बंद

    सार्वजनिक स्वच्छता संकूल

    • तारीख : 04/06/2025 -

    सार्वजनिक स्वच्छता संकुल हा स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्भुत घटक आहे. एका सार्वजनिक स्वच्छता संकुलासाठी रु. 3 लाखापर्यंत कमाल खर्च करता येतो. या योजनेत 70 टक्के (रु. 210000/-) स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत शासन अनुदान तर 30 टक्के (रु. 90000/-) 15 व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या निधीतून ग्रामपंचायतीने उपलब्ध करून द्यायचे आहे.
    या योजनेत केंद्र शासनाचा 60 टक्के व राज्य शासनाचा 40 टक्के निधी प्राप्त होण्याचा टप्पा आहे

    लाभार्थी:

    कार्यान्वीत यंत्रणा : ज्या ग्रामपंचायतीत सदर सार्वजनिक/सामाजिक शौचालयाचे बांधकाम घेण्याचे प्रस्तावित आहे, ती ग्रामपंचायत सदर कामाकरीता कार्यालयिन यंत्रणा राहील. याकरीता संबंधीत ग्रामपंचायतीने खालील कागदपत्रांसह प्रस्ताव पंचायत समितीकडे व पंचायत समितीने जिल्हा परिषद, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाकडे मंजुरीस सादर करावयाचे आहे.

    फायदे:

    एका सार्वजनिक स्वच्छता संकुलासाठी रु. 3 लाखापर्यंत कमाल खर्च करता येतो. या योजनेत 70 टक्के (रु. 210000/-) स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत शासन अनुदान तर 30 टक्के (रु. 90000/-) 15 व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या निधीतून ग्रामपंचायतीने उपलब्ध करून द्यायचे आहे.

    अर्ज कसा करावा

    सदर प्रस्तावासोबत खालील कागदपत्राची आवश्यकता असते.
    1) ग्रामपंचयतीचे मागणी पत्र
    2) 10 टक्के लोकवर्गीणी भरल्याचा पुरावा.
    3) ग्रामपंचायतीबाबीचा मालकीचा सातबारा.
    4) जागेचा नकाशा. (पटवारी यांनी प्रमाणीत केलेला)
    5) पंचायत समितस्तरावरून अंदाजपत्रकास तांत्रिक मंजुरी.
    6) ग्रामपंचायत देखभाल दुरूती करणार असा ठराव व इतिवृत्त.
    7) पुरेशी पाण्याची व प्रकाशाची व्यवस्था.
    8) वैयक्तिक शौचालय उपलब्ध नसलेल्या लाभार्थ्याची यादी.
    9) ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र.