महिला व बालविकास विभाग, चंद्रपूर यांच्यामार्फत जिल्ह्यातील महिला व बालकांच्या हितासाठी विविध योजना व सेवा राबविण्यात येतात. एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजना ही विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रमुख योजनांपैकी एक आहे.
महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियम, 1961 नुसार, महिला व बाल विकास विभाग, चंद्रपूर मार्फत खालील कामे केली जातात:
- महिला आणि बाल विकास आयुक्तालय, पुणे आणि नवी मुंबई यांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजनेअंतर्गत विविध योजना आणि कार्यक्रमांची अंमलबजावणी.
- महिला व बालकल्याण समिती, जिल्हा परिषद यांच्यामार्फत योजना आणि कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे.
- जिल्हा परिषदेच्या अंतर्गत पंचायत समिती स्तरावरील अंगणवाडी केंद्रांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे.
उद्दिष्ट्ये
- बालकांच्या योग्य मानसिक, शारीरिक व सामाजिक विकासासाठी पाया घालणे.
- सहा वर्षांखालील वयाच्या बालकांच्या पोषण व आरोग्य स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणणे.
- मृत्यू, मानसिक असंतुलन, कुपोषण आणि शाळा सोडणाऱ्या बालकांच्या संख्येत घट घडवून आणणे.
- बाल विकास कार्यक्रम घेण्यासाठी विविध विभागांमध्ये धोरण निश्चिती आणि कार्यक्रमाची प्रभावी ताळमेळ कायम ठेवणे.
- योग्य पोषण आहार व आरोग्य शिक्षण याद्वारे बालकांचे सामान्य आरोग्य व पोषणयुक्त स्थिती सुधारण्यासाठी कुटुंबीयांसह मातांना सक्षम व जागरूक बनवणे