बंद

    जल जीवन मिशन – पाणी गुणवत्ता व सनियंत्रण आणि सर्व्हेक्षण

    • तारीख : 04/06/2025 -

    योजनेचा उद्देश : ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळाद्वारे शुध्द सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे व जलजन्य रोगांचा प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवणे हा आहे. शासनाने वेळोवेळी घेतलेल्या शासन निर्णयात/परिपत्रकात शुध्द पाणी पुरवठा करण्यासाठी ग्रामीण व नागरीभागात करावयाच्या उपाय योजनांबाबत खालील बाबी अंतर्भूत करून सुचना निर्गमित करणे.
    1) नागरी व ग्रामीण भागात पाणी दुषित होऊ नये म्हणून घ्यावयाच्या प्रतिबंधक उपाय योजना.
    2) आरोग्य विभागामार्फत देण्यात येणारी लाल/पिवळे/हिरवे कार्ड यांची कार्यप्रणाली.
    3) पाण्याच्या गुणवत्ता सर्वेक्षण व सनियंत्रणाची नागरी/ग्रामीण भागातील कार्य पध्दती.
    4) ग्रामीण व नागरी भागात दुषित पाणी पुरवठा झाल्यास जबाबदारी निश्चित करणे.
    5) स्वायत्व स्वराज्य संस्था पाणी गुणवत्ते विषयी तयार केलेला परिसर स्वच्छता, प्रदुषण व पर्यावरण अहवाल स्थानिक वृत्तपत्रात प्रसिध्द करणे.

    लाभार्थी:

    सबंधित ग्रामपंचायत

    फायदे:

    योजनेचे वैशिष्टे : 1) सर्व नळ पाणी पुरवठा योजनेचे मुख्‍य स्त्रोत व उपांगे यांचे जैविक तपासणी ही वर्षातून 2 वेळा भूजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणा, चंद्रपूर यांचे जिल्हा व उपविभागीय प्रयोगशाळे मार्फत केली जाते. (जैविक तपासणी मान्सून पूर्व मार्च ते सप्टेंबर) व (मान्सून पश्चात ऑक्टोबर ते फेब्रुवारी) 2) रासायनिक तपासणी ही वर्षातून 1 वेळा करण्यात येते. (रासायनिक तपासणी मार्च ते जुन) 3) फिल्ड टेस्ट किट द्वारे वेळोवेळी जैविक तथा रासायनिक तपासणी केली जाते. 4) स्वच्छता सर्वेक्षण पावसाळ्यापूर्वी (1 एप्रिल - 30 एप्रिल) आणि पावसाळ्यानंतर (2 ऑक्टो. - 31 ऑक्टो.) असे वर्षातून 2 वेळा राबविण्यात येते. या अंतर्गत गुणानुक्रमानुसार लाल, हिरवे, पिवळे कार्ड ग्रामपंचायतीला वितरीत केले जातात. तसेच लाल कार्ड/पिवळे कार्ड यांचे रुपांतर हिरवे कार्डमध्ये कसे होईल. 5) प्रयोगशाळेत तपासण्यात आलेले सर्व नमुण्यांची सविस्तर माहिती राज्यशासनाच्या संकेतस्थळावर नोंदी घेतल्या जातात. 6) जलसुरक्षकांचे प्रशिक्षण, क्षमता बांधणी, मानधन इत्यादी सर्व कामे या योजने अंतर्गत केल्या जातात.

    अर्ज कसा करावा

    सदर योजने ची माहिती घेणेकरीता संपर्क कुठे करावे.
    1) जिल्हास्तरावर – मुख्य कार्यकारी अधिकारी, किंवा उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पा.स्व.), किंवा जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष अंतर्गत पाणी गुणवत्ता शाखा, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद तसेच भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, चंद्रपूर या कार्यालयाशी संपर्क साधावा.
    2) तालुकास्तरावर – गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी (पं/आरोग्य), तालुका आरोग्य अधिकारी, उप विभागीय प्रयोगशाळा, गट समन्वयक, समुह समन्वयक, उप विभागीय पाणी गुणवत्ता समन्वयक यांचेशी संपर्क साधावा.
    3) गावस्तरावर – सरपंच, ग्रामसेवक व जलसुरक्षक ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधावा.