000/- ठरविण्यात आली आहे. यामध्ये केंद्र शासनाचे 60 टक्के (रु. 7200/-) व राज्य शासनाचे 40 टक्के (रु. 4800/-) महाराष्ट्र शासन पाणी पुरवठा स्वच्छता विभाग यांचे शासन निर्णय क्र.स्वभामि-2015/प्र.क्र.194/पापु-08 दि. 26 नोव्हेंबर 2015. स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत लाभार्थ्यांना रु. 12,000/- पर्यंत लाभ देता येतो. या योजनेचा लाभ बिपीएल घटकातील सर्व कुटूंबे व एपीएल घटकातील अल्पभूधारक, अपंग, महिला कुटूंब प्रमुख, भूमिहिन या कुटूंबांना मिळतो.
अर्ज कसा करावा
संपर्क :
1) जिल्हास्तरावर – मुख्य कार्यकारी अधिकारी, किंवा उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पा.स्व.), किंवा जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा
परिषद या कार्यालयाशी संपर्क साधावा.
2) तालुकास्तरावर – गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी (पं), गट समन्वयक, समुह समन्वयक, यांचेशी संपर्क साधावा.
3) गावस्तरावर – सरपंच वा ग्रामसेवक वा रोजगार सेवक ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधावा.